Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
यकृतामध्ये बिघाड होणे
#रोग तपशील#यकृत रोग



लिव्हर खराब होण्याचे 10 लक्षण

लिव्हर बर्‍याच कारणांनी खराब होऊ शकत जसे हेरिडिटी (परिवारातील एखाद्या सदस्याकडून), विषाक्तता (एखादा केमिकल किंवा व्हायरसमुळे) किंवा जुन्या आराजामुळे जे तुमच्या लिव्हरला संपूर्ण आयुष्यभर प्रभावित करू शकतो. पोटात असलेल्या या अवयवाशिवाय तुम्ही जगू शकत नाही.

येथे दहा लक्षण सांगण्यात येत आहे जे लिव्हर खराब होण्याचे संकेत देत आहे....

1. पोटावर सूज येणे
सिरोसिस लिव्हरचा एक गंभीर आजार आहे ज्यात पोटात एक द्रव्य तयार होतो (या स्थितीला अस्सिटेस म्हटले जाते) व
रक्त आणि द्रव्यात प्रोटीन आणि एल्बुमिनचा स्तर राहतो. यामुळे असे वाटते की रोगी गर्भवती आहे.

2. कावीळ
जेव्हा त्वचा रंगरहित व डोळे पिवळी दिसते तेव्हा असे आढळून येते की लिव्हर खराब झाले आहे. त्वचा आणि डोळ्यांचे या प्रकारे पांढरे आणि पिवळे होणे असे दर्शवतात की रक्तात बिलीरूबिन (एक पित्त वर्णक)चा स्तर वाढला आणि याच्यामुळे शरीरातील व्यर्थ पदार्थ बाहेर निघू शकत नाही.

3. पोटात दुखणे
पोटात दुखणे, खास करून पोटाच्या उजव्या भागात बरगड्यांच्या खाली उजव्या भागात दुखणे म्हणजे लिव्हरचे खराब होण्याचे संकेत आहे.

4. मूत्रात परिवर्तन
शरीरात वाहणार्‍या रक्तात बिलीरूबिनचा स्तर वाढल्यामुळे मूत्राचा रंग पिवळा होतो, ज्याला खराब लिव्हर किडनीद्वारे बाहेर काढण्यास असमर्थ असतो.

5. त्वचेत जळजळ
त्वचेवर खाज सुटणे किंवा रेषेस (लालिमा) येणे लिव्हर खराब होण्याचे एक सामान्य लक्षण आहे कारण त्वचेत असणार्‍या द्रव्यात कमतरता येते ज्यामुळे त्वचा जाड होते आणि त्यावर खाज सुटू लागते.

6. शोचमध्ये परिवर्तन
लिव्हर खराब असल्याने शौच उत्सर्जनात फारच बदल होतो जसे कब्ज़, इरिटेबल बाऊल सिंड्रोम किंवा शौचच्या रंगात बदल, काळ्या रंगाचा शौच किंवा शोच्यामध्ये रक्त येणे.

7. जीव घाबरणे
पचनाशी निगडित समस्या जसे अपचन आणि ऍसिडिटीमुळे लिव्हर खराब होण्याची शक्यता असते, ज्यामुळे उलट्या देखील होतात.

8. भूक कमी लागणे
लिव्हर खराब झाल्याने लिव्हर फेल देखील होऊ शकतो व त्यावर उपचार न केल्यास भूक कमी लागते ज्यामुळे तुमचे वजन कमी होऊ लागत. अशा प्रकरणात जेथे रोगी फारच अशक्त होतो आणि रक्तवाहिनीच्या माध्यमाने पोषक तत्त्व देण्यात येतात.

9. द्रव प्रतिधारण
सामान्यत: तरळ पदार्थ पाय, टाचा आणि तळव्यावर जमा होऊ लागतात. या स्थितीला ऑएडेम म्हणतात ज्यामुळे लिव्हर गंभीर रूपेण खराब होऊ शकतो. जेव्हा तुम्ही त्वचेच्या सुजलेल्या भागावर दाब देता तेव्हा तुम्ही बघाल की बोट काढल्यानंतर देखील बर्‍याच वेळेपर्यंत तो भाग दबलेला असतो.

10. थकवा
लिव्हर खराब झाल्यानंतर जेव्हा फेल होण्याच्या स्थितीत येतो तेव्हा चक्कर येणे, थकवा, स्मरणशक्ती कमी होणे तथा संभ्रम (कन्फ्यूज़न) झाल्यासारखे व शेवटी कोम्यात जाणे इत्यादी समस्या होऊ शकतात.

Dr. Santoshkumar Gaikwad
Dr. Santoshkumar Gaikwad
BDS, Dentist Root canal Specialist, 24 yrs, Pune
Dr. Yogesh Patil
Dr. Yogesh Patil
BAMS, Ayurveda Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Yogesh  Wankhede
Dr. Yogesh Wankhede
BAMS, Ayurveda Acupressurist, 5 yrs, Pune
Dr. Sandeep Patil
Dr. Sandeep Patil
BHMS, Homeopath, 9 yrs, Pune