Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
कॅल्शियमची कमतरता
#रोग तपशील#कॅल्शियमची कमतरता



कॅल्शियमची कमतरता

निरामय हाडांसाठी कॅल्शियमची खूप गरज असते. कॅल्शियमचे शरीरात कमी होणारे प्रमाण हे अन्य आजारांना निमंत्रण देते. त्यामुळे ही तूट वेळीच लक्षात घ्यायला हवी. त्यावर उपायही योजायला हवेत. कॅल्शियम हा दात आणि हाडांमधील अत्यंत मूलभूत घटक आहे. त्यामुळे पेशींच्या कार्यासोबत, हाडांचे प्रसरण व आकुंचन पावणेही अवलंबून असते. पेशीचे विभाजन, प्रवाही रक्त, रक्तातील अन्य घटकांचे प्रभावी कार्यक्षमतेसाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. ही कॅल्शियमची मात्रा नेमकी किती प्रमाणात असावी, याचे व्यक्तीनुसार वैद्यकीय ठोकताळे निराळे असतात. त्याची तूट हाडांची दुखणी निर्माण करते तर त्याचा अतिरिक्त पुरवठ्यामुळे हाडे तुटण्याची शक्यता असते.

* कॅल्शियम कमी असल्यास काय होते?

>> टेटनी नावाच्या शरीरातील स्नायूचे कोणत्याही वेळी आकुंचन, प्रसरण होऊन विशिष्ट प्रकारचा हाडांच्या दुखण्याचा अॅटॅक येण्याची शक्यता.
>> चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये बिघाड किंवा सांधे तसेच हातांच्या स्नायूंमध्ये वेदना.
>> श्वासनलिकेतील स्नायूमध्ये अडसर
>> रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कमी असल्यामुळे स्नायूचे वेगाने आकुंचन व प्रसरण
>> कॅल्शियमच्या अतिरिक्त सेवनामुळे मूतखडा होण्याची शक्यता
>> मूतखड्याचा प्रभाव रिनल कोलिक किंवा रिनल फेल्युअरमध्ये परावर्तित
>> उच्चरक्तदाबाच्या तक्रारी

* कॅल्शियमची गरज कशासाठी?

कॅल्शियममुळे शरीरात जैविक घटकांचे संतुलन कायम राहतेहाडांच्या स्वास्थासाठी आवश्यक असणारा महत्त्वाचा घटक. त्यामुळे शरीरात स्केलेटन या भागाच्या निर्मितीमधील कॅल्शियम क्षारांची निकड पूर्ण होते.स्केलेटनमध्ये कॅल्शियम लोहाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे शरीरातील जैविक क्रियांचे संतुलन राहते. मानवी शरीरातील ९९ टक्के कॅल्शियम हे स्केलेटनमध्ये तर एक टक्का कॅल्शियम हे हाडे आणि दातांत असते. शरीराला कॅल्शियमचा पुरवठा योग्य प्रमाणात झाला नाही तर कॅल्शियमच्या विविध स्रोतांमधून शरीर ही तूट भागवते. परिणामी हाडे ठिसूळ होतात. दात किडतात किंवा हलू लागतात.

शरीराला आहारातून मुख्यत्वे कॅल्शियम मिळत असते. मूत्रविसर्जनातून जे घटक जातात त्यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. म्हणून कॅल्शियमचा मुख्यत्वे मोठा साठा हा स्केलेटनमध्ये असतो. कॅल्शियमचे शरीरात प्रमाण कमी झाले तर बाह्योपचारांमध्ये कॅल्शियमची औषधे वा गोळ्यांच समावेश केला जातो. त्यात कॅल्शियम फॅास्फेटचाही समावेश असतो.

>> कॅल्शियम संप्रेरकासारखे काम करते. त्यामुळे पेशींचे आरोग्य बळकट होते, आहारातून शरीराला मिळालेला कॅल्शियमचा पुरवठा हा रक्तघटकांमधील कॅल्शियमचे प्रमाण कायम संयत ठेवतो.

>> गरोदरपणात स्नायूंच्या बदलांमध्ये शरीरातील हाडांच्या संरचनेत थोडा बदल होतो. त्यामुळे यावेळी कॅल्शियमची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते.

>> फ्रॅक्चर, वजन कमी होणे, कर्करोग, दीर्घकाळची विश्रांती यामुळे कॅल्शियमचा निगेटिव्ह बॅलन्स जमा होण्याची शक्यता असते. ज्यामुळे ऑस्टिओपोरायसिस होऊ शकतो.

>> शरीरात कॅल्शियमचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी पीटीएच म्हणजे पॅराथायराईड हार्मेान्स आणि डायहाड्रोऑक्सीक्लोलेकॅलकीफेरॅाल हे घटक नियंत्रणबिंदूचे काम उत्तम करतात.


Dr. Bhagyashri Madake- Kuber
Dr. Bhagyashri Madake- Kuber
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 4 yrs, Pune
Dr. Shrikant Tile
Dr. Shrikant Tile
MBBS, Gynaecologist, 10 yrs, Pune
Dr. Gopal Samdani
Dr. Gopal Samdani
MBBS, Pediatrician, 30 yrs, Pune
Dr. Pankaj  Patidar
Dr. Pankaj Patidar
BAMS, Ayurveda, 4 yrs, Pune