Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
औषधी तुळशीचे 'असेही' फायदे
#आरोग्याचे फायदे#आयुर्वेद उपचार#निरोगी जिवन

भारतात जवळपास अनेक घरांमध्ये तुळशीचं रोपटं पाहायला मिळतं. हिंदू संस्कृती मानणाऱ्या अनेक कुटुंबात तुळशीचं खास महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीत पूजनीय असणाऱ्या तुळशीचे औषधीय गुणधर्मही तितकेच महत्त्वाचे आहेत. तुळस आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानली जाते. जाणून घ्या तुळशीच्या पानांचे फायदे...

तणाव कमी करते -
तुळस दिवसभराचा थकवा दूर करते. अतिशय ताण असल्यास दररोज रात्री दूधात तुळशीची काही पानं टाकून, उकळून ते दूध पिण्याने फायदा होतो. याने मज्जासंस्थेला आराम मिळून तणाव कमी होण्याची शक्यता असते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते -
तुळशीत मोठ्या प्रमाणात अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-इंफ्लिमेंट्री गुण असतात. जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्याचे काम करतात. दररोज तुळशीची पानं खाल्ल्याने फ्लूचा धोकाही दूर होण्यास मदत होते.

महिलांना मासिक पाळी समस्या -
महिलांना मासिक पाळीदरम्यान अनेक प्रकारच्या समस्या होत असतात. या दिवसांत महिलांना अतिशय त्रासाला सामोरं जावं लागतं. अशा त्रासावेळी तुळशीच्या बिया फायदेशीर ठरतात. मासिक पाळीमधील अनियमितता दूर करण्यासाठी दररोज तुळशीच्या पानांचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

सर्दी-खोकला -
तुळशीचा काढा सर्दी-खोकल्यावर रामबाण मानला जातो. काढा बनवण्यासाठी तुळशीची पानं पाण्यात टाकून त्यात काळी मिरी आणि खडीसाखर मिसळून त्याचे सेवन करा. सर्दीसाठी हा काढा अतिशय गुणकारी ठरतो.

Dr. Sushma Todkar
Dr. Sushma Todkar
BDS, Dentist Root canal Specialist, 20 yrs, Pune
Dr. Zainab Shaikh
Dr. Zainab Shaikh
BAMS, Ayurveda, 2 yrs, Pune
Dr. Rajendra V. Yelwande
Dr. Rajendra V. Yelwande
BAMS, Ayurveda, 38 yrs, Pune
Dr. Sandeep Awate
Dr. Sandeep Awate
BAMS, Ayurveda Panchakarma, 15 yrs, Pune
Dr. Rekha Pohani
Dr. Rekha Pohani
Specialist, Dietitian dietetics, 13 yrs, Pune