Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
वजन कमी करण्यासोबतच यासाठीही फायदेशीर ठरतात दोरीच्या उड्या!
#वजन कमी होणे#व्यायाम#निरोगी जिवन

लहाणपणीच्या खेळांमध्ये समाविष्ट होणारा आणि प्रत्येकालाच आवडणारा खेळ म्हणजे, दोरीच्या उड्या. पण तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही लहानपणी गंमत म्हणून खेळत असलेल्या खेळाचा वर्कआउटमध्येही समावेश होतो. खेळ आणि फिटनेसशी निगडीत असणाऱ्या व्यक्ती आपल्या वर्कआउटमध्ये दोरीच्या उड्यांचा समावेश करत असतात. फक्त दोरीच्या उड्यांचेच शरीराला अनेक फायदे होतात. याचा वापर आपण वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही करण्यात येतो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही साइड इफेक्टशिवाय वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या वर्कआउटमध्ये दोरीच्या उड्यांचा समावेश करायला विसरू नका. जाणून घेऊया दोरीच्या उड्यांचा वर्कआउट प्लॅनमध्ये समावेश केल्याने होणाऱ्या फायद्यांबाबत...

1. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, 10 मिनिटांसाठी दोरीच्या उड्या मारणं 8 मिनिटं धावण्या समान असतं. एक मिनिटापर्यंत दोरीच्या उड्या मारल्याने 10 ते 16 कॅलरी उर्जा खर्च होते.

2. बॉक्सर्स आपल्या वर्कआउट प्लॅनमध्ये दोरीच्या उड्यांचा अवश्य समावेश करतात. दोरीच्या उड्यांचा सराव केल्याने शरीराची बॅलेन्सिग इम्प्रूव होते आणि पायांच्या मूव्हमेंट्समध्ये वेग आणि कंट्रोल वाढत असून बॉक्सर्ससाठी या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर सुपरमॉम मेरी कॉमने एका कॉम्पिटिशन दरम्यान आपलं वेट कमी करण्यासाठी दोरीच्या उड्यांचा आधार घेतला होता. त्यावेळी तिचे व्हिडीओ व्हायल झाले होते.

3. दोरीच्या उड्यांमुळे हाडं मजबुत होण्यासही मदत होते. दोरीच्या उड्या मारणं हे मेंदूसाठीही फायदेशीर ठरतं.

4. वजन कमी करण्यासाठी दोरीच्या उड्या मारणं एक व्यायाम आहे. दररोज जर अर्ध्या तासापर्यंत दोरीच्या उड्यांचा सराव केला तर एक आठवड्यापर्यंत सतत असं केल्याने 500 ग्रॅमपर्यंत वजन कमी करण्यासाठी मदत होते. वजन कमी करण्यासाठी इच्छुक लोकांनी दोरीच्या उड्या (Rope skipping) आपल्या रूटिनमध्ये एक्सरसाइज म्हणून समावेश करावा.

5. पहिल्या दिवशी दोरीच्या उड्या मारल्याने होउ शकतं की, तुमच्या पायांमध्ये प्रचंड वेदना होतील. अनेकदा हे इतर वर्कआउटमध्येही होतं. त्यामुळे दोरीच्या उड्या मारताना हळूहळू सुरुवात करा.

6. दोरीच्या उड्यांमुळे शरीरातील रक्तप्रवाह वेगने होतो. ज्यामुळे त्वचेला पोषण मिळण्यास सुरुवात होते आणि शरीरातील विषारी घटक घामाच्या स्वरूपात शरीरातून बाहेर टाकले जातात. दोरीच्या उड्यांचा एक फायदा म्हणजे, यामुळे हार्मन बॅलेन्स (Hormone Balance) होण्यास मदत होते. ज्यामुळे टेन्शन आणि डिप्रेशनपासून सुटका होते.

7. दोरीच्या उड्या मारताना शरीराच्या सर्वच अवयवांचा समावेश होतो. यामध्ये तुमचे पाय, पोटाचे स्नायू, खांदे आणि मनगट, हृदय आणि आंतरिक अवयवांचाही व्यायाम होतो.

8. दोरीच्या उड्यांमुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते. फुफ्फुसं मजबुत होतात आणि चेहऱ्यावर चमक येते. एवढचं नाही तर दोरीच्या उड्यांमुळे शरीराचा Stamina वाढतो आणि अनियंत्रित हृदयाची गतिही सुधारण्यास मदत होते.

9. धावण्याऐवजी दोरीच्या उड्या मारल्याने तुमच्या गुडघ्यांवर त्याचा विपरित परिणाम होत नाही. कारण उड्या मारताना पायांना जो झटका लागतो तो पूर्ण पायंमध्ये पसरतो आणि थेट गुडघ्यांवर त्याचं प्रेशर येत नाही.

Dr. Maya Golikere
Dr. Maya Golikere
BAMS, Panchakarma General Physician, 2 yrs, Pune
Dr. Vijay E Chaudhari
Dr. Vijay E Chaudhari
BHMS, Homeopath, 25 yrs, Pune
Dr. Dharmendra Singh
Dr. Dharmendra Singh
MS/MD - Ayurveda, Cardiologist Diabetologist, 1 yrs, Pune
Dr. Jyoti Sharma
Dr. Jyoti Sharma
BHMS, Homeopath, 5 yrs, Pune
Dr. Sneha Jain
Dr. Sneha Jain
MD - Homeopathy, Homeopath, 4 yrs, Pune