Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
पार्किन्सन्स (कंपवात)
#रोग तपशील#पार्किन्सन रोग



पार्किन्सन्स (कंपवात) :
मेंदूचा जो भाग शरीराच्या हालचालींवर नियंत्रण करतो त्या भागातील चेतापेशींचा हळूहळू नाश जिच्यात होतो ती विकृती म्हणजे कंपवात. हातांना कंप सुटणे, स्नायू ताठर होणे, हालचालींमध्ये शिथिलता येणे आणि शरीराचा तोल सांभाळण्यात अडचण येणे. ही या विकाराची मुख्य लक्षणे आहेत. कंपवात झालेली व्यक्ती स्थिर बसलेली असताना त्या व्यक्ती उभी राहिल्यास तिचे धड पुढे कलालेले दिसते. १८१७ साली ब्रिटीश वैद्यक जेम्स पार्किन्सन याने प्रथम ही स्थिती लोकांच्या नजरेस आणून दिली, म्हणून या विकृतीला 'पार्किन्सन रोग' असेही म्हणतात. पार्किन्सन्स एक असा आजार आहेत, जो 55 वर्ष वयाच्या वरच्या व्यक्तीला होतो. यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या होतात. या आजारावर परमानंट उपचार नाही. परंतु योग्य वेळी यावर ट्रीटमेंट घेतली तर ही समस्या कमी केली जाऊ शकते.

कंपवाताची लक्षणे

कंपवात हा मध्यवर्ती चेतासंस्थेचा विकार आहे. मज्जारज्जूच्या वरच्या टोकाला त्याच्याशी सलग असा मेंदूचा मस्तिष्क स्तंभ (ब्रेन स्टेम) असतो. मस्तिष्क स्तंभातील कृष्णद्रव्य क्षेत्र (सबस्टॅंन्शिया नीग्रा) या भागातील चेतापेशींपासून डोपामाइन हे रसायन स्रवले जाते. कंपवातात या चेतापेशी हळूहळू मृत होत जातात. डोपामाइन हे चेतापारेषक रसायन असून एका चेतापेशीपासून दुस-या चेतापेशीकडे संवेद वाहून नेण्याचे कार्य करते. डोपामाइनमध्ये घट झाल्याने ज्या चेता शरीराच्या हालचालींवर नियंत्रण करण्यास मदत करतात, त्या चेतांच्या संदेशाच्या मार्गात बिघाड होतो. जसजसे या चेतापेशी अधिक प्रमाणात मृत पावतात, तसतसे ठराविक हालाचालींवर नियंत्रण करणे अशक्य होते. कंपवात झालेल्या व्यक्ती ब-याचदा अडखळत चालताना दिसतात. तसेच या व्यक्तींना खाणे, पिणे किंवा लिहिणे कठिण जाते. त्यांच्या चेह-यावरचे स्नायू ताठरल्यामुळे चेहरा मुखवट्याप्रमाणे भासतो. खुर्चीतून एकदम उठताना तोल जाण्याची शक्यता असते. काही वेळा यामुळे रुग्णाला विषण्णता (डिप्रेशन) किंवा विस्मृती असे मानसिक आजार होऊ शकतात व त्यांतून गंभीर स्वरुपाची दुर्बलता उद्भवू शकते.

कारणे
सामान्य स्वरुपाचा कंपवात हा विकार बहुधा ५० ते ७० वयादरम्यान व्यक्तींना होण्याची शक्यता असते. मात्र यामागील निश्चित कारणे अजून माहीत नाहीत. कीटकनाशकांच्या संपर्कातील व्यक्तींमध्ये आणि ग्रामीण व्यक्तींमध्ये कंपवात अधिक प्रमाणात आढळतो. ५० वर्षांखालील व्यक्तींमध्ये कंपवात दिसून आल्यास त्याचे कारण जनुकांमधील दोष असल्याचे मानतात; परंतु बहुतांशी रुग्णांना होणारा कंपवात हा आनुवंशिक विकार नाही, हे संशोधनातून दिसून आले आहे.

उपचार
- मेंदूमधील कमी झालेले डोपामाइनचे प्रमाण पूर्ववत करणे, ही कंपवातावरील मुख्य इलाज मानला जातो. डोपामाइन हे औषधाच्या स्वरुपात देता येत नाही, कारण ते रक्तप्रवाहामधून मेंदूत शिरत नाही; परंतु लेवोडोपा किंवा एल् डोपा ही औषधे मेंदूत शिरतात आणि ज्या चेतापेशी मृत झालेल्या नसतात, त्या चेतापेशींमार्फत या औषधांचे डोपामाइनमध्ये रुपांतर होते. अनेक रुग्णांमध्ये एल् डोपा औषधांमुळे विकाराच्या सुरुवातीच्या काळात रुग्णांच्या लक्षणांमध्ये आश्चर्यकारक बदल दिसून आले आहेत; परंतु जसजसा हा विकार जुना होतो तसे अनेक रुग्णांमध्ये या औषधाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून आले आहे. अनेक रुग्णांमध्ये या औषधामुळे दुष्परिणाम घडून आले आहेत. अशा काही रुग्णांना एल् डोपाबरोबर अन्य औषधे घेण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जातो.

- काही रुग्णांच्या बाबतीत, कंपवाताची स्थिती मेंदूच्या ज्या भागातील चेतापेशीमुळे उद्भवते तेवढा भाग शस्त्रक्रियेने निष्क्रिय केला जातो. मागील काही वर्षांत, रुग्णातील डोपामाइन स्रवणा-या चेतापेशींची कमतरता भरून काढण्यासाठी अन्य स्रोतापासून डोपामाइन स्रवणा-या पेशींचे प्रत्यारोपण मेंदूत करण्याचे प्रयत्न संशोधक करीत आहेत. काही वेळा मेंदूच्या अंतर्भागात मस्तिष्क उद्दीपन यंत्रिका बसवून तिच्यादवारे मेंदूच्या काही भागांना विद्युत् स्पंद देण्याचे तंत्रही वापरले जाते.

Dr. Vipul Jaiswal
Dr. Vipul Jaiswal
MS/MD - Ayurveda, Ayurveda General Physician, 11 yrs, Pune
Dr. Gauri  Nerurkar
Dr. Gauri Nerurkar
BHMS, Dermatologist, 10 yrs, Pune
Dr. Chandrashekhar Jadhav
Dr. Chandrashekhar Jadhav
BAMS, Ayurveda Child Abuse Pediatrician, 15 yrs, Pune
Dr. Bhagyashri Madake- Kuber
Dr. Bhagyashri Madake- Kuber
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 4 yrs, Pune
Dr. Sujeet Ranjane
Dr. Sujeet Ranjane
BAMS, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune