Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
भ्रम/भास (हल्लूसिनॅशन )
#रोग तपशील#असहाय्य



भ्रम/भास (हल्लूसिनॅशन ):--

- या प्रकारामध्ये व्यक्तीचे मन त्याला काहीतरी सुचवत
असते.जसे कि काहीतरी दिसल्याचा भास होणे किंवा
कशाचीही जणीव होणे, वास येत नसेल तरीही या
प्रकारात व्यक्तीला वास येणे हे सर्व या व्यक्तीच्या
मनामध्ये सुरु असते आणि या व्यक्ती हे सर्व खरे
समजून तसे वागतात. पॅरानॉईड स्किझोफ्रेनिया चे

दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केल्या जाते.
१. श्रवणविषयक भास होणे.
(ऑडीटोरी हल्लूसिनॅशन )

२. संवेदनिक भास(सेन्सोरी हल्लूसिनॅशन )
यामध्ये आपण आधी श्रवणविषयक भास व्यक्तीला

कसे होतात ते समजून घेऊयात.
१. श्रवणविषक भास:-

- यामध्ये व्यक्तीला कुणीतरी व्यक्ती त्यांच्याशी संवाद
साधते आहे असे वाटते, इतरांना हा आवाज येत नसतो.

- कुणीतरी त्यांची थट्टा उडवून, त्यांच्यावर हसण्याच्या
आवाजाचा भास होत असतो. कुणीतरी त्यांच्यावर
टीका करत आहे असे त्यांना आवाज येतात

- असह्य/कटू/निर्दयी अशा टिपण्णी त्यांच्या कुणीतरी
करत आहे असा आवाज येतो.

- सगळ्यात वाईट म्हणजे यामध्ये व्यक्तीला कुणीतरी
आपल्याला आज्ञा देत आहे असेही आवाज येतात
ज्यामध्ये रुग्णव्यक्तीला आत्महत्या करण्यासाठी सुद्धा
कुणीतरी आज्ञा देते आहे असे ऐकू येते.

- या सर्व श्रवणविषयक होणारे भास व्यक्ती खरे
समजते त्यावर विश्वास ठेवते आणि तशीच प्रतिक्रिया
त्याला देते. यामधील आता दुसरा प्रकार आपण
पाहुयात.

२. संवेदनिक भास(सेन्सोरी हल्लूसिनॅशन )

- यामध्ये व्यक्तीला वास येण्याचा भास होतो जो कि
इतरांना येत नाही.

- चवीविषयी सुद्धा या व्यक्तींना भास होतात जे कि सत्य
नसते.

- काहीवेळेस या व्यक्तीला त्यांच्या हातावर किंवा
पायावर काहीतरी किडा चालतो आहे अशी जाणीव
होते. काही नसले तरी त्यांना हि जाणीव खरी असल्याचे
भासते.

- काहीवेळेस हे सर्व भास त्यांना खूप भीतीदायक
वाटतात

Dr. Sonawane Shivani
Dr. Sonawane Shivani
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 3 yrs, Pune
Dr. Bhushan Khedkar
Dr. Bhushan Khedkar
Specialist, Dietitian dietetics, 8 yrs, Pune
Dr. Amar S. Shete
Dr. Amar S. Shete
BAMS, Family Physician, Pune
Dr. Gopal Samdani
Dr. Gopal Samdani
MBBS, Pediatrician, 30 yrs, Pune
Dr. Pujitha Chowdary
Dr. Pujitha Chowdary
MD - Allopathy, General Medicine Physician Diabetologist, 6 yrs, Chennai