Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
टाकीकार्डिया
#रोग तपशील#ताकाकार्डिया



काही लोकांना हृदयाचे ठोके एकदम वाढण्याचा त्रास होत असतो. तसे साधारणतः आपण पळत सुटलो, एखादे संकट समोर उभे राहिले किंवा अनपेक्षितपणे आपल्या भावना भडकवणारी घटना घडली, खूप राग आला किंवा उत्तेजीत करणारा अनुभव आला की छातीची धडधड वाढते. परंतु काही लोकांमध्ये अशी धडधड उगाचच होते. शरीराच्या कसल्याही असाधारण हालचाली न होता ते हृदयाचे ठोके वाढतात.

अशा लोकांमध्ये प्रसंगा प्रसंगाने किंवा काही प्रसंग नसतानाही छातीची धडधड वाढली की काही वेळाने ती कमी होते. परंतु या प्रक्रियेचे काहीतरी कायमचे अंश त्यांच्या शरीरात राहून जातात म्हणजे काहीतरी कायमस्वरूपी नुकसान होऊन गेलेले असते. हा विकार प्रामुख्याने मानसिक असतो. त्याची कारणे प्रामुख्याने मानसिक असली तरी आपल्या नकळतपणे आपल्या शरीरात निर्माण झालेले काही दोष किंवा विविध अवयवातल्या काही गोष्टींचे अभाव हेही त्यास कारणीभूत असतात. शरीरामध्ये पोटॅशियमची पातळी कमी झाली किंवा डीहायड्रेशन झाले तरीसुध्दा हृदयाचे ठोके अनियमित होतात.

रक्तातील शर्करा कमी झाल्यामुळेसुध्दा धडधड होते. अधिक कॉङ्गी पिणे, चॉकलेटचे प्राशन करणे किंवा मर्यादेच्या बाहेर दारू पिणे यामुळेही हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. मादक द्रव्य आणि निकोटीन हे सुध्दा छातीतल्या धडधडीस कारणीभूत ठरतात. गरोदर अवस्था, रजो निवृत्तीची अवस्था, रक्त कमी होणे, हृदयविकार, हृदयाच्या झडपांमधले दोष यामुळे सुध्दा छातीत धडधड करू शकते. यागोष्टी टाळण्यासाठी संतुलित आहार तर आवश्यक आहेच पण शक्य तो मनाचा प्रक्षोभ होणार नाही याची दक्षता घेणे, ध्यान आणि प्राणायाम करणे, वाटेल ती अनुचित पेय प्राशन करण्याचे टाळणे, भरपूर पाणी पिणे या गोष्टी सांभाळल्या की हा विकार मर्यादेत राहतो.

प्रत्यक्षात छातीचे ठोके वाढण्यावर कसलाही औषधोपचार नाही. कारण छातीचे ठोके वाढणे हे काही विकारांचे लक्षण आहे. तेव्हा ते विकार आटोक्यात ठेवले की हृदयाचे ठोके अनियमित होण्याचे प्रसंगच येत नाहीत. कसलीही व्यसने न करणे, भरपूर विश्रांती घेणे आणि दिनचर्या नियमाने पाळणे या गोष्टी सांभाळल्या तरीसुध्दा या त्रासापासून दिलासा मिळू शकतो.

सामान्य स्थितीमध्ये हृद्याचे दर मिनिटाला 60-90 ठोके पडतात. मात्र जेव्हा हृद्याचे डोके पडण्याचे प्रमाण 100 पेक्षा अधिक होते. तेव्हा हे धोकादायक ठरू शकते. या समस्येला टाकीकार्डिया म्हणतात. त्यामुळे जेव्हा हृद्यविकार किंवा हृद्याच्या कार्यामध्ये काही अडथळा निर्माण होतो तेव्हा हृद्याची धडधड वाढते.
टाकीकार्डिया च्या समस्येमध्ये हृद्याच्या व्हॉल्व्हमध्ये, हृद्याच्या स्नायूंमध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये काही दोष निर्माण होत नाहीत.म्हणूनच हृद्यविकारांशिवाय
टाकीकार्डिया चा त्रास जाणवत असल्यास त्यामागील नेमके कारण काय असू शकते या बाबतचा खास सल्ला आशियाई हार्ट इन्स्टिटयूट मुंबई चे कंसल्टंट कार्डिओलॉजि आणि इलेकट्रोफसीओलॉजि , डॉ. देतात.

1. ऑटोमॅटीसिटी (Automaticity)

हृद्याची आकुंचन पावून पुन्हा प्रसरण पावण्याची क्षमता म्हणजेच पंपिंग हे ‘ हार्ट रेट’ मध्ये मोजले जाते. सामान्य स्थितीमध्ये हे प्रमाण दर मिनिटाला 60-90 ठोके इतके असते. मात्र एखादा जड व्यायाम केल्यास हे प्रमाण 120/130 ठोके दर मिनिटाला इतके होते. यामुळे काळजी करण्याची गरज नाही. मात्र काही वेळेस कोणतेही ठोस कारण नसताना हृद्याच्या अप्पर आणि लोअर चेम्बरमधील स्नायू हायपरअ‍ॅक्टीव्ह होतात. त्यामुळे जेव्हा अप्पर चेम्बरमधील स्नायू हायपरअ‍ॅक्टीव्ह होतात तेव्हा स्ट्रीअल टाकीकार्डिया चा त्रास जाणवतो. तर लोअर चेम्बरमधील स्नायू जेव्हा हायपरअ‍ॅक्टीव्ह होतात तेव्हा व्हेंट्रीकलर टाकीकार्डिया चा त्रास जाणवतो. मात्र यापैकी कोणत्याही त्रासामध्ये हार्ट रेट प्रतिमिनिट 140 पेक्षा अधिक गेल्यास धोका वाढतो.

2. अ‍ॅबनॉर्मल कंडक्शन (Abnormal conductions)

काहीमध्ये जन्मजात हृद्याचे ठोके पडण्याचे प्रमाण अधिक असते. तर काहींना वाढत्या वयानुसार हा त्रास जाणवतो. अ‍ॅबनॉर्मल कंडक्शनमध्ये हृद्याचा ठोका पाडताना इलेक्ट्रिकल इम्पल्सेस लोअर चेम्बरमधून एका विशिष्ट मार्गाने जाते मात्र अप्पर चेम्बरमध्ये ते वेगळ्याच मार्गाने बाहेर पडते.

3. ट्रिगर अ‍ॅक्टिव्हिटी (Triggered activity)

ऑटोमॅटीसिटी प्रमाणेच ट्रिगर अ‍ॅक्टिव्हिटीचाही त्रास असतो. मात्र यामध्ये हार्ट वाढण्यामागे कारण वेगळे असते. व्हायरल इंफेक्शन, काही औषधांमुळे हृद्याचे ठोके पडण्याचा वेग वाढतो. यासोबत अ‍ॅनिमिया, रक्तप्रवाह होणे, ताप, एखादी इजा/ अ‍पघात किंवा त्यामधून होणार्‍या वेदना यामुळे हार्ट रेट वाढतो. या कारणांमुळे हार्ट रेट 130-140 प्रतिमिनिट इतका होतो.

Dr. Rahul Sudhakar
Dr. Rahul Sudhakar
BDS, Dentist, 5 yrs, Pune
Dr. Hemant Damle
Dr. Hemant Damle
MD - Allopathy, Gynaecologist Obstetrics and Gynecologist, 25 yrs, Pune
Dr. Sarita Bharambe
Dr. Sarita Bharambe
DHMS, Family Physician, 30 yrs, Pune
Dr. Jyoti Kumari
Dr. Jyoti Kumari
BDS, Chest Physician Child Abuse Pediatrician, Ranchi
Dr. Anjali Awate
Dr. Anjali Awate
BAMS, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune