Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
मुलांना वेळ देणे शक्य नसलेल्या पालकांनी 'हे' कराच!
#पालक वर्ग

आजकल रोजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वच जण शर्यतीत धावत असतात. या स्पर्धेच्या युगात त्यांना स्वत:साठीही वेळ देणं कठीण झाले आहे. त्यातच लहान मुले असतील आणि आई-वडील दोघेही नोकरीला जाणारे असतील तर मुलांसाठी वेळ काढणं मुश्किल होतंय. प्रत्येक पालकांना आपल्या मुलांसह क्वालिटी टाईम व्यतीत करायचा असतो. परंतु, नोकरी आणि घर अशा दोन्ही गोष्टी सांभाळताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते. परंतु या सगळ्यामधून वेळ काढून काही सोप्या पद्धतीने तुम्ही मुलांना वेळ नक्की देऊ शकता.

मोबाईलपासून दूर राहा

घरी असताना पालकांनी मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या गोष्टी बाजूला सारून तो वेळ आपल्या मुलांसह व्यतीत करा. त्यामुळे मुलं दिवसभरातील त्यांनी केलेल्या गोष्टी तुम्हाला सांगू शकतील.

शॉपिंगसाठी शक्यतो बाहेर पडू नका

जर तुम्ही घरी असाल तर शॉपिंगसाठी शक्यतो घराबाहेर पडू नका. अतिशय गरज असेल तिथेच बाहेर पडा. शॉपिंगच्या वेळेत तुमच्या लहान मुलांसोबत खेळा. त्यांच्याशी गप्पा मारा.

नियमित व्यायाम करा

जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर तुमच्यासोबत तुमच्या मुलांनाही त्यात सामिल करा. त्यांनाही तुमच्यासोबत मॉर्निग वॉकसाठी बाहेर घेऊन जा. त्यामुळे त्यांनाही चांगल्या सवयी लागून आरोग्यही उत्तम राखण्यास मदत होईल. त्यासोबतच तुम्ही एकमेकांसोबत अधिक वेळ घालवू शकाल.

सोशल साइट्सवर कमी वेळ द्या

आजकल सर्वच पालक फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल साइट्सवर अॅक्टिव्ह असतात. त्यामुळे मुलांना कमी वेळ दिला जातो. सोशल साइट्सपेक्षा मुलांसोबत खेळा, त्यांच्यासोबत फिरायला जा, त्यामुळे तुम्हाला अधिकाधिक वेळ मुलांसोबत मिळू शकतो.

मुलांसोबत तुम्हीही 'लहान' व्हा

पालकांनो, मुलांसोबत असताना तुम्हीही लहान मुलांसारखं वागा. त्यांच्याबरोबर त्यांना आवडत असणाऱ्या गोष्टी करा. काही वेळासाठी तुमच्यातील मॅच्युरिटी बाजूला ठेऊन लहान होऊन मुलांसोबत खेळा. त्यामुळे मुलं खुश राहून तुमच्याशी अधिक खुलेपणाने राहू शकतील.

Dr. Swapnil Dhamale
Dr. Swapnil Dhamale
BHMS, Family Physician Homeopath, 1 yrs, Pune
Dr. Vivek  Sahu
Dr. Vivek Sahu
MD - Homeopathy, 17 yrs, Pune
Dr. Shrikant Choudhari
Dr. Shrikant Choudhari
MS/MD - Ayurveda, General Surgeon, 6 yrs, Pune
Dr. Geeta Dharmatti
Dr. Geeta Dharmatti
Specialist, dietetics, 22 yrs, Pune
Dr. Hema Chandrashekhar
Dr. Hema Chandrashekhar
BAMS, Ayurveda Family Physician, 28 yrs, Pune