Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
त्वचेचा कर्करोग
#रोग तपशील#कर्करोग#त्वचा वर अडथळे



त्वचेचा कर्करोग

वातावरणातील बदल, तसेच प्रदूषण आणि वाढलेल्या उष्णतेचा थेट परिणाम मानवाच्या त्वचेवर होत आहे. जगात कार्बन उत्सर्जनाची पातळी वाढल्यामुळे वातावरणातील ओझोनच्या थराला छिद्रे पडत आहेत. सूर्याची अतिनील किरणे थोपवणे हे ओझोनच्या थराचे काम आहे. त्यालाच छिद्रे पडल्याने ही अतिनील किरणे थेट जमिनीवर येत आहेत. या अतिनील किरणांमुळे त्वचेचे विकार वाढू लागले आहेत. त्वचेचा कर्करोग हा त्याचा एक भीषण चेहरा आहे. ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्यांच्यामध्ये हा आजार लवकर होण्याची शक्यता असते. कर्करोगाचे प्रमाण वाढत जाण्याचे मुख्य कारण आपल्याकडील खाण्यापिण्याच्या सवयी आहेत. तंबाखू, गुटखा यांचे सेवन केल्यामुळे कर्करोग होऊ शकतो. कर्करोग अनेक प्रकारचे असतात. त्यात तोंडाचा, मेंदूचा, आतड्यांचा, हाडांचा हे प्रकार आपल्याकडे पाहायला मिळतात. जगात त्वचेच्या कर्करोगाचे कोट्यवधी प्रकरणे दरवर्षी पुढे येतात. याची कारणे कोणती, तो कसा होतो, बचावासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.

मिलानोसाईटस् पेशींमध्ये त्वचेचा कर्करोग होतो. त्यालाच मेलानोमा असे म्हणतात. त्वचेचा कर्करोग मुख्यत: त्वचेच्या बाहेरच्या बाजूला होतो. मानवी शरीरात रोज नव्या पेशी बनतात व नष्ट होतात. अनेकदा नष्ट होणार्‍या पेशींची संख्या वाढून त्याची गाठ तयार होते. त्याचे पुढे जाऊन त्वचेच्या कर्करोगात रूपांतर होते. त्वचेचा कर्करोग होण्याचे मुख्य कारण जास्त वेळ तीव्र उन्हात राहणे हे आहे. त्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. सूर्याची अतिनील किरणे त्वचेच्या आत जाऊन कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे उन्हात जाताना शरीर झाकणे गरजेचे ठरते. तसेच प्रखर सूर्यकिरणांपासून बचाव करण्यासाठी सनस्क्रीन लोशनचा वापर करावा. सनस्क्रीन लोशनमुळे त्वचेला अनेक फायदे होतात.

ज्यांची रोगप्रतिकारकशक्‍ती कमी आहे त्यांना या कर्करोगाचा धोका जास्त असतो. जगात अमेरिकेमध्ये त्वचेचा कर्करोग असणार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील संशोधकांनी त्वचेच्या कर्करोगाचा एक गंध शोधून काढला आहे. यानुसार या गंभीर आजाराचा तपास आणि उपाय करण्यात मदत मिळणार असल्याचा त्यांचा दावा आहे. सध्या त्वचेवर टॅटू बनविण्याची फॅशन आहे. काही तरुण-तरुणी अंगभर टॅटू करून घेतात. मात्र, संशोधकांच्या म्हणण्यानुसार त्वचेवर टॅटू करणे हेही त्वचेच्या कर्करोगाला आमंत्रण देणारे ठरू शकते. त्यामुळे टॅटू करणे टाळावे. रोजच्या जेवणात व्हिटॅमिन डी 3 चा योग्य वापर केल्यास त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी केला जाऊ शकतो. व्हिटॅमिन डी 3 मुळे मानवी शरीरातील हाडे मजबूत होतात. सोबतच सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षणही मिळते. तेलाने त्वचेची मालीश केल्यानेही त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. मात्र, ज्या तेलात सन प्रोटेक्शन फॅक्टर (एसपीएफ) जास्त असेल त्याच तेलाचा वापर करावा. बदाम तेल, खोबरेल तेलाचा वापर मुख्यत्वे केला जातो. या तेलाद्वारे सूर्यकिरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण केले जाते. रोजच्या जेवणात द्राक्षे, सफरचंदसारख्या फळांचा समावेश केला, तरी त्वचेच्या कर्करोगाचा धोका टळू शकतो.

कार्बन उत्सर्जन, मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, वायू प्रदूषण याचा थेट परिणाम पृथ्वीच्या वातावरणावर होत आहे. पृथ्वीचे तापमान वाढत आहे. त्यामुळे वातावरणातील वायूंच्या थरांचे नुकसान होत आहे. ओझोनला छिद्रे पडत असल्यामुळे सूर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीवर येत आहेत. अशा स्थितीत त्वचेचे संरक्षण न करता घराबाहेर पडल्यास त्वचेचा कर्करोग होण्याची भीती असते. स्त्री अथवा पुरुष दोघांनाही या कर्करोगाचा धोका असतो. अतिनील किरणांचा हल्‍ला कोणत्याही ऋतूमध्ये होऊ शकतो. मात्र, उन्हाळ्यात त्याची तीव्रता जास्त असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. सकाळी साडेआठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंतचे ऊन जास्त घातक असते. कर्करोगांच्या इतर प्रकारांपेक्षा त्वचेचा कर्करोग मोठ्या प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे त्वचेला सुरक्षितपणे झाकूनच घराबाहेर पडावे.

त्वचेचा कर्करोग कुणालाही होऊ शकतो. मात्र, गोर्‍या रंगाच्या, निसर्गत: ज्यांचे केस लाल अथवा करडे आहेत, त्वचेवर सुरकुत्या असणार्‍या, नाजूक त्वचा अथवा घरातील कुणाला त्वचेचा कर्करोग झालेला असणार्‍यांनी त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी उन्हात न फिरणे, त्वचा जास्तीत जास्त झाकणे या उपायांसह डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कर्करोगापासून वाचण्याचे उपाय केले जाऊ शकतात. बालकांची त्वचा खूप नाजूक असल्यामुळे त्यांच्या त्वचेचे संरक्षण करणे खूप गरजेचे आहे. त्वचेच्या कर्करोगापासून बचाव करण्याची साधने तुलनेने सोपी आहेत.

मेलानोमा आणि नॉन मेलेनोमा हे त्वचेच्या कर्करोगाचे दोन मुख्य प्रकार आहेत. मेलेनोसाईटस्मध्ये त्वचेचा रंग तयार केला जातो. त्याला मिलेनीन असे म्हटले जाते. मिलेनीन सूर्याच्या घातक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. मेलानोमा हा कर्करोगाचा प्रकार मेलेनोसाईटस्मध्ये होतो. या रोगाचे लवकर निदान झाल्यास इलाज करणे शक्य आहे. त्वचेच्या कर्करोगांच्या इतर प्रकारांपेक्षा हा सर्वात घातक प्रकार आहे. 2012 साली त्वचेच्या कर्करोगाची 75 हजार प्रकरणे समोर आली आहेत.

बेसल आणि स्क्‍वैमस कर्करोग
त्वचेच्या कर्करोगाचा हा प्रकार मेलानोमाप्रमाणे नसतो. हा कर्करोग बेसल आणि स्क्‍वैमस पेशींमध्ये होतो. या पेशी त्वचेच्या बाह्य आवरणावर असतात. या पेशींमध्ये होणार्‍या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास त्याचा पूर्ण इलाज करणे शक्य आहे.

फायदा अन् तोटाही
त्वचेच्या कर्करोगाबाबत झालेल्या संशोधनानुसार अतिनील किरणे त्वचेचा कर्करोग होण्यात मोठी भूमिका बजावतात. मात्र, हीच सूर्यकिरणे व्हिटॅमिन डी 3 चे मुख्य स्रोत आहेत. म्हणजे या किरणांचे अस्तित्व मानवाच्या हाडांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे कडक, प्रखर उन्हापासून बचाव करण्यासोबतच सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये फिरणेही आवश्यक आहे. कोणत्याही सुरक्षेशिवाय जास्त वेळ प्रखर उन्हात थांबल्यास युवी-ए आणि युवी-बी ही किरणे त्वचेवर गंभीर परिणाम करतात. त्वचेतील डीएनएला हानी पोहोचवून त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता अजून वाढवतात. त्यामुळे उन्हात काम करणार्‍यांनी त्वचा झाकणे हा साधा सोपा उपाय करावा.

Dr. Amruta Gite
Dr. Amruta Gite
BDS, Dental Surgeon Dentist, Pune
Dr. Nandita Bhati
Dr. Nandita Bhati
BDS, Dentist Implantologist, 14 yrs, Pune
Dr. ATUL KALE
Dr. ATUL KALE
MS/MD - Ayurveda, Ayurveda Neurotologist, 15 yrs, Pune
Dr. Kunal Janrao
Dr. Kunal Janrao
MDS, Dentist Periodontist, 6 yrs, Pune
Dr. Surekha Borade
Dr. Surekha Borade
MS/MD - Ayurveda, Yoga and Ayurveda General Physician, 16 yrs, Raigad