Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
स्नायूंमध्ये वेदना होणे
#रोग तपशील#स्नायू वेदना



अनेक तरुण आणि किशोरवयीन मुले स्नायू मजबूत करण्याच्या प्रयत्नात असतात. केवळ तरुणपणीच नव्हे तर वयाच्या प्रत्येक टप्प्यावर स्नायू मजबूत राहिले पाहिजेत. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांपासून आपण बचाव करू शकतो. यासाठी काय करावे लागेल?वयानुसार स्नायू कमजोर होणे अगदी नैसर्गिक आहे, पण आपल्या रोजच्या कामांमध्ये स्नायूंच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. धावपळीच्या आयुष्यात खरे पाहता आरोग्याकडे, शरीराकडे लक्ष दिले जात नाही, शिवाय जीवनशैलीतील बदल, आहारातील बदल, जंक फूडचे वाढलेले प्रमाण, अपुरी झोप, व्यायाम न करणे किंवा अतिव्यग्र आयुष्य जगणे या सर्वांचा परिणाम स्नायू कमजोर होतात. आपल्या आरोग्यासाठी मजबूत स्नायूंचे काय महत्त्व आहे आणि वेळेआधी ते कमजोर होऊ नयेत यासाठी काय प्रयत्न करायला हवे.

तंदुरुस्त स्नायू कशासाठी?
स्नायू आपल्या शरीराची महत्त्वपूर्ण संरचना आहे. त्याच्या शिवाय व्यक्‍ती उभे राहू शकत नाही की बसू शकत नाही. त्यामुळे स्नायूंची योग्य देखभाल करणे अत्यंत गरजेचे आहे. स्नायू कमजोर झाल्यास थकवा आणि ऊर्जेची कमतरता जाणवते. कमजोर स्नायूंमुळे काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

स्नायूंमध्ये वेदना होणे
* संवेदना जाणे आणि अचानक सुन्‍नपणा येणे.
* पाय हलवण्यात समस्या निर्माण होणे, चालणे, उभे राहणे किंवा सरळ बसणे हे त्रासदायक होणे.
* चेहर्‍यावर कोणताही भाव न येणे.
* अत्याधिक थकवा.
* बोलण्याची समस्या, भ्रम निर्माण होणे आणि गोष्टी समजून घेण्यात अडचणी येणे.
* छातीचे स्नायू कमजोर झाले तर श्‍वसनास त्रास होतो आणि व्यक्‍ती बेशुद्धही पडू शकतो.

स्नायू दुबळे होण्याची कारणे-
* स्नायू दुबळे होण्याची अनेक कारणे आहेत. गंभीर आजारांपासून ते खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळेही स्नायू दुबळे होतात.
* एडिसन रोग, हायपर थायरॉईडिझम, क्रॉनिक फटिग सिन्ड्रोम, थायरोटॉक्सिकोसिस (हा आजार विशेषतः महिलांमध्ये होणारी डिसऑर्डर आहे ज्यामध्ये थायरॉईड ग्रंथी अचानक सक्रिय होतात.)
* सेलेब्रल पाल्सी, मल्टिपल स्क्लेरोसिस, स्ट्रो सारखे आजार स्नायू दुबळे होण्यास कारणीभूत असतात.
* स्नायू दुबळे होणे, सुरकुतणे, स्नायू सुजणे.
* शरीरात सोडियम किंवा पोटॅशिअमची पातळी कमी होणे.
* क्लॉस्ट्रिडियम बोटुलिज्म बॅक्टेरियामुळे होणारी अन्‍न विषबाधा.
* पोस्ट पोलियो सिंड्रोम.
* अ‍ॅनिमिया.
* खूप अधिक काळ झोपून रहाणे.

मजबूत स्नायूंसाठी-
शरीरातील स्नायू दीर्घकाळ मजबूत रहावे यासाठी काही गोष्टी अमलात आणाव्या लागतील.

* पोषक आहार-
स्नायूंचे आरोग्यावर प्रामुख्याने परिणाम होतो तो आहाराचा. संतुलित आणि पोषक आहाराचे सेवन केले पाहिजे. जेणेकरून स्नायूंचे पोषण योग्य वेळी झाले नाही तर स्नायू दुबळे किंवा अशक्‍त होतात. ज्या आहारात उष्मांकाचे प्रमाण अधिक असते त्याने चरबी जास्त प्रमाणात साठते. त्यामुळे स्नायू कमजोर होतात.

* व्यायाम : आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटे व्यायाम झाला पाहिजे. नियमित व्यायाम केल्यास स्नायू संकुचित होत नाहीत. व्यायाम केल्यास रक्‍ताभिसरणातही सुधारणा होते आणि स्नायूंना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे स्नायू मजबूत आणि चांगले होतात. नियमित व्यायाम केल्याने स्नायूंवर वयाचा परिणाम कमी प्रमाणात होतो.

* पाणी : स्नायूंचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला योग्य प्रमाणात पाण्याची गरज पडते. प्रतिदिवस कमीत कमी 8-10 ग्लास पाणी प्यावे. काय टाळावे?स्नायूंचे आरोग्य चांगले राखण्यासाठी काही गोष्टींपासून दूर रहावे लागेल. त्यामुळे स्नायू दुबळे होऊ शकतात आणि आरोग्य बिघडू शकते.

* धूम्रपान आणि दारू : धूम्रपान ऑक्सिजन स्नायूंपर्यंत पोहोचण्यापासून रोखतो. त्यामुळे स्नायूंना इजा होते. ज्या लोकांना धूम्रपानाची सवय नसते त्यांच्या स्नायूंची ठेवण धूम्रपान करणार्‍या व्यक्‍तींपेक्षा चांगली असते. नियमितपणे अत्याधिक प्रमाणात मद्यपान करणार्‍या व्यक्‍तींमध्ये वय वाढते तसे स्नायू कमजोर होतात.

* कॅफिन : थोड्या प्रमाणात कॅफिनचे सेवन केल्यास प्रथिनांच्या सिन्थेसिस चा वेग कमी होतो. त्यामुळे स्नायूंच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. कॅफिनचे अत्याधिक प्रमाण लोहाच्या अवशोषणात अडथळा आणते. त्यामुळे अशक्‍तपणा किंवा अ‍ॅनिमिया होतो. त्यामुळे थकवा आणि स्नायूंचा अशक्‍तपणा जाणवतो.

* अनिद्रा : स्नायूंचे आरोग्य चांगले रहावे म्हणून 6-8 तासांची झोप आवश्यक आहे. झोपेमध्ये ऊर्जेचा वापर कमी होतो त्यामुळे दिवसभरात जे पोषक घटक आपण सेवन केलेले असतात त्यांचा वापर रात्री स्नायूंच्या निर्मितीसाठी होतो. जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा स्नायू पुन्हा पूर्ववत होत असतात, त्यांची दुरुस्ती होते तसे पुनर्बांधणीही होत असते. झोपेची कमतरता असल्यास स्नायूंचे नुकसान भरून येत नाही.

* अतिक्रियाशीलता : आपल्याला तंदुरुस्त राखण्यासाठी शारीरिक सक्रियता सर्वात महत्त्वाची असते, पण तंदुरुस्त राहण्यासाठी केवळ सक्रियता नाही तर तेवढ्याच प्रमाणात आरामाचीही गरज असते. अति व्यायाम, अति श्रम केल्यास स्नायू मजबूत होण्याऐवजी कमजोर होऊ शकतात.

Dr. Raveendran SR
Dr. Raveendran SR
MBBS, Chennai
Dr. Manish Rawool
Dr. Manish Rawool
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 4 yrs, Pune
Dr. Ashok Lathi
Dr. Ashok Lathi
MS - Allopathy, General Surgeon, 37 yrs, Pune
Dr. Rekha Pohani
Dr. Rekha Pohani
Specialist, Dietitian dietetics, 13 yrs, Pune
Dr. Geeta Dharmatti
Dr. Geeta Dharmatti
Specialist, dietetics, 22 yrs, Pune