Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
कानामध्ये येणारी खाज
#रोग तपशील#कानदुखी



कानामध्ये येणारी खाज

काही वेळेस अचानक कानामध्ये खाज येते. त्याला कमी करण्यासाठी खाजवण्याचा मोह प्रत्येकालाच होतो. मात्र काहीवेळेस खाज अतिप्रमाणात जाणवल्यास हाताजवळ सापडणारी कोणतीही बारीक आणि कानात जाणार्‍या गोष्टीची मदत घेतली जाते. त्याच्या सहाय्याने खाज कमी केली जाते. मात्र अणुकुचीदार गोष्टींचा कानामध्ये वापर केल्यास कानांच्या आतील भागाला इजा होण्याची शक्यता असते.

सतत कानामध्ये खाज येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता नेमके कारण जाणून घेणेदेखील गरजेचे आहे. म्हणूनच अशाप्रकारे कानामध्ये खाज येणे कितपत गंभीरतेने घ्यावे याबाबत विचार करणेदेखील आवश्यक आहे. म्हणूनच पारस हॉस्पिटल्सचे ईएनटी विभाग प्रमुख डॉ. अमिताभ मलिक यांनी दिलेला हा सल्ला तुम्हांला त्यामागील नेमके कारण जाणून घेण्यास फायदेशीर ठरेल.

कानामध्ये खाज येण्यामागे कानातील मळ तसेच कानाच्या पोकळीमधील डॅन्डरफ हेदेखील कारण आहे. काही जणांमध्ये फंगल इंफेक्शन, कानामधील इंफेक्शन किंवा अगदी पित्तामुळेदेखील खाज येऊ शकते. काही वेळेस कानामध्ये काही गोष्टी घातल्यास हा त्रास कमी होतो. तर कानांतील खाज हा काहींसाठी एक मानसिक समस्येचा प्रकारही असू शकतो.

कानामध्ये टुथपिक थेट घालणे किंवा कापसाचा बोळा गुंडाळून घालणे त्रासदायक ठरू शकते. तसेच चावी, हेअर पिन, टोकदार नखं घालणेदेखील घातक आहे. यामुळे कानाच्या पडद्याचे नुकसान होऊ शकते. क्वचित कानामध्ये खाज येत असल्यास हे फारसे चिंतेचे कारण नाही. मात्र वारंवार हा त्रास जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित कानामध्ये विशिष्ट प्रकारचे इंफेक्शन आढळून येऊ शकते.

कानामधील खाज कमी करण्यासाठी करंगळीच्या मांसल भागाचा वापर करावा. बोटाचे नख कापलेले आणि फाईल केलेले असणे आवश्यक आहे. म्हणजे कानामध्ये त्याचा त्रास होणार नाही.


कानात मळ जमणे ही तशी सामान्य गोष्ट पण कान वेळोवेळी साफ करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कान साफ न केल्यास खाज येणे, जळजळ किंवा इतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

१. कोमट पाणी : कापूस घेऊन तो पाण्यात भिजवून त्याने पाणी कानात टाका. काही सेकंदात पाणी बाहेर काढा.

२. हायड्रोजन पॅरॉक्साइड : अतिशय कमी प्रमाणात हायड्रोजन पराक्साइड घेवून तो पाण्यात टाका. थोड्या प्रमाणात ते कानात टाका आणि आता कान उलटून काही सेकंदात ते बाहेर काढा.

३. तेल : ऑलिव्ह, शेंगदाणा किंवा मोहरीचं तेल गरम करुन कानात टाकणे हा देखील सोपा उपाय आहे. तेलात जरासं लसूण टाकला तरी चालतो. यामुळे मळ बाहेर पडतो.

४ कांद्याचा रस : कांदा वाफेवर शिजवून किंवा भाजून याचा रस काढून घ्या. त्यानंतर कापसाने रसाचे काही थेंब कानात टाका. याने मळ बाहेर पडतो.

५. मिठाचे पाणी : गरम पाण्यात मीठ घोळून टाकून त्याचे काही थेंब कानात टाका आणि काही सेकंदात ते बाहेर काढा.

Dr. Ajit kadam
Dr. Ajit kadam
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 20 yrs, Pune
Dr. Anushree Bhonde
Dr. Anushree Bhonde
BPTh, Physiotherapist, 11 yrs, Pune
Dr. Mangal Thube - Buchade
Dr. Mangal Thube - Buchade
BAMS, Ayurveda Yoga and Ayurveda, 9 yrs, Pune
Dr. Anjanikumar Malempati
Dr. Anjanikumar Malempati
MBBS, ENT Specialist, 10 yrs, Pune
Dr. Vishnu Nandedkar
Dr. Vishnu Nandedkar
MBBS, Joint Replacement Surgeon Orthopaedics, 9 yrs, Pune