Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करतात 'हे' सुपरफूड्स; जाणून घ्या फायदे
#स्तनाचा स्त्राव#सुपर फूड्स

ब्रेस्ट कॅन्सर महिलांमध्ये होणारा सर्वात कॉमन कॅन्सर असून दिवसेंदिवस याचा धोका वाढताना दिसत आहे. खरं तर ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागे अनेक कारणं असतात. पण सध्या या आजारबाबत अनेक समाजसेवी संस्थांनी उपक्रम राबवून जनजागृती केली असून याबाबत लोकंमध्येही जागरुकता पाहायला मिळते. परंतु अजुनही याकडे आणखी लक्ष देण्याची गरज आहे. ब्रेस्ट कॅन्सरकडे दुर्लक्षं करणं म्हणजेच जीवशी खेळणं ठरू शकतं. ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं कमी वयाच्या महिलांमध्ये आढळून येतात. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, अनियमित जीवनशैली आणि अनहेल्दी डाएटचं सेवन करणं. पण घाबरून जाण्याचं कारण नही. वेळीच जर या आजाराची लक्षणं ओळखता आली तर या आजारावर उपचाक करणं अगदी सहज होतं. परंतु तुम्ही तुमच्या डाएटमध्ये काही आवश्यक बदल करून ब्रेस्ट कॅन्सरपासून दूर राहू शकता.

येथे काही पदार्थांबाबत आम्ही सांगणार आहोत, ज्यांना डेली डाएटमध्ये समावेश केल्यामुळे तुम्ही ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करू शकता. जाणून घेऊया या पदार्थांबाबत...

बेरीज्

रासबेरी, ब्लॅकबेरी, क्रेनबेरी आणि चेरीमध्ये इलॅजिक अॅसिड (ellagic acid), एंथोसायानिडिन्स (anthocyanidins) आणि प्रोएंथोसायानिडिन्स (proanthocyanidins) असतात. जे कॅन्सरच्या पेशींसोबत लढतात आणि त्यांना मुळापासून नष्ट करतात. त्यामुळे दररोज बेरीज् नक्की खा.

सफरचंद

सफरचंदही ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर समजलं जातं. याच्या सालीमध्ये अस्तित्वात असणारे कॅचिन्स (catechins) आणि फ्लेवोनॉल्स (flavonols) मेटाबॉलिज्म सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कॅन्सरच्या पेशींपासून लढण्यासाठी मदत करते.

मशरूम

मशरूमही ब्रेस्ट कॅन्सरपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतो. काही वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनातून असं आढळून आलं आहे की, ज्या महिला दररोज एक मशरूम खात असतील त्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क 64 टक्क्यांनी कमी होता.

टोमॅटो

टोमॅटोमध्ये लायकोपेन (एक लाल कैरेटोनॉएड पिगमेंट) मुबलक प्रमाणात असतात. जे कॅन्सरचा धोका कमी करतात. ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी टोमॅटो सर्वात बेस्ट आहे. यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट्सही मुबलक प्रमाणात असतात.

ग्रीन टी

वजन कमी करण्यापासून ते ब्लड प्रेशर नॉर्मल करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर ठरते. ग्रीन टीमध्ये मुबलक प्रमाणात पॉलीफेनॉल अॅन्टीऑक्सीडंट्स अस्तित्वात असतात. हे अॅन्टीऑक्सिडंट फ्री रेडिकल्समुळे होणाऱ्या डीएनए डॅमेजपासून पेशींना सुरक्षित ठेवतात. यावर अद्याप रिसर्च सुरू आहे. परंतु, दररोज ग्रीन टीचं सेवन केल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी केला जाऊ शकतो.

धान्य

यामध्ये फोलेट्स, व्हिटॅमन बी असतं, जे ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठी मदत करतं. गहू, ब्राउन राइस, मक्का, जवस, राई, बाजरी आणि ज्वारी यांसारखी धान्स हेल्दी डाएटचा महत्त्वपूर्ण भाग असतात. यामध्ये व्हिटॅमिन खनिज, प्रोटीन, फायबर आणि फायटोकेमिकल्स असतात.

फळभाज्या आणि डाळी

फळभाज्या आणि डाळींमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन असतं. त्यामुळे यांचं सवन कॅन्सरसोबतच इतर गंभीर आजारांपासून बचाव करण्याचं काम करतो. यामध्ये कॅन्शिअम, आयर्न आणि व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणावर असतं.

पालेभाज्या

अनेक संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, हिरव्या पालेभाज्यांमध्ये अनेक अशी तत्व आढळून येतात जी पेशींमधील डीएनच्या कमतरतेपासून वाचवण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

Dr. Anjali Awate
Dr. Anjali Awate
BAMS, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune
Dr. Dr.Monica Rathod
Dr. Dr.Monica Rathod
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, Thane
Dr. Ashwini Bhilare
Dr. Ashwini Bhilare
BDS, Endodontist Root canal Specialist, 9 yrs, Pune
Dr. Sabir Patel
Dr. Sabir Patel
MBBS, General Medicine Physician General Physician, 2 yrs, Bharuch
Dr. Cliford John
Dr. Cliford John
BDS, Dental Surgeon Root canal Specialist, 6 yrs, Pune