Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
स्लीप अॅप्नीया
#रोग तपशील#स्लीप ऍप्नी#झोपेचे विकार



स्लीप अॅप्नीया

स्लीप अॅप्निया असलेली व्यक्ती साधारण सहा तास आडवी पडून व्यवस्थित झोपू शकत नाहीत. अधूनमधून उठायला लागणे, खूपदा कूस बदलावी लागणे, श्वास बंद पडल्यासारखा वाटणे,उठून श्वास घ्यावा लागणे, या गोष्टी वारंवार घडत असतील, तर काही तपासण्या केल्या जातात. हा आजार एका ठराविक पातळीवर पोहोचला असेल, तर रुग्णाला सी-पॅप मशिन वापरावे लागू शकते. ही वेळ आली, तर रुग्णाला ते मशिन आणि ऑक्सिजनचा सिलिंडर घेऊनही फिरावे लागते. यामुळे रुग्णाच्या दैनंदिन जीवनावर, त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सुदैवाने लठ्ठपणावर उपचार केल्यानंतर हा विकार पूर्णपणे बरा होऊ शकतो. अशा रुग्णाच्या लठ्ठपणामध्ये १५ ते २० टक्के परिणाम झाला, तरी ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्नियामध्ये जवळजवळ ८० टक्के फरक पडतो.

आहार नियंत्रण आणि नियमित व्यायम यांच्यामुळे काही प्रमाणात वजन कमी होऊ शकते. वजन जेव्हा अतिलठ्ठ या प्रकारात मोडते, तेव्हा ते या प्रकारांनी कमी होऊ शकत नाही. काही वेळा या लोकांमध्ये आहारावर नियंत्रण आणणे आणि खूप शारीरिक श्रम करणे शक्त नसते, तेव्हा बॅरिस्टिक सर्जरी हा चांगला वैज्ञानिक उपचार उपलब्ध आहे. या उपचार पद्धतीमध्ये जठर आणि लहान आतडे म्हणजे पचनसंस्था यांची रचना काही प्रमाणात बदलली जाते. विविध हार्मोन्स वेगवेगळ्या पातळ्यांवर सतर्क केले जातात. चरबी तयार होण्याची जी पद्धत असते, ती वेगळ्या पद्धतीने वळवली जाते. यामुळे रुग्णाचे वजन वर्षभराच्या कालावधीत ६० ते ७० टक्क्यांनी कमी होऊ शकते आणि ते दीर्घ काळ टिकून राहू शकते. अतिलठ्ठ लोकांमध्ये ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया असल्यास तो बॅरिअॅट्रिक सर्जरीमुळे बरा होऊ शकतो. त्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा जास्त असते. घोरणे ही साधी गोष्ट नसून ते एका जीवघेण्या व्याधीचे लक्षण असू शकते, हे समजून घ्यायला हवे.

अनेक लोकांना झोपेत श्वास थांबण्याचा त्रास होतो. सर्दी-पडशामुळे त्रास होत असेल, असा अनेकांचा समज होतो. पण वैद्यकीय भाषेत त्याला स्लीप अप्निया म्हणतात. अनेकांना झोपेत दहा ते वीस सेकंदांसाठी श्वास थांबतो. सलग अनेक रात्री हा प्रकार सुरू असतो. झोपेत उद‍्भवणाऱ्या या आजाराने दिवसा झोप लागते. त्यामुळे एकाग्रता कमी होते. झोप कमी झाल्यावर अनेक विकार जडण्याची भीती असते. त्यामुळे मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, पक्षाघात व अनेकदा आपोआप वजन वाढण्याचा त्रास होतो. पण योग्य उपचारांच्या बळावर यावर मात करता येते. तुम्हाला झोप सुरळीत लागते. तसेच, दररोज ताजेतवाने राहू शकतात.

स्लीप अप्नियाची लक्षणे झोपेत काही काळ श्वास थांबत असेल तर किंवा नाक चोंदत असेल तर तुम्हाला स्लीप अप्नियाचा त्रास आहे, असे समजावे. सकाळी डोकेदुखी, स्मरणशक्ती किंवा काही शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळे येणे, मन एकाग्र होण्यात अडथळे येणे, नैराश्याची भावना येणे, व्यक्तिमत्त्वात बदल होणे, वारंवार लघवी करण्यास उठणे, सकाळी उठल्यावर तोंड, घसा कोरडा पडणे

उपचार वजन कमी करणे हा त्यावरील चांगला उपचार आहे. जे लोक अतिलठ्ठ असतात, त्यांच्या घशाच्या मागील बाजूस अतिरिक्त पेशी असतात. त्या श्वसनमार्गात येतात. झोपेत असताना फुफ्फुसाकडे जाणारा हवेचा प्रवाह रोखून धरतात. केवळ दहा टक्के वजन कमी केल्याने लक्षणे कमी होतात. धूम्रमान बंद करणे आवश्यक आहे. मद्यपान, झोपेच्या गोळ्या टाळणे, वेदनाशामक गोळ्या टाळणे, झोपण्यापूर्वी जड जेवण टाळावे, कॉफी घेऊ नये. झोपेचे तास नियमित करावेत. हे उपचार केल्यानंतरही हा त्रास कमी न झाल्यास बॅरिअॅट्रिक सर्जरी हा एक उपाय आहे. वास्तविक, शस्त्रक्रियेचा निर्णय घेणे सोपे नाही. आणि स्लीप अप्नियाशी लढत देणाऱ्या प्रत्येकाला हा उपाय लागू पडत नाही. मुळात हा आजार मधुमेह, उच्चरक्तदाब या सारख्या आजाराशी निगडित असल्याने त्यावर आधी मात करणे हे सर्वांत चांगले आहे.

स्लीप अॅप्नीया ही एक दुर्लक्षित आरोग्य समस्यांपैकी एक समस्या आहे.अनेकांना या आरोग्य समस्येबाबत काहीच माहिती नसते पण ज्यांना या झोपेच्या विकाराबाबत थोडीफार माहिती असते त्यांना या विकारामुळे होणा-या गंभीर परिणामांची जाणिव नसते.२००९ मध्ये AIIMS द्वारे घेण्यात आलेल्या एका अभ्यासानूसार भारतीय लोकसंख्येतील १३ टक्के लोकांना OSA ही समस्या असल्याचे आढळून आले आहे.त्यापैकी ४ टक्के लोकांनी डॉक्टरकडे जाऊन याची तपासणी केलेली आहे.तसेच या विकाराचे प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये तीनपट अधिक असल्याचे देखील आढळले आहे.

स्लीप अॅप्नीया मुळे एखाद्या व्यक्तीच्या आरोग्य समस्येवर होणा-या परिणामांचे पुरावे दिवसेंदिवस वाढतच आहेत. OSA मुळे ह्रदयाचे ठोके वाढतात व रक्तदाब देखील वाढतो त्यामुळे सहाजिकच ह्रदयावरचा दाब वाढू लागतो. याचे आणखी एक कारण असे की यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते ज्यामुळे ह्रदयाची कार्यक्षमता वाढविणा-या मज्जासंस्थेच्या विशिष्ट भागावर प्रभाव पडतो. शिवाय OSA मुळे हायपरटेंशन,मधूमेह होण्याची शक्यता असते. तसेच त्यामुळे फुफ्फुसे,ह्रदय व मेंदूच्या आरोग्याला देखील धोका निर्माण होतो.

त्यामुळे घोरण्यासोबत श्वसनाची समस्या असल्यास ती ओबस्ट्रक्टिव्ह स्लीप अप्ने (OSA) ही गंभीर आरोग्य समस्या असू शकते.तसेच या स्लीप अॅप्नीया समस्येवर वेळीच उपचार न केल्यास गंभीर आरोग्य समस्या होऊन मृत्यू देखील होऊ शकतो.जे लोक स्लीप अॅप्नीयावर वेळीच उपचार करीत नाहीत त्यांना स्ट्रोक येण्याचा चारपट अधिक व ह्रदयविकारांचा तीनपट अधिक धोका असतो.या झोपेच्या विकाराचा मधूमेह, मेटाबॉलिक विकार, वजन वाढणे, हार्ट अटॅक, ह्रदय बंद पडणे, स्मरणशक्ती कमजोर होणे, लवकर वृद्धत्व येणे व अकाली मृत्यू यांच्याशी सबंध असू शकतो.

रस्त्यावरील सुरक्षेसाठी देखील स्लीप अॅप्नीयावर उपचार करणे फार गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा प्रशासनच्या मते स्लीप अॅप्नीयामुळे अपुरी झोप व एकाग्रता कमी झाल्यामुळे दरवर्षी १ लाख कार अॅक्सिडंट, चाळीस हजार जखमी व १५५० लोक मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले आहे. याच्या परिणामांमुळे कामाच्या ठिकाणी होणा-या दुखापती वाढणे, कामाची गुणवत्ता घसरणे, जगण्यातील मौज कमी होणे व आरोग्य सेवांमुळे पडणारा अतिरिक्त आर्थिक भार अशा गोष्टी वाढत आहेत.

Dr. Ajay Rokade
Dr. Ajay Rokade
MD - Homeopathy, Family Physician Homeopath, 15 yrs, Pune
Dr. Nitin Desai
Dr. Nitin Desai
BAMS, Ayurveda Panchakarma, 22 yrs, Pune
Dr. Vrushali Garde
Dr. Vrushali Garde
MBBS, Psychiatrist, 11 yrs, Pune
Dr. Ratnaprabha  Chaudhari
Dr. Ratnaprabha Chaudhari
MS/MD - Ayurveda, Ayurveda Infertility Specialist, 9 yrs, Pune
Dr. Amruta Gite
Dr. Amruta Gite
BDS, Dental Surgeon Dentist, Pune