Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
मोतीबिंदू
#रोग तपशील#धूसर दृष्टी



मोतीबिंदू

मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग धुरकट होणे होय. सामान्य डोळ्यात प्रकाशकिरण पारदर्शक भिंगाद्वारे मागील पडद्यावर केंद्रित होतात. उत्तम दृष्टीकरिता नैसर्गिक भिंग (लेन्स) पूर्णतः पारदर्शक असणे आवश्‍यक असते. जेव्हा या लेन्सची पारदर्शकता मोतीबिंदू झाल्याने कमी होते तेव्हा रुग्णास अंधूक दिसू लागते. मोतीबिंदू अर्थात लेन्सला आलेला गढूळपणा काळानुसार वाढतच जातो व रुग्णास अधिकाधिक अस्पष्ट दिसू लागते. नेत्रमणी हा बहुतांशी प्रथिने व न्यूक्लिक आम्ल या जैविक रसायनांपासून बनलेला असतो. यात काही कारणांनी बदल झाल्यास नेत्रमण्यांची पारदर्शकता कमी होत जाते. त्यामुळे दृष्टी कमी होते. नेत्रमण्याच्या कोणत्याही भागास पारदर्शकत्व आले तर त्याला मोतीबिंदू असे म्हणतात.

कारणे
- बरीच वर्षे कामासाठी किंवा काही नेहेमीच्या प्रसंगी सतत प्रखर प्रकाशाला सामोरे गेल्यास.
- मधुमेह
- दम्यासाठी स्टिरॉईड घेणे.
- धुम्रपान किंवा दारू पिणे.
- जन्मतःच मोतीबिंदू असल्यास.
- ग्लॉकोमासारखी डोळ्यांची इतर समस्या असल्यास.

लक्षणे
- डोळ्यांच्या बाहुल्या धुरकट किंवा सफेद होणे. डोळ्यांच्या मध्यभागी असणारा काळा गोल म्हणजे बाहुली.
- रंग फिक्कट दिसतात.
- सर्व काही अस्पष्ठ दिसते.
- प्रकाशामुळे डोळे दुखतात व प्रकाश अतिप्रखर वाटतो.
- रात्रीच्या वेळी प्रकाशाभोवती वलये दिसतात.
- एका डोळ्याने दुहेरी दिसणे.
- रात्रीच्या वेळी स्पष्ट न दिसणे.
- चष्म्याची किंवा दृष्टीची औषधपत्रे सतत बदलणे.

मोतीबिंदू टाळण्यासाठी...

मोतीबिंदू होऊ नये म्हणून नियमित आहार, व्यायाम, प्रथिनांचा आहारातील योग्य समावेश ‘अ’ आणि ‘ई’ जीवनसत्त्वे असलेली फळे व हिरव्या पालेभाज्या यांचा जेवणात समावेश करावा. डोळ्यांवरचा अतिरिक्त ताण टाळण्यासाठी दरदिवशी संगणकाचा सहा तासांपेक्षा अधिक वापर करू नये.

मोतीबिंदू वितळवून टाकणाऱ्या औषधाचा शोध

भारतीय संशोधिकेचा सहभाग

भारतीय वंशाच्या संशोधकासह काही संशोधकांनी मोतीबिंदू नष्ट करण्याचे डोळ्यात टाकण्याचे औषध शोधून काढले आहे. मोतीबिंदूमुळे दृष्टी जात असते. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करता येत असली तरी ती तुलनेने खर्चीक असते व अनेक लोक विकसनशील देशात त्यामुळे उपचाराअभावी आंधळे होतात, असे संशोधकांचे मत आहे. मोतीबिंदू हा जास्त वयात होणारा नेत्ररोग असून काही प्रथिनांचे कार्य बिघडल्याने तो होतो. पार्किसन्सन म्हणजे कंपवात व अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंशासारखाच तो विशिष्ट वयानंतर होतो. मोतीबिंदूत क्रिस्टलिन नावाची प्रथिने बाधित होतात. ही प्रथिने काही पेशींचा भाग असतात व त्या पेशींपासून डोळ्यांचे भिंग तयार होत असते, असे कॅलिफोर्निया विद्यापीठाचे जॅसन गेस्टविकी यांनी सांगितले.
लीह एन मॅकले व कॅथरिन मॅकमेनिमेन यांनी क्रिस्टलिन व त्यांचे अमायलॉईड्स शोधून काढले. अ‍ॅमायलॉईड्स हे लवकर वितळतात. मिशिगन विद्यापीठाच्या जिनॉमिक विभागाने म्हटले आहे की, एचटी डीएसएफ ही पद्धत वापरून अमायलॉइड्स तापवले, त्यात २४५० संयुगे वापरण्यात आली व त्यातील बारा हे स्टेरॉल्स होते. त्याचे नाव लॅनोस्टेरॉल असून त्यामुळे मोतीबिंदू नाहीसा होतो.
२०१५ मध्ये नेचर या नियतकालिकात हा निबंध प्रसिद्ध झाला होता पण लॅनोस्टेरॉलची विद्राव्यता कमी आहे. गेस्टविकी यांच्या मते ३२ स्टेरॉल्सची चाचणी नंतर केली गेली, त्यात संयुग २९ नावाचे रसायन मोतीबिंदूला वितळवून टाकते. यात क्रिस्टॅलिन्स स्थिर झाले तर अ‍ॅमालयलॉइडसची निर्मिती रोखण्यात आली. जे अ‍ॅमायलॉइडस आधी तयार झाले होते ते संयुग २९ नावाच्या रसायनाने वितळवून टाकले. उषा पी अँडले या वॉशिंग्टन विद्यापीठातील प्राध्यापिकेचा संशोधनात सहभाग असून डोळ्यात घालायच्या या औषधाने उंदरांचा मोतीिबदू बरा करण्यात आला. मानवी डोळ्यातून काढलेल्या मोतीबिंदूवर या रसायनाचे थेंब टाकले असता मोतीिबदू वितळून गेला. सायन्स नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

Dr. Dinkar Padade
Dr. Dinkar Padade
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 30 yrs, Pune
Dr. Anjali Bartakke
Dr. Anjali Bartakke
DNB, Pediatrician, 18 yrs, Pune
Dr. ATUL KALE
Dr. ATUL KALE
MS/MD - Ayurveda, Ayurveda Neurotologist, 15 yrs, Pune
Dr. Lalit deshmukh
Dr. Lalit deshmukh
BHMS, Family Physician, 14 yrs, Pune
Dr. Pradnya Deshmukh
Dr. Pradnya Deshmukh
BAMS, Ayurveda, 18 yrs, Pune