Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
काचबिंदू
#रोग तपशील#काचबिंदू



काचबिंदू

आरोग्यो व कुटुंब कल्यारण विभागाने २००६-०७ मध्ये केलेल्यां सर्वेक्क्षणानुसार भारतामध्ये् टाळता येण्यायजोग्यार अंधत्वानचे प्रमाण १ टकके म्हयणजेच १२१ लक्ष. त्या‍मध्येआ सर्व वयोगटामध्येक काचबिंदु प्रघात / प्रचलन हे ५.८० टक्केध आहे. काचबिंदु हा नेत्र आजारांचा एक गट आहे ज्या मध्येध सहसा थोडीशी लक्षणे दिसतात किंवा प्रारंभ्रिक लक्षणेदिसतही नाहीत. शेवटी डोळयांपासुन मेंदुपर्यंत जाणा-या नसेची हानी होते. बहुतांश काचबिंदुच्याद प्रकारांमध्येश सामान्यप ताणापेक्षा जास्ते प्रमाणात ताण आढळुन येतो.

उपचार विरहीत अथवा अनियं‍ञीत काचबिंदु सभोवतालच्याक दृष्टिची हानी करतो आणि शेवटी अधंत्वव येते.

काचबिंदुचे प्रकार
काचबिंदुचे दोन मुख्य. प्रकार आहेत

1 - क्रोनिक / दिर्घकालीन काचबिंदु किंवा प्राथमिक ओपन अॅंगल काचबिंदु (POAG)
2 - अॅक्‍युट अॅंगल क्‍लोजर काचबिंदु (तिव्र कोन बंद काचबिंदु)

दोन्‍ही प्रकारामध्‍ये कोन (अॅंगल म्‍हणजे डोळयांच्‍या आतमध्‍ये जल निसारणासाठी जो कोन वापरला जातो व जो डोळयातील पाण्‍याचा निचरा नियंञीत करतो. इतर प्रकारामध्‍ये सामान्‍य-ताण काचबिंदु, वर्णक काचबिंदु, माध्‍यमिक काचबिंदु व जन्‍मजात काचबिंदु यांचा समावेश होतो.

- प्राथमिक उघडया कोनांचा का‍चबिंदु – हा सामान्‍य प्रकारचा काचबिंदु हळुहळु इतर लक्षणे न दाखविता आपली सभोवतालची दृष्‍टी कमी करतो. काही काळानंतर हे लक्षात येते पंरतु कायमस्‍वरुपी नुकसान आधीच झालेले असते. तर तुमचा ताण उच्‍च असेल तर या प्रकारच्‍या काचबिंदु मध्‍ये डोळयांचा झालेला नाश हा बोगदा दृष्‍टी निर्माण करतो व तुम्‍ही सरळ समोर असणा़-या वस्‍तु फक्‍त पाहू शकतो.

- बंद कोनाचा काचबिंदु – बंद कोनाचा काचबिंदुमध्‍ये काही लक्षणे दिसु शकतात जसे डोळे दुखणे, डोके दुखी, प्रकाश वलय दिसणे, विस्‍तृत बाहुली, दृष्‍टी कमी होणे, डोळे लाल होणे, मळमळ आणि उलटी हि लक्षणे काही तास राहतात व नंतर परत दुस-या फेरीत निर्माण होतात. प्रत्‍येक अॅटक मध्‍ये दृष्‍टीत अधिकाधिक नुकसान होऊ शकते.

- सामान्‍य ताण काचबिंदु – प्राथमिक उघडया कोनांच्‍या काचबिंदु प्रमाणे सामान्‍य ताण काचबिंदु (ज्‍याला सामान्‍य काचबिदु किंवा कमी ताण काचबिंदु अथवा कमी दाब काचबिंदु देखील म्‍हणतात) हा उघडया कोनाचा काचबिंदु आहे. ज्‍यामध्‍ये मज्‍जातंतुला नुकसान झाल्‍याने आजुबाजुच्‍या नजरेची घट होऊ शकते. या प्रकारामध्‍ये डोळयांचा ताण हा सामान्‍य पातळीवर राहतो.

या प्रकारात बोगदया सारखी दृष्टि जाणवेपर्यंत कुठलीही लक्षणे दिसत नाहीत तसेच वेदना क्‍वचीत असतात आणि तो पर्यंत डोळयांच्‍या नसेला (ऑप्‍टीक नर्व्‍ह) कायमस्‍वरुपी इजा पोहोचलेली असते. या प्रकाराच्‍या काचबिंदु मध्‍ये कसलेही कारण आजतागायत आढळुन आलेले नाही. परंतु ब-याच डॉक्‍टरांच्‍या मते डोळयांच्‍या नसेला अल्‍प रक्‍तपुरवठा झाल्‍यामुळे हा काचबिंदु होतो. जपानी लोकांमध्‍ये तसेच स्‍ञीया किंवा रक्‍तवाहीनांच्‍या आजारांचा पुर्वइतिहास असणा-यांमध्‍ये याचे प्रमाण जास्‍त आहे.

- पिंगमेटरी काचबिंदु – डोळयांतील कृष्‍ण मंडळातुन (आयरीस) बाहेर पडणा-या रंगद्रव्‍यामुळे डोळयांच्‍या कोनामध्‍ये कचरा जमा होऊन डोळयातील प्रवाही द्रव्‍याला बाहेर पडण्‍यास अडथळा निर्माण होतो व हा दुर्मिळ प्रकाराचा काचबिंदु होतो. कालांतराने अवरोधीत कोनला झालेल्‍या दाहक प्रतिसाधामुळे डोळयातील प्रवाही जलाच्‍या निचरा प्रणालीला हानी पोहचु शकते. तुम्‍हाला या प्रकारात बहुतांशी कुठलीही लक्षणे दिसणार नाहीत. कधीतरी थोडी वेदना आणि धुसर नजर व्‍यायामानंतर जाणवेल. हा काचबिंदु मोठया प्रमाणावर गौरवर्णीय पुरुषांना त्‍यांच्‍या वयाच्‍या तिशीत किंवा चाळीसीच्‍या मध्‍यात आढळुन येतो.

- अनुषंगी काचबिंदु – दिर्घ कालीन काचबिंदुची लक्षणे जर जखमेनंतर झाली असतील तर तो अनुषंगी काचबिंदु समजतात. हा काचबिंदु जंतु संसंर्ग, दाहक प्रतिसाद, कॅन्‍सरची गाठ, मोतिबिंदुमुळे फुगणारे भिंग इ. कारणांमुळे देखील होऊ शकतो.

- जन्‍मजात काचबिंदु – का‍चबिंदुचा हा अनुवंशीक प्रकार जन्‍माच्‍या वेळीच आढळतो या प्रकाराच्‍या ८० टक्‍के केसेसचे निदान १ वर्ष वयाच्‍या आतच होते. हि मुले जन्‍मताच डोळयातील अरुंद कोन घेऊन किंवा डोळयांच्‍या निचरा प्रणालीमध्‍ये काही व्‍यंग घेऊन जन्‍माला येतात. जन्‍मजात काचबिंदुची लक्षणे समजणे अवघड जाते. कारण लहान मुले त्‍यांना काय होते हे समजत नसल्‍यामुळे निदान करणे अवघड जाते. जर तुम्‍हाला ढगाळ, पांढरे, धुसर, वाढ झालेले अथवा बाहेर पडु बघणारे डोळे जर तुमच्‍या मुलामध्‍ये आढळु लागते तर त्‍वरीत तुमच्‍या डॉक्‍टरांशी संपर्क साधा. हा का‍चबिंदु मुलींपेक्षा मुलांमध्‍ये जास्‍त आढळतो.

संकेत व लक्षणे

ब-याच वेळेस काचबिंदुला हा दृष्‍टी चोरणारा शांत चोर (“Silent thief of sight“) म्‍हटले जाते. कारण ब-याच प्रकारात वेदना नसतात वा कसलीही लक्षणे नसतात जो पर्यंत दृष्‍टींचा नाश झालेला असतो याच कारणासाठी काचबिंदुचे निदान होत नाही. जोपर्यंत ऑप्‍टीक नर्व्‍ह ची कायमस्‍वरुपी हानी झालेली असते. त्‍या सोबत नजरेची हानी झालेली असते. पंरतु तीव्र बंदचा काच‍बिंदु अचानक काही लक्षणे दिसतात ज्‍यामध्‍ये धुसर दृष्टि, प्रकाशा भोवती वलये, प्रचंड डोळयांच्‍या वेदना मळमळ आणि उलटया होतात. जर तुम्‍हाला अशी लक्षणे आढळली तर तुम्‍ही त्‍वरीत नेञ तज्ञांकडे जा किंवा तात्‍काळ वैदयकिय सेवा घ्‍या जेणेकरुन कायमस्‍वरुपी दृष्टि जाण्‍यापासुन तुम्‍ही वाचवु शकता.

रोग निदान व तपासणी

नियमित डोळे तपासणी डोळयांचा अंतर्गत दाब IOP तपासण्‍यासाठी टोनोमिटरचा उपयोग केला जातो विशिष्‍ट प्रकारे आय ड्रॉप चा वापर करुन तुमचा डोळा बधीर केला जातो आणि डोळयाच्‍या पृष्‍टभागावर फुंकर घालतात. काचबिंदु हा तुमच्‍या दृष्‍टीसाठी खुपच विघातक आहे खरे पाहता अंधत्‍व येणा-या कारणामधील जो दुस-या नंबरचा अग्रगण्‍य कारण आहे. असामान्‍य व जास्‍तीचा नेत्रवलंबी दबाव IOP हा डोळयांमधील द्रव्‍याची मात्रा मधील समस्‍या दर्शवतो यावर डोळा हा खुप प्रमाणात द्रव्‍याची निर्मिती करतो किंवा त्‍याचा निचरा व्‍यवस्थित नसतो. सर्व साधारणपणे IOP हा २१ mmHq पेक्षा (मिलीमीटर ऑफ मरक्‍युरी ) कमी असला पाहिजे मोजण्‍याचे एकक हे निश्‍चीत ठरवुन दिलेल्‍या क्षेत्रा मध्‍ये किती बळ कार्यप्रर्वरीत होते यावर ते अवलंबुन असते. जर तुमची IOP ही ३० mmHq पेक्षा जास्‍त असेल तर १५ किंवा त्‍यापेक्षा कमी IOP असणा-या व्‍क्‍तीपेक्षा तुमच्‍यामध्‍ये ४० पटीने अधिक काचबिंदुने दृष्‍टी नाश होण्‍याचा संभाव्‍य धोका असतो. त्‍यामुळे काचबिंदु उपचारांमधील आय ड्रॉप हे IOP कमी ठेवण्‍याच्‍या उद्देश्‍ समोर ठेवुन बनविले जातात.

काचंबिंदु नियंत्रणाची दुसरी पद्धती मध्‍ये अत्‍याधुनिक प्रतिबिंबिंय तंत्रज्ञानाचा वापर केला जातो जसे की, सुक्ष्‍म विश्‍लेषण X-ray, ध्रवण मिती (SLP), ऑप्‍टीकल कोहरन्‍स टोमोग्राफी (OCT) आणि‍ कॉनफोकल स्‍कॅनिंग लेझर ऑप्‍थॅल्‍मो स्‍कोपची प्रतिबिंबाची पायारेषा तयार करणे आणि डोळयांची दृष्‍टी चेता व अंर्तरचना यांची मोजणी करणे नंतर निर्देशित केलेल्‍या मध्‍यानावर जास्‍तीचे प्रतिबिंब आणि मोजणी घेतले जातात

व्हिज्‍युअल फिल्‍ड तपासणी
काचबिंदुमुळे तुमच्‍या दृष्‍टीचे नुकसान होत आहे का हे पाहण्‍यासाठी तुमच्‍या डॉक्‍टरांकडील व्हिज्‍युअल फिल्‍ड तपासणी हा एक मार्ग आहे. व्हिज्‍युअल फिल्‍ड तपासणीमध्‍ये मशीन मध्‍ये टक्‍ लावुन सरळ पहाणे आणि बटण दाबल्‍यानंतर तुमच्‍या बाहयवर्ती दृष्‍टीमध्‍ये प्रकाशाची मिचमिच अनुभवास येते. व्हिज्‍युअल फिल्‍ड तपासणी ही पुन्‍हा पुन्‍हा केली जाते, काचबिंदुमुळे क्रमाक्रमाने होणारे नुकसान मध्‍ये कालांतराने काही बदल आढळतो की नाही हे पाहण्‍यासाठी

गोनिओस्‍कोपी
डोळयातील पाण्‍याचा निचरा सुरळीत होतो की नाही हे पाहण्‍यासाठी गोनिओस्‍कोपी केली जाते (डोळयाच्‍या आतील रचना ज्‍यामुळे पाण्‍याचा प्रवाह नियंत्रित होतो व त्‍यायोगे नेत्रावलंबी दबाव वर प्रभाव पडतो.)

गोनिओस्‍कोपी मध्‍ये बॉयोमायक्रोस्‍कोप बरोबर काही विशिष्‍ठ भिंगाचा वापर केला जातो. डॉक्‍टरांना निदान करण्‍यास सोपे जाते. अल्‍ट्रासाऊंड बायोमायक्रोस्‍कोपी ही पध्‍दत देखिल उपयुक्‍त आहे.

उपचार
- तिव्रतेनुसार काचबिंदु उपचारामध्‍ये काचबिंदु शस्‍त्र क्रिया, क्ष्‍ किरण किंवा औषधोपचार इ. चा समावेश होतो. काचबिंदु नियंत्रित करण्‍यासाठी प्रथमतः औषधांबरोबर आय ड्रॉप्‍स्‍चा वापर केला जातो, IOP कमी करण्‍यासाठी,
- काचबिंदु हा वेदना रहित असल्‍याने लोक आय ड्रॉप्‍सचा काटेकोरपणे वापर करण्‍याबाबत निष्‍काळजी राहतात व कायमस्‍वरुपी डोळयांचे नुकसान होण्‍यापासुन रोकण्‍यामध्‍ये अडथळे येतात.
- खरे पाहता काचबिंदुमुळे येणा-या अंधत्‍वाचे मुख्‍य कारण म्‍हणजे काचबिंदु औषधांच्‍या विहित पद़धतीप्रमाणे पुर्तता न करणे हे होय
- काचबिंदु साठी वापरण्‍यात येणा-या आय ड्रॉप्‍स जर असुखकारक व गैरसोयीचा वाटत असल्‍यास डॉक्‍टरांशी बोलुन त्‍याऐवजी दुसरा पर्यायी ड्रॉप्‍स घेतल्‍याशिवाय त्‍याचा वापर बंद करु नका.

प्रतिबंधत्‍मक उपाय:
तुम्‍हाला काचबिंदु होण्‍याचा संभाव्‍य धोका तुम्‍ही कमी करु शकतात का ? अलीकडच्‍या काळातील युरोपियन अभ्‍यासानुसार व्‍यायाम हा काही व्‍यक्‍तींसाठी उपयोगी पडु शकतो. अमेरीकेच्‍या रिसर्चसना असे आढळलेले आहे की, उच्‍य शारीरिक व्‍यायामामुळे काचबिंदु होण्‍याच्‍या संभाव्‍य घटकांमधील एक लो ऑक्‍युलर पर फयुजन OPP प्रेशर कमी होतो. OPP हे एक गणिती मुल्‍य आहे ज्‍याची गणनी नेत्रवलंबी दबाव व त्‍याचा / तिचा रक्‍तदाब नुसार केली जाते.

सक्रिय जीवनशैली जगणे हे लोकांसाठी काचबिंदु तसेच इतर गंभीर आजारांचा संभाव्‍य धोका टाळण्‍यासाठी मदत करु शक्‍ते. सक्रिय जीवनशैली व नियमित व्‍यायाम बरोबरच धुम्रपान टाळणे, वजन सुस्थितीत ठेवणे, सकस व पौषीक आहार घेणे यांनी देखील काचबिंदुचा संभाव्‍य धोका टाळता येऊ शकतो असे डॉक्‍टर फोस्‍टर यांनी म्‍हटले आहे.

Dr. Pradnya  Gurav
Dr. Pradnya Gurav
MD - Homeopathy, Adolescent And Child Psychiatrist Homeopath, 8 yrs, Pune
Dr. Dhananjay Ostawal
Dr. Dhananjay Ostawal
BHMS, General Physician, 34 yrs, Pune
Dr. Rajesh  Tayade
Dr. Rajesh Tayade
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 10 yrs, Pune
Dr. Nitin Shingare
Dr. Nitin Shingare
MS/MD - Ayurveda, Ayurveda Dermatologist, 9 yrs, Pune
Dr. Sandeep Awate
Dr. Sandeep Awate
BAMS, Ayurveda Panchakarma, 15 yrs, Pune