Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
स्ट्रोक
#रोग तपशील#स्ट्रोक#पक्षाघात



ब्रेन स्ट्रोकची लक्षणं अन् उपचार

भारतात दरवर्षी जवळपास १५ लाख लोकांना स्ट्रोक हा आजार सतावतो. स्ट्रोक हा सर्वसाधारणपणे उतारवयात होण्याचा आजार असला, तरी अलीकडे तरुण वयातही स्ट्रोक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल, धुम्रपान, मद्यसेवन या कारणांमुळे स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते.

स्ट्रोक म्हणजे पॅरालिसीसचा अॅटॅक अथवा लकवा. याला ब्रेन अॅटॅक असंही म्हटलं जातं (ज्याप्रमाणे हृदयविकाराच्या झटक्याला ‘हार्ट अॅटॅक’ म्हटलं जातं). स्ट्रोक हे जगातील मृत्यूचे दुसऱ्या क्रमांकाचे कारण आणि अपंगत्वाचे चौथ्या क्रमांकाचे कारण आहे. भारतात दरवर्षी जवळपास १५ लाख लोकांना स्ट्रोक हा आजार सतावतो. स्ट्रोक हा सर्वसाधारणपणे उतारवयात होण्याचा आजार असला, तरी अलीकडे तरुण वयातही स्ट्रोक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल, धुम्रपान, मद्यसेवन या कारणांमुळे स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. ब‌ी १२ जीवनसत्त्वाची कमतरता, होमोसिस्टीन या घटकाचं जास्त प्रमाण, हृदयाच्या झडपांचे आजार ही तरुण वयातील स्ट्रोकची कारणं असू शकतात.

मेंदूला पुरेसा प्राणवायू चा पुरवठा न मिळाल्याने मेंदूच्या पेशी मृत होतात. परिणामी मेंदूच्या कार्यप्रणालीत अडथळा निर्माण होतो. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसीसचा अॅटॅक अथवा लकवा,याला ब्रेन अॅटॅक असंही म्हटलं जातं. रक्तामध्ये अडथळा निर्माण झाल्यास अथवा मेंदूला रक्त पुरवठा करणारी धमनी फाटली असता हा त्रास उद्भवू शकतो. यामुळे कायमस्वरूपी मज्जातंतूची हानी होऊन रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. स्ट्रोक हा कोणत्याही वेदना न होता होऊ शकतो. त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी चार ते पाच तासांच्या आत उपचार करणे आवश्यक आहे. याबाबत बहुसंख्य लोकांना माहिती नसते. चालू तासांच्या आत विशिष्ट गुठळी कमी करण्याकरिता उपाय केले गेले नाहीत तर मृत्यू ओढवू शकतो. छातीत धडधडण हि गोष्ट वरकरणी साधी वाटली तरीही प्रत्येक वेळी याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. त्याच बरोबर धाप किंवा अस्वस्थता वाटत असेल तर हि कदाचित ब्रेन स्ट्रोक च्या अटॅक ची लक्षणही असू शकतात. उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल, धुम्रपान, मद्यसेवन या कारणांमुळे स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते.

ब्रेन स्ट्रोक एक घातक रोग आहे आजकल १० पैकी ६ व्यक्ती कधी न कधी स्ट्रोक च्या समस्या चे शिकार होतात बहुतेक वाढत्या युगामध्ये अशा प्रकारच्या समस्या दिसतात ज्या कारणाने बऱ्याच वेळा मानवी व्यक्तीचा मृत्यूही होतो. ब्रेन स्ट्रोक येण्यानंतर रुग्णांना बहुतेक त्यांच्या बोलण्यातून आणि ऐकण्याची शक्ती गमावून बसतो. जीवन जगण्यासाठी त्यांना दुसऱ्या लोकांचा सहारा घ्यावा लागतो. या व्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये अडचणी, शरीराचा एक भाग सुन्न पडणे, मासपेशींमध्ये कमजोरी येणे इत्यादि अनेक प्रकारची समस्या आहे.

ब्रेन स्ट्रोक झाल्यावर मेंदूत गुठळ्या होतात. उत्तर गुठळ्या हृदयाकडून मेंदूपर्यंत पोहोचतात. ह्या गुठळ्या विरघळवण्यासाठी अत्यंत पॉवरफुल इंजेक्शन घ्यावे लागतात. हृदयाचे ठोके अनियमित असतील तर आणि त्यावर वेळेत उपचार केले नाही तर त्याचा गुठळ्या तयार होतात. या गुठळ्या मेंदूपर्यंत पोहोचतात. त्यामुळे ब्रेन स्ट्रोक होतो आणि हृदय बंद पडते. हि समस्या जगभरात आढळून येते. आणि दिवसेंदिवस त्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या संदर्भात २०१० साली लोकसंख्येवर आधारित करण्यात आलेल्या पाहणीत तीन कोटी ३५ लाख व्यक्तींमध्ये हृदयाचे ठोके अनियमित असल्याचे आढळून आले आणि यात दरवषी सुमारे ५० लाख व्यक्तींची भर पडत आहे. हि काळजी करण्यासारखी बाब आहे. कारण यामुळे हृदयात गुठळ्या तयार होऊन त्या शरीरातील इतर अवयवपर्यंत विशेषतः मेंदूपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे ब्रेन स्ट्रोक होण्याचा धोका असतो.

स्ट्रोकचे प्रकार :
सर्वसाधारणपणे स्ट्रोक दोन प्रकारचे असू शकतात.
१) इश्केमिक म्हणजे मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाल्याने (रक्तवाहीनीत गाठ (थ्रोम्बस) तयार होऊन रक्तपुरवठ्यास अडथळा निर्माण होतो).
२) हेमरेजिक म्हणजे मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने आलेला स्ट्रोक सर्वसाधारणपणे उच्च रक्तदान हे अशा स्ट्रोकचं महत्त्वाचं कारण असतं.

- ब्रेन स्ट्रोकची लक्षणं: लकवा हा अचानक येतो. तोंड वाकडं होणं, बोलताना बोबडी वळणं, एका बाजूच्या हातापायाची ताकद कमी होणं, चालताना तोल जाणं, डोकं दुखणं, झटके येणं ही सर्वसाधारणपणे स्ट्रोकची लक्षणं असतात.

- निदानासाठी आवश्यक चाचण्या : प्रत्येक स्ट्रोकच्या निदानासाठी एमआरआय, ब्रेन अँजिओग्राम या चाचण्या केल्या जातात. रिस्क फॅक्टर शोधण्यासाठी हिमोग्लोबीन, रक्तातील साखर, लिपीड प्रोफाईड, होमोसिस्टिन २ डी इको या चाचण्या केल्या जातात.

- ब्रेन स्ट्रोकवरील उपचार: अलीकडे इश्केमिक स्ट्रोकच्या उपचारात बरीच क्रांती झाली आहे. जर स्ट्रोक झाल्याच्या साडे चार तासाच्या आत आपण रुग्णालयात पोहोचला आणि सीटी स्कॅनमध्ये रक्तस्त्राव नसेल, तर इंट्राव्हेनस टीपीए (टिश्यू प्लास्मिनोजेन अॅक्टिवेटर) नावाचं रक्तातील गाठ वितळवणारं औषध दिल्यास बराच फायदा होऊ शकतो. अर्थात हे औषध देण्यापूर्वी डॉक्टर काही गोष्टींची खात्री करुन घेतात. कधी-कधी या औषधाने मेंदूत रक्तस्त्राव होणं यासारखी गंभीर गुंतागुंत देखील होऊ शकते. कधी कधी सहा ते बारा तासाच्या दरम्यान डीएसए (डीजीटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी) नावाची चाचणी करुन रक्तवाहीनीतील अडथळा अचूक ओळखता येतो आणि तो अडथळा ‘मेकॅनिकल अॅम्बेक्टमी’ या प्रक्रियेद्वारा दूरही करता येतो. पण याहून जास्त कालावधी झाला असेल तर अॅस्थिरिन कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधं देऊन पुन्हा लकवा होण्याची शक्यता कमी करता येते. उच्च, रक्तदाब, मधुमेह, धुम्रपान यांचे नियंत्रण करणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं. हातापायाची ताकद हळूहळू सहा महिन्यांपर्यंत सुधारते. पण त्यासाठी फिज‌िओथेरपी खूप महत्त्वाची असते. हेमरेजिक स्ट्रोकच्या उपचारासाठी कधीकधी न्युरोसर्जरीची वेळ येऊ शकते.

ब्रेन स्ट्रोक कसा ओळखावा
- बोलायला आणि समजायला अवघड जाते. आवाजात फरक पडतो किंवा काही गोष्टी समजण्यास अडचण येते.
- चेहऱ्यावर, हात किंवा पाय यावर कमजोरी येते किंवा ते सुन्न होतात. विशेषतः शरीराच्या एका बाजूला भागाला जास्त जाणवते.
- एक किंवा दोन्ही आंखांपासून ते अडखळणे आपण अचानक एका किंवा दोन्ही डोळेाने अंधुक किंवा काळे दिसू शकता किंवा एकाचे दोन दिसू शकतात.
- अचानक डोक्यात खूप दुखणे आणि त्याच्याबरोबरच उलटी,चक्कर आणि बेशुद्ध होण्याची शक्यता आहे.
- चालताना अडचणी येतात.

हा रोग कोणाला होऊ शकतो?
- ५५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कोणालाही विशेषता: पुरुषांना होऊ शकतो.
- आनुवंशिकता असल्यास
- उच्च रक्तदाब असलेल्यांना
- शरीरात कोलेस्टेरॉलच प्रमाण अधिक असलेल्यांना होतो.
- धुम्रपान करणाऱ्यांना होतो.
- मधुमेहाचे रुग्ण
- माइल्ड स्ट्रोक अॅटॅक आलेले
- नैराश्य आलेले किंवा मानसिक तणावाखाली असणारे
- अल्कोहोलच अतिरिक्त सेवन करणारे

आहार
पोषक पदार्थांचे सेवन सगळ्यांसाठी ते आवश्यक आहेत, परंतु विशेषतः त्यांच्यासाठी खूप आवश्यक आहेत, जे ब्रेन स्ट्रोक पासून पीडित आहेत पोषक अन्न खाणे नाही फक्त मस्तिष्क क्षतिग्रस्त होणारी कोशांची पुनर्रचना होऊ शकते,पण भविष्यात स्ट्रोक होण्याची शक्यता आहे. अस जेवण करा कि ज्यामध्ये मीठ, कोलेस्ट्रॉल,ट्रान्सफॅट आणि सेचुरेटेड फॅट ची मात्रा कमी असेल. आणि एंटीऑक्सीडंट, विटामिन ई, सी आणि ए मात्रा अधिक असेल. संपूर्ण अन्नधान्य खाणे, कारण हे फायबर चांगले स्त्रोत आहेत आणि रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अदरक चे सेवन करा,कारण ह्यामुळे रक्त पातळ होते आणि थाप तयार होणे आशंका कमी होतो. ओमेगा फॅटीऍसिड युक्त खाद्य पदार्थ जसे की मासे,अखरोट,सोयाबीन इ. हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात आणि रक्ताच्या गाठी होण्याचे प्रमाण कमी होतो. जांभूळ,गाजर,टोमॅटो आणि हिरव्या पालेभाज्या भाज्या निश्चितपणे खाऊन घ्यावे कारण त्यात अँटी ऑक्सीडंटचे प्रमाण खूप जास्त आहे.
लक्षण
लहान स्वरूपाच्या स्ट्रोक मध्ये मात्र अशी कोणतीही लक्षण दिसत नाहीत. मात्र तरीही मेंदूच्या पेशी निकामी करण्याच काम होत असत.

- अशक्तपणा येणे
- डोळ्यांसमोर अंधारी येणे.
- चालताना अडखळत चालणे
- शरीराच संतुलन बिघडणे
- स्मरणशक्ती वर परिणाम होणे
- बधीरपणा येण
- धुरकट किवा दुहेरी प्रतिमा दिसण
- लकवा येणे
- तोंड वाकडं होणं बोबडी बोलणे
- एका बाजूच्या हातापायाची ताकद कमी होणं,
- डोकं दुखणं
- झटके येणं

उपाय
आपल्याला असणाऱ्या उच्च रक्तदाबाची आपल्याला पूर्ण माहिती असं आवश्यक आहे. तसचं त्यावर संयम कसा ठेवावा याचीही तितकीच माहिती असण गरजेच आहे. जेणेकरून पटकन उपचार करता येऊ शकतो.

- धुम्रपान टाळावे
- कोलेस्टेरॉल वाढवणारे चरबीयुक्त पदार्थ टाळावेत. विटॅमिन बी असलेले पदार्थ ब्रेन स्ट्रोक होण्यापासून बचाव करू शकतात.
- आहारात टोमॅटोचा समावेश करावा. टोमॅटोचा अॅटिआॉक्सिडंट असल्यामुळे ब्रेन स्ट्रोक होण्यापासून बचाव होतो.
- अॅरोबिकसारखे व्यायाम नियमित करावेत.
- मानसिक ताणावर नियंत्रण ठेवाव.
- विटॅमिन बी असलेले पदार्थ ब्रेन स्ट्रोक होण्यापासून बचाव करू शकतात.

Dr. Amit Patil
Dr. Amit Patil
MD - Allopathy, Gynaecological Endoscopy Specialist Gynaecologist, 11 yrs, Pune
Dr. Avinash Deore
Dr. Avinash Deore
MS/MD - Ayurveda, Ayurveda Infertility Specialist, 15 yrs, Pune
Dr. Sachin Kuldhar
Dr. Sachin Kuldhar
BHMS, Gynaecologist Homeopath, 8 yrs, Pune
Dr. Kewal Deshpande
Dr. Kewal Deshpande
BHMS, 2 yrs, Pune
Dr. Sandip Nimbhorkar
Dr. Sandip Nimbhorkar
BAMS, Ayurveda Naturopathy Specialist, 21 yrs, Pune