Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
 पू होणे
#रोग तपशील#बॅक्टेरियाचे संक्रमण



 पू होणे :

आपल्याला अपघातात जखम झाली आणि त्यावर योग्य उपचार नाही केले गेले किंवा वेळेवर उपचार नाही झाले तर त्यात पू होतो. जखमेतील जंतुंमुळे सेप्टीक किंवा पू होतो. ज्या व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती कमजोर असते त्यांना असा पू होण्याचा धोका अधिक असतो.

जखम झाली किंवा ती चिघळली की त्यात पू होतो. पण काहीवेळा शरीरातंर्गत अवयवांमध्येही पू होतो. पू होणे या स्थितीकडे तीन पायर्‍यांमध्ये पाहिले जाते. जखम झाली, त्यात पू होणे, तो बरा न होता पसरून अवयव बधीर होणे आणि रक्तदाब कमी होणे. त्यामुळे जखमेत पू झाल्यास गंभीर स्थिती येण्याआधीच वेळीच त्यावर उपचार होण्याची आवश्यकता असते. जखमेतील पू हा संसर्गजन्य आजार नाही पण ज्यामुळे पू झाला आहे त्या जीवाणूंचा संसर्ग दुसर्‍या व्यक्तीला होऊ शकतो.

लक्षणे : आपल्या शरीरात किंवा जखमेत पू झाला असेल तर शरीर काही लक्षणांनी आपल्याला सुचित करण्याचा प्रयत्न करीत असते ते समजून घ्यायला हवे.

1) शरीराचे तापमान 38.3 अंशांवर जाते किंवा ते 36 अंशाच्या खाली असते.
2) हृदयाचे ठोके प्रति मिनिट 90 इतके वाढतात.
3) एका मिनिटात वीस वेळा श्‍वास घ्यावा लागतो.

गंभीर सेप्सिस : आपल्या शरीरात पू झाला असेल आणि स्थिती गंभीर आहे की नाही हे दर्शवणारी काही लक्षणे आपल्यामध्ये दिसतात का त्याकडे लक्ष द्या. कदाचित गंभीर स्थितीमुळे एखादा अवयव निकामी होऊ शकतो.
मूत्रविसर्जनाचे प्रमाण कमी होते. मेंदूच्या स्थितीत विचित्र बदल होणे रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होणे श्‍वसनास त्रास होणे हृदयाची विचित्र धडधड होणे

पोटात दुखणे-
सेप्टीक शॉक : सेप्टिक शॉक या स्थितीचे निदान होण्यासाठी पू होण्याच्या गंभीर परिस्थिती लक्षणे आणि चिन्हे दिसून येतात. यात रक्तदाब खूप कमी होतो शिवाय पेयपदार्थ दिले तरीही शरीर त्याला प्रतिसाद देत नाही.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
बर्‍याचदा पू होणे या समस्येची गंभीर स्थिती रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांबाबत प्रकर्षाने जाणवते. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर किंवा गंभीर परिस्थिीत आयसीयूमध्ये ठेवलेले असते त्यांच्यामध्ये सेप्सिस किंवा पू होण्याचा सर्वाधिक संभव असतो. त्यामुळे आपल्याला जर संसर्ग झाला असेल किंवा शरीरावर तशी काही लक्षणे दिसून येत असली आणि शस्रक्रियेनंतर पू झाल्याची लक्षणे दिसत असतील तसे रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्यावर संसर्ग झाला असेल तर लगेचच डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी.

कारणे कोणती?
मुळातच पू होणे हे जीवाणू, विषाणू किंवा बुरशी यांच्यामुळे घडते. याखेरीज न्युमोनिया, पोटातील संसर्ग, मूत्राशयाचा संसर्ग, रक्तातील संसर्ग यांमुळेही पू होऊ शकतो.
पू होण्याचे प्रमाण अधिक असण्याची काही कारणे असतात ती समजून घेतली पाहिजेत.

* कमजोर प्रतिकार शक्ती : एचआयव्ही, कर्करोग किंवा ट्रान्सप्लांट करतानाची औषधे या सर्व कारणांमुळे माणसाची प्रतिकार शक्ती कमजोर होते.

* औषधाला प्रतिकार कऱणारे जीवाणू : बर्‍याचदा शरीराला औषधाची सवय झाल्याने जीवाणू औषधाला दाद देईनासे होतात. अशाच जीवाणूंमुळे शरीरात संसर्ग वाढतो आणि सरते शेवटी पू होण्यास ते जबाबदार ठरतात.

* ज्येष्ठांमध्ये प्रमाण अधिक : ज्येष्ठ नागरिकांनामध्ये सूज येण्याचे प्रमाण वाढते तेव्हा सूज आल्यानेही सेप्सिस होण्याचा धोका असतो. त्यामुळे पासष्ट वयापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना सूजेमुळे पू होण्याचा धोका असतो.

* गुंतागुंत कशामुळे? : सेप्सिस मध्ये गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. खरेतर अगदी प्राथमिक अवस्था ते गंभीर अशी अवस्था निर्माण होते. पण अति पू झाल्याने शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांच्या रक्तपुरवठ्यावर नक्कीच परिणा होतो. हृदय, मेंदू आणि मूत्राशय यांना रक्तपुरवठा न झाल्यास त्यांचे क्षमता कमी होते. त्याशिवाय काही वेळा अवयवांमध्ये रक्ताच्या गुठळ्याही निर्माण होतात. त्यामुळेही रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊन गँगरिन होऊन तो अवयव निकामी होऊ सखतो.

जखमेत पू होणे ही तशी वरवरची समजली जाणारी गोष्ट वाटते पण त्यामुळे शरीरात संसर्ग होऊन मृत्यूही ओढवू शकतो. पू होण्याची अतिगंभीर परिस्थिती पन्नास टक्के मृत्यूला कारणीभूत ठरते. त्याशिवाय शरीरात सतत पू होत असेल तर भविष्यात संसर्ग होण्याची शक्यता वाढतेच

धोकादायक घटक :
पू होणे ही साधीशीच सगळीकडे आढळणारी गोष्ट आहे पण ती खूप गंभीर आणि धोकादायक होऊ शकते. आपल्या प्रतिकार शक्तीकडे दुर्लक्ष केले असेल. आजारी असून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल असाल शरीरावर भाजणे, जखम असेल.

Dr. Piyush  Jain
Dr. Piyush Jain
MS - Allopathy, Ophthalmologist Pediatric Ophthalmologist, 5 yrs, Pune
Dr. Amol Sonawane
Dr. Amol Sonawane
BHMS, Homeopath, 10 yrs, Pune
Dr. Vinay Sachdeva
Dr. Vinay Sachdeva
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 5 yrs, Pune
Dr. Sneha Kale
Dr. Sneha Kale
MS/MD - Ayurveda, Ayurveda Gynaecologist, 3 yrs, Pune
Dr. Sonal Shendkar
Dr. Sonal Shendkar
MBBS, Dermatologist Medical Cosmetologist, 7 yrs, Pune