Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
दृष्टीदोष
#रोग तपशील#धूसर दृष्टी



दृष्टीदोष

दृष्टीदोष म्हणजे कमी दिसणे म्हणजेच सामान्य भाषेत डोळयाला नंबर लागणे. यात जवळचे किंवा लांबचे अंधुक दिसते. डोळयाच्या बाहुलीतून प्रकाशकिरण आत शिरून भिंगातून एकत्र होतात. यामुळे आतल्या पडद्यावर वस्तूची प्रतिमा उमटते. या प्रतिमेचे ज्ञान मेंदूपर्यंत पोहोचून आपल्याला दृष्टीज्ञान होते. जेव्हा प्रकाशकिरण आंतरपटलाच्या मागे किंवा पुढे एकत्रित होतात तेव्हा दृष्टीदोष होतो. डोळयाची बाहुली आणि पडदा यांमधले अंतर कमी-जास्त असेल तर प्रतिमा पडद्यावर अचूक व स्पष्ट पडत नाही. अशा वेळेला चष्मा (भिंग) वापरून हा दोष घालवता येतो. यासाठी नेत्रतज्ज्ञाची मदत घ्यावी लागते

लघुदृष्टी
सर्वसाधारणपणे लहान वयात येणारा दृष्टीदोष लघुदृष्टी प्रकारचा असतो. म्हणजे जवळचे दिसते पण लांबचे कमी दिसते या स्वरुपाचा हा दोष असतो. याचे कारण म्हणजे हा नेत्रगोल लांबट अंडाकृती असतो. त्यामुळे लांबची चित्रप्रतिमा नेत्रगोलाच्या आतल्या नेत्रपटलावर पोचत नाही म्हणून धूसर दिसते. भिंगापासून नेत्रपटलापर्यंतचे अंतर जास्त असणे हे याचे कारण असते. यामुळे मुले पुस्तक जवळ धरतात. मुलांना फळयावरचे नीट दिसत नाही. मुलाला ही अडचण नेमकी न सांगता आल्यामुळे वर्गात बोलणीही खावी लागतात.

अस्टिगमॅटिझम (बुबुळ वक्रता)
- बुबुळ वक्रतेमधील होणा-या बदलामुळे स्पष्ट दिसत नाही. यात डोळयामध्ये स्पष्ट प्रतिमा कोठेच निर्माण होत नाही. या विकारावर भिंग म्हणजे चष्मा लावावाच लागतो.

दृष्टीदोषाची लक्षणे डोळयांवर ताण पडल्याने डोके दुखते. (ही डोकेदुखी कपाळावर दोन्ही डोळयांच्या मधल्या भागात येते). फळयावरील छोटी अक्षरे मुलांना वाचता न येणे. फळा किंवा टी.व्ही., इ. दूरच्या वस्तूंकडे बघताना डोळे बारीक करणे. वाचताना पुस्तक तोंडाजवळ धरणे. जवळचे किंवा लांबचे नीट न दिसणे. जास्त तास वाचन केल्यास डोळयांवर ताण पडणे. तिरळेपणा दिसणे. डोळे किंवा डोकेदुखी. सुईत दोरा ओवताना, धान्य निवडताना त्रास होतो. दृष्टीदोषावरील उपचार
दृष्टीदोषाच्या प्रकाराप्रमाणे योग्य चष्मा वापरावा लागतो.

लहान वयात येणा-या या दृष्टीदोषावर योग्य प्रकारचे भिंग (चष्मा) वापरून दृष्टी सुधारता येते. वयाच्या 15व्या वर्षानंतर यासाठी योग्य कॉन्टॅक्ट लेन्स वापरता येईल. यासाठी नेत्रतज्ज्ञ मदत करतील. कॉन्टॅक्ट लेन्सचे अनेक प्रकार आहेत. यात सॉफ्ट (लवचिक) आणि सेमी सॉफ्ट (अर्ध लवचिक) असे मुख्य प्रकार आहेत. हल्ली यात अगदी अल्प किमतीत महिनाभर वापरून झाल्यावर टाकून देण्याचे (डिसपोझेबल्स) कॉन्टॅक्ट लेन्स उपलब्ध आहेत. लघुदृष्टी किंवा दीर्घदृष्टीवर लेसर किरणोपचार करून बुबुळाचा आकार सूक्ष्मरित्या बदलता येतो. याला 'लेसिक' असे नाव आहे. या उपचाराने चित्रप्रतिमा नेत्रपटलावर आणता येते. यामुळे चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सच्या ऐवजी डोळयाचा नंबर दुरुस्त करता येतो. ही शस्त्रक्रिया 18 वयानंतरच केली जाते. मात्र ही पध्दत पूर्णपणे सुरक्षीत नाही. यातून बुबुळाच्या आकार-वक्रतेचा फरक एकदा झाला की तो बदलता येत नाही. या उपचारासाठी खर्चही बराच आहे.

Dr. Rohit Kamate
Dr. Rohit Kamate
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 4 yrs, Pune
Dr. Pradip Pandhare
Dr. Pradip Pandhare
DNYS, 9 yrs, Pune
Dr. Nitin Shingare
Dr. Nitin Shingare
MS/MD - Ayurveda, Ayurveda Dermatologist, 9 yrs, Pune
Dr. Mayur Narayankar
Dr. Mayur Narayankar
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Vinod Shingade
Dr. Vinod Shingade
BHMS, General Physician Homeopath, 10 yrs, Pune