Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
फॅरिन्जायटिस
#रोग तपशील#घशाचा दाह



फॅरिन्जायटिस :

स्ट्रेप्टोकोकल फॅरिन्जायटिस, स्ट्रेप्टोकोकल टॉन्सिलायटिस किंवा स्ट्रेप्टोकोकल सोअर थ्रोट (या सगळ्याला मिळून ’स्ट्रेप थ्रोट’ असे म्हणतात). हा ग्रूप ए स्ट्रेप्टोकोकल संसर्गामुळे होणारा एक प्रकारचा घशाचा विकार आहे. त्याचा परिणाम घशाची पोकळी, घशातल्या गाठी आणि शक्यतो स्वरयंत्रावरही होतो. ताप, घसा येणे, आणि स्वरयंत्रावर आलेली सूज ही याची लक्षणे आहेत. या आजारामुळे ३७% मुलांचे आणि ५-१५% मोठ्यांचे घसे बसतात. 'स्ट्रेप थ्रोट' हा एक संसर्गजन्य आजार आहे. रुग्णाच्या निकटच्या सहवासात आल्याने तो पसरतो. घशात वाढत असलेया जंतूंची तपासणी केल्यानंतर या आजारचे ठोस निदान करता येते. पण प्रत्येक वेळी याची गरज नसते. लक्षणे बघूनही औषधोपचार सुरू करता येतात. ज्या ठिकाणी 'स्ट्रेप थ्रोट' असण्याची दाट शक्यता आहे किंवा तसे ठोस निदान झाले आहे, तिथे प्रतिजैविके देऊन रोगाची पुढची गुंतागुंत थांबविता येते आणि त्यामुळे लवकर बरेही वाटू लागते.

लक्षणे :
- घसा बसणे.
- ३८ डिग्री सेल्सियसपेक्षा( ३८ °से (१०० °फॅ) ) जास्त ताप.
- घशाच्या गाठींवर झालेला पू आणि स्वरयंत्रावर आलेली मोठी सूज ही फॅरिन्जायटिसची ठराविक लक्षणे आहेत.

अजून काही लक्षणे म्हणजे:
- डोकेदुखी,
- मळमळ,
- उलट्या,
- उदरात कळ उठणे.
- अंग दुखणे.
- चट्टा उठणे किंवा टाळूला बाधा होणे. टाळूला बाधा होणे हे अतिशय विरळ, पण निश्चित असे लक्षण आहे. याचा रोगजंतूंनी शरीरात प्रवेश मिळविल्यानंतर प्रत्यक्ष रोगाचा आरंभ होईपर्यंतचा काळ हा एक ते तीन दिवस असतो. जर ताप नसेल, पण डोळे येणे, घसा बसणे, सर्दी वाहणे किंवा अल्सर होणे हे असेल, तरी तो स्ट्रेप थ्रोट असण्याची शक्यता कमी आहे.

कारणे :
- ग्रूप ए बीटा-हेमोलायटिक स्ट्रेप्टोकोकस या जंतूंमुळे स्ट्रेप थ्रोटची लागण होते.
- ग्रूप ए बीटा-हेमोलायटिक स्ट्रेप्टोकोकस नसलेले जंतू आणि फ्यूजोबॅक्टेरियम यांमुळे देखील घशाचे विकार होऊ शकतात.
- बाधित व्यक्तीच्या निकटच्या सहवासाने अथवा स्पर्शाने या आजाराचा प्रसार होतो. त्यामुळे गर्दीची ठिकाणे, जसे की लष्करी ठाणी अथवा शाळा इथे या रोगाचा प्रसार वेगाने होतो. असेही संशोधन झाले आहे की धुळीत असलेले वाळलेले सूक्ष्मजंतू हे संसर्गजन्य नसतात, परंतू टूथब्रशसारख्या वस्तूंवर ओलसर सूक्ष्मजंतू हे पंधरा दिवसांपर्यंत टिकून राहू शकतात.
- एकही लक्षण दिसत नसलेल्या लहान मुलांच्या घशात सुमारे १२% गॅसचे सूक्ष्मजंतू असू शकतात.

घसा खवखवत असेल तर घशामध्ये खरखर, वेदना होतात. नाक व तोंडावाटे शरीरीला जीवजंतूंचा संसर्ग होऊ शकतो. घश्याचे इनफेक्शन होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. वातावरणातील बदलामुळे अथवा थंड पदार्थ खाल्यामुळे घसा दुखू शकतो. थंड पदार्थामुळे घशातील नाजूक भागाला जीवाणूंचा संसर्ग होतो. इनफेक्शनमुळे घसा दुखत असेल तर नेहमीप्रमाणे काम करणे देखील कठीण होते. घसा दुखत असल्यास या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो.

कोमट पाणी अथवा द्रवपदार्थ प्या-
कोमट पाण्यामुळे घशाचा दाह कमी होतो.तुम्हाला कोमट पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही गरम सूप अथवा एक कप आल्याचा चहा घेऊ शकता. त्याचप्रमाणे भरपूर पाणी प्यायल्यामुळे देखील तुमचा घसा कोरडा न रहाता ओलसर राहील व तुम्हाला अधिक आराम मिळेल.

गुळण्या करा-
घशामध्ये खवखवण्याचा त्रास होत असेल तर कोमट पाण्यामध्ये मीठ घालून गुळण्या करा. यामुळे तुम्हाला चांगला आराम मिळू शकेल. या मीठाच्या पाण्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा हळद देखील घालू शकता.मीठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे घशामधील कफचा अडथळा कमी होतो व गरम पाण्यामुळे कफ पातळ झाल्यामुळे बाहेर टाकणे सोपे होते सहाजिकच त्यामुळे घशाचा दाह कमी होतो. एक मध्यम आकाराच्या ग्लासभर पाण्यात तीन कडीलिंबाची पाने घेऊन ते पाणी उकळा. पाणी थंड झाल्यावर त्यामध्ये एक चमचा मध टाका व त्या पाण्याच्या गुळण्या करा तुम्हाला त्वरीत आराम मिळेल.

गरम पाण्याचे वाफारे घ्या-
गरम पाण्याच्या वाफा घेतल्याने घशातील श्वसनमार्गाला आराम मिळतो. कधीकधी यावर कोमट पाण्याने अंघोळ केल्यास देखील बरे वाटते. अशा वेळी पाण्यात निलगिरीच्या तेलाचे काही थेंब टाकल्याने देखील पटकन बरे वाटू शकते.

दमट वातावरणात रहा-
कोरड्या हवेमुळे घश्याला त्रास होतो. ह्यूमीडीफायर मुळे तुमच्या खोलीतील वातावरण दमट होईल व तुमच्या घश्याला आराम मिळेल.

खोकल्यावर गुणकारी पदार्थ तोंडात ठेवा-
घसा दुखत असल्यास बाजारात मिळणा-या खोकल्यावरच्या गोळ्या तोंडात ठेवा. त्यातील थंडाव्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.मिंथॉल व मधासारख्या अॅन्टीसेफ्टिक घटकांमुळे तुमच्या घसा कमी खवखवेल. अशा गोळ्या बाजारात सहज उपलब्ध असतात. मऊ पदार्थ खा व तिखट,आंबट,तळलेले पदार्थ खाणे टाळा.
घसा दुखत असल्यास अन्नपदार्थ गिळणे कठीण जाते. त्यामुळे घशाला वेदना न होता गिळता येतील असे मऊ अन्नपदार्थ खा. तिखट व अॅसिडीक अन्नपदार्थांमुळे घशाला त्रास होतो त्यामुळे घसा दुखत असल्यास हे पदार्थ खाणे टाळा. त्याचप्रमाणे तेलकट पदार्थ देखील खाणे टाळा कारण ते कडक व क्रिस्पी असल्याने ते गिळताना तुम्हाला वेदना होऊ शकतात.

ओटीसी औषधे घ्या-
कफ सुकल्यामुळे किंवा इनफेक्शनमुळे घसा खवखवू लागतो. अशा वेळी ओटीसी औषधे घेतल्याने आराम मिळू शकतो. कफ सुकल्यामुळे तो प्रवाहीत होत नाही व घशामध्ये अडथळा निर्माण होतो. पण या औषधांमुळे कफ पातळ झाल्यामुळे बाहेर टाकता येतो व बरे वाटू लागते.

घरगुती उपाय करा-
घसा दुखत असल्यास घरगुती उपायांचा देखील चांगला फायदा होऊ शकतो. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणा-या मधात अॅन्टी-वायरल व अॅन्टी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे घसा दुखत असल्यास त्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे आले,काळीमिरी,मध,लसूण,तुळस आणि हळद यामुळे देखील तुम्हाला आराम मिळू शकतो. त्यामुळे हे पदार्थ वापरुन तयार केलेली चहा किंवा पेय घ्या.

इतर काही घरगुती उपाय-
- घसा दुखत असल्यास आल्याचा तुकडा तोंडात ठेऊन चावा.त्यामुळे तुम्हाला लवकरआराम मिळेल.किंवा आल्याचे चार तुकडे,दोन टोमॅटो,मध यांचा रस करुन प्या.
- पाण्यात मध व कांदा टाकून उकळा व गाळून ते पाणी थोडयाथोड्या वेळाने प्या.
- मधात काही लवंगा टाका.काही तासांनी लवंगा काढून त्याचे चाटण खा.लवंगामुळे वेदना कमी होतील व मधाने घशाला आराम मिळेल.
- पाण्यात बडीसोप टाकून ते काही मिनीटे उकळा त्यानंतर पाणी गाळून घ्या व त्यात मध टाकून थोड्या थोड्या वेळाने प्या.
- लिंबाचा रस व एक चमचा मध टाकलेले गरम पाणी प्या.
- भरपूर आराम करा.व्यवस्थित आराम केल्यामुळे शरीर इनफेक्शनला प्रतिकार करु शकते.

Dr. Chandrashekhar Jadhav
Dr. Chandrashekhar Jadhav
BAMS, Ayurveda Child Abuse Pediatrician, 15 yrs, Pune
Dr. Supriya Jagtap
Dr. Supriya Jagtap
BHMS, Family Physician Homeopath, Pune
Dr. Dr.Monica Rathod
Dr. Dr.Monica Rathod
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, Thane
Dr. Sonali  Satav
Dr. Sonali Satav
MD - Homeopathy, Family Physician Homeopath, 10 yrs, Pune
Dr. Kirti Dagor
Dr. Kirti Dagor
BAMS, Ayurveda Panchakarma, 11 yrs, Pune