Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
हिपॅटायटीस सी
#रोग तपशील#हिपॅटायटीस सी एचसीव्ही



हिपॅटायटीस सी
हिपॅटायटीस सी वायरस हा प्रामुख्याने वैद्यकिय चाचण्या व उपचारादरम्यान दुषित रक्ताशी संबंध आल्यास होण्याची शक्यता असते.

सौम्य स्वरूप :

अचानक यकृताला सूज येणे व सहा महिन्यांत हा आजार आटोक्यात येणे शक्य असते. सौम्य स्वरुपातील हिपॅटायटीस हा हळूहळू ठिक होऊ शकतो. प्रामुख्याने हिपॅटायटीस ए हा सौम्य प्रकार आहे.

तीव्र स्वरूप :

तीव्र स्वरूपाचा संसर्ग दरवर्षी जगभरातील 13- 150 मिलियन रुग्णांना जडतो. यामुळे यकृताचा कॅन्सर, यकृत निकामी होणे यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही अधिक आहे. हिपॅटायटिस इ ग्रस्त रुग्ण त्यांची रोगप्रतिकारशक्ती खालावल्याने अधिक धोक्यात येतात.

हिपॅटायटीस जडण्याची कारणं –

- व्हायरल इंफेक्शन : जगभरात हिपॅटायटस जडण्यामागे व्हायरल इंफेक्शन हे एक कारण आहे. त्यामुळे हिपॅटायटस ए, बी व सी जडण्याची जडण्याची शक्यता अधिक असते.
- ऑटोइम्यु-कंडीशन (Autoimmune condition): यकृताजवळील रोगप्रतिकार पेशी कमकुवत झाल्यास त्याचा परिणाम यकृताच्या कार्यावर होऊ शकतो.
- मद्यपान : दारूमुळे शरीराच्या मेटॅबॉलिझमवर परिणाम होतो. यामुळे शरीराचे कार्य बिघडते. त्यामुळे अतिप्रमाणात मद्यसेवन केल्यास यकृत निकामी होते.
अतिप्रमाणात औषधं घेणे – वैद्यकीय सल्ल्याविना औषध घेतल्यास किंवा एसिटामिनोफेन (acetaminophen) यासारख्या औषधांचा अति वापर केल्यास यकृताजवळील पेशींचे नुकसान होऊ शकते.

लक्षणं

- कावीळ
- मुत्राचा गडद रंग
- थकवा
- मळमळणे
- उलट्या
- पोटदुखी
- खाज येणे
- भूक मंदावणे
- वजन घटणे
- हिपॅटायटीसच्या प्राथमिक अवस्थेत ही लक्षण आढळून येत नाहीत. मात्र हळूहळू तीव्र स्वरूपात ही लक्षण आढळतात.

निदान

तुमच्या लक्षणानुसार डॉक्टर यकृताची होणारी वाढ, त्वचेचा पिवळेपणा, पोटात असलेले पाण्याचे प्रमाण अशा काही शारिरीक चाचण्या करू शकतात. मात्र गंभीर स्वरूपाच्या हिपॅटायटसचे निदान करण्यासाठी या काही चाचण्या करणे आवश्यक आहेत.

- लीवर फंक्शन टेस्ट (liver function tests)
- अल्ट्रासाउन्ड (ultrasound)
- ऑटोइम्यू ब्लड मार्कर (autoimmune blood markers)
- हिपॅटायटिस ए, बी व सी ची टेस्ट (hepatitis A,B, or C)
- लीवर बायोप्सी ( liver biopsy)
- पैरासेनटेसीस (paracentesis)

उपाय

सौम्य स्वरुपाचा हिपॅटायटीस योग्य उपचारांनंतर आटोक्यात आणणे शक्य आहे. मात्र या आजाराची तीव्रता वाढल्यास वेळीच उपाय करणे गरजेचे आहे.
हिपॅटायटीस बी आणि सी चा प्रादुर्भाव हा व्हायरल इंफेक्शनमुळे होत असल्याने त्यावर मात करण्यासाठी खालील काही उपाय करा
- संसर्ग टाळण्यासाठी दुसर्‍यांनी वापरलेले ब्रश, रेझर किंवा सुया वापरणे टाळा.
- पियरसिंग करताना, टॅटू बनवताना वापरण्यात येणार्‍या वस्तूंची काळजी घ्या.
- सुरक्षित सेक्स करा

हिपॅटायटीस ए चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी

- शारिरीक स्वच्छता पाळा
- स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर हात स्वच्छ धुवा, खाण्यापूर्वीदेखील हात स्वच्छ धुवावेत.
- अस्वच्छ ठिकाणी खाणे टाळा. लहान मुलांना हिपॅटायटीस प्रतिबंधक लस जरूर टोचून घ्यावी.
- सेंटर फॉर डिसिज कंट्रोल एण्ड प्रिवेन्शन [ Center for Disease Control and Prevention (CDC)] यांच्या अहवालानुसार लहान मुलांबरोबरच 18 वर्षांपर्यंतची मुल व मध्यमवयीन लोकांनी देखील 6-12 महिन्यांत 3 डोस घ्यावेत.

Dr. Sachin Sutar
Dr. Sachin Sutar
BAMS, Family Physician Physician, 8 yrs, Pune
Dr. Rohit Patil
Dr. Rohit Patil
MDS, Dentist Implantologist, 5 yrs, Pune
Dr. Yatin Bhole
Dr. Yatin Bhole
DNB, Pediatrician, 9 yrs, Pune
Dr. Jalpa Desai
Dr. Jalpa Desai
BHMS, Medical Cosmetologist Trichologist, 6 yrs, Pune
Dr. Virag  Kulkarni
Dr. Virag Kulkarni
BAMS, Ayurveda Panchakarma, 14 yrs, Pune