Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
दाढदुखीची समस्या
#रोग तपशील#जबडा वेदना



दाढदुखीची समस्या :

दाढदुखीची समस्या अत्यंत गंभीर असते. दाढ दुखत असताना येणाऱ्या कळा धडधाकट व्यक्तीला सुद्धा असह्य होतात. त्यामुळे दाढदुखीची समस्या टाळण्यासाठी काही दातांची योग्य निगा राखणे गरजेचे असते. दातांची निगा राखण्यासाठी जेवण झाल्यानंतर न विसरता चूळ भरावी. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासावेत. जास्त थंड, गरम आणि कडक पदार्थ खाणे टाळावे. लहान मुलांना चॉकलेट, गोड पदार्थ शक्यतो कमी प्रमाणात द्यावे किंवा देणे टाळावे.

दाढ दुखत असल्यास तुळशीची ५ ते १० पाने स्वच्छ धुवून, कुटून त्याचा रस काढावा आणि त्यात कापराच्या ३ ते ५ वड्या मिसळाव्यात. कापसाचे छोटे छोटे ३ ते ४ बोळे या मिश्रणात भिजवून दुखणार्‍या दाढेत ठेवावेत. त्यामुळे दाढदुखी कमी होण्यास मदत होते. दाढदुखीवर डॉक्टरांचा सल्ला घेऊन दाढ नेमकी का दुखते, यावर योग्य उपचार घेणं आवश्यक आहे.

दातांची योग्य काळजी न घेतल्यास दाढ दुखी सारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे दाढ दुखीवर काय उपचार केले पाहिजे हे जाणून घ्या.

दातांची निगा कशी राखावी
१. खाल्ल्यानंतर प्रत्येक वेळी व्यवस्थित चूळ भरावी.

२.सकाळी उठल्याबरोबर व रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासावेत.

३.खूपच थंड, गरम, कडक पदार्थांचे सेवन शक्‍यतो टाळावे.

४.लहान मुलांना खूप गोड व चॉकलेट, तसेच अतिथंड पदार्थ देणे टाळावे, तसेच नियमित दात घासायला लावणे.

दाढ दुखीवर सोपा उपाय :

तूळसीची ५ ते १० पाने स्वच्छ धुऊन वाटीमध्ये किंवा छोट्या ऊखळीमध्ये घेवून कुटुन त्याचा रस निर्माण करावा आणि त्यात कापुराच्या 3 ते 5 वड्या मिसळून घ्यावे. कापसाचे छोटे छोटे ३ ते ४ बोळे या मिश्रणात भिजवून दुखणार्‍या दाढेत ठेवावेत त्यामुळे दाढ दुखी कमी होण्यास मदत होते.

दाढ दुखीवर डॉक्टरांचा सल्ला देखील घ्यावा. दाढ नेमकी का दुखते यावर योग्य उपचार घेणं आवश्यक आहे.

Dr. Ashwini Bhilare
Dr. Ashwini Bhilare
BDS, Endodontist Root canal Specialist, 9 yrs, Pune
Dr. Bharat Oza
Dr. Bharat Oza
BAMS, General Surgeon Proctologist, 9 yrs, Pune
Dr. Akash Grampurohit
Dr. Akash Grampurohit
MS - Allopathy, ENT Specialist, Dharwad
Dr. Brinda Dave
Dr. Brinda Dave
MPTh, Neuro Physiotherapist Physiotherapist, 4 yrs, Pune
Dr. Sachin  Bhor
Dr. Sachin Bhor
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 15 yrs, Pune