Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
टॅटू हटवण्यासाठी प्रयत्न करताय? मग 'हे' वाचाच!
#टॅटू काढणे

तरूणाईमध्ये नेहमीच नवनवीन ट्रेन्ड वायरल होत असतात. मग ते फॅशनसंदर्भात असो किंवा ब्युटीसंदर्भात. नेहमीच नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी ही तरूण मंडळी उत्साही असतात. सध्या तरूणांमध्ये टॅटू काढण्याचा ट्रेन्ड आहे. पण अनेकदा हा टॅटू काढताना काहीशा चुका होतात किंवा मग तो आपल्याला पाहिजे तसा दिसत नाही. अशावेळी तुमच्या डोक्यात तो काढून टाकण्याचा विचार करतात. पण खरचं असं शक्य आहे का? टॅटू त्वचेवरून नाहीसा करणं हे अत्यंत वेदनादायी असतं. कारण जोपर्यंत तुम्ही टॅटूबाबत कोणताही निर्मय घेण्यापर्यंत पोहोचता. तोपर्यंत त्याचा रंग त्वचेमध्ये आतपर्यंत जातो. पर्मनंट टॅटूपासून सुटका करणं एवढंही सोपं नसतं.

टॅटू त्वचेवरून नाहीसा करणं एवढंही सोपं नाही. त्वचा तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, एकदा टॅटू त्वचेवर काढला गेला, तर तो थोडासा लाइट केला जाऊ शकतो किंवा त्यावर नवीन टॅटू काढला येऊ शकतो.


जेव्हा टॅटू रिमूव्ह करायचा असतो

पर्मनंट टॅटू रिमूव्ह करणं अत्यंत अवघड असतं आणि टॅटू रिमूव्ह करण्यासाठी असलेली कोणतीही प्रक्रीया पूर्णपणे तो टॅटू काढून टाकू शकत नाही. याचेही वेगवेगळे साइड इफेक्ट्स असतात. आज आम्ही तुम्हाला काही ट्रिटमेंट्स आणि उपाय सांगणार आहोत, जे टॅटू रिमूव्ह करण्यासाठी फायदेशीर ठरतात. खरं तर पूर्णपणे नाहीसा करणं अवघड आहे आणि त्वचेवर डाग राहण्याचा धोकाही असतो. याचबरोबर इन्फेक्शन आणि पिगमेंटेशनच्या समस्याही होऊ शकतात.

लेझर ट्रिटमेंट

टॅटू रिमूव्ह करण्यासाठी लेजर ट्रीटमेंटचा सहारा घेतला जाऊ शकतो, कारण यामध्ये लेढर बीमद्वारे पिगमेंट किंवा डायला तोडून टॅटू फेज करण्यात येतो. यामुळे प्रभावित भागांतील स्किन ट्रिटमेंटनंतर पाढऱ्या रंगाची होते. टॅटू काढून टाकण्यासाठी अनेक सेटिंग्ज करण्यात येतात. ही ट्रिटमेंट फार खर्चिक असते. अनेकदा टॅटू पूर्णपणे नाहीसा होण्याऐवजी लाइट होतो. तसेच यामुळे अ‍ॅलर्जीक रिअ‍ॅक्शन होण्याचाही धोका असतो.

डर्माब्रेसन

डर्माब्रेसन एक मेडीकल प्रक्रीया आहे, ज्यामध्ये त्वचेची एपिडर्मिसला एब्रेसन किंवा सँडिग हटवलं जातं. यानंतर नवीन स्किन लेयर तयार होते. परंतु यामध्ये त्वचेवर डाग राहू शकतो. बॅलून्सचा प्रयोग करताना टॅटूचा सर्जिकल रिम्ह्यूवल जे स्किनमध्ये इन्सर्ट करण्यात येतं आणि त्यामुळे टिश्यू एक्सपॅन्शन होतं. टॅटू असणारी स्किन निघून जाते आणि टिश्यू पसरल्यामुळे डाग राहण्याची शक्यता कमी असते.

कॅमूफ्लाजिंग टॅटू

या ट्रिटमेंटमध्ये जुना टॅटू काढून टाकण्यासाठी दुसरा टॅटू काढण्यात येतं. स्किन कलरशी मिळते जुळते पिगमेंट्सला टॅटूवर नॅचरल स्किन येण्यासाठी इंजेक्ट करतात. परंतु यामध्ये सहज फरक ओळखता येतो. कारण यामध्ये त्वचेवर असणारी नैसर्गिक चमक दिसत नाही.


टॅटू रिमूव्हल क्रिम

टॅटूला लेझर ट्रिटमेंटच्या आधारे हटवणं सहज शक्य होतं. परंतु याचा खर्च फार असतो. जो प्रत्येकालाच परवडेल असं नाही. त्याऐवजी टॅटू रिमूव्हल क्रिमचा वापर करणं फायदेशीर ठरतं. पण लक्षात ठेवा की, क्रिम निवडताना चांगल्या क्वालिटीच्याच क्रिमची निवड करा.

मिठाचं पाणी

लेझर ट्रिटमेंट किंवा इतर टॅटू रिमूव्ह करणयासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रिटमेंटपैकी सर्वात सोपा आणि घरच्या घरी करण्यात येणारा उपाय म्हणजे, मीठाचं पाणी. पाण्यामध्ये मीठ एकत्र करून कॉटनच्या सहाय्याने टॅटूवर रब करा. असं दररोज करा पण अर्ध्या तासापेक्षा जास्त असं करू नका.

Dr. Yogesh  Wankhede
Dr. Yogesh Wankhede
BAMS, Ayurveda Acupressurist, 5 yrs, Pune
Dr. Aakash Bora
Dr. Aakash Bora
BHMS, Homeopath, 12 yrs, Pune
Dr. Aniket Amrutkar
Dr. Aniket Amrutkar
BAMS, Family Physician Physician, 8 yrs, Pune
Dr. Devyani S. Ahire
Dr. Devyani S. Ahire
BDS, Dentist, 4 yrs, Pune
Dr. Pramod Bharambe
Dr. Pramod Bharambe
DHMS, Family Physician Homeopath, 30 yrs, Pune