Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
गर्भावस्थेत ताप येणे
#रोग तपशील#ताप



गर्भावस्थेत ताप येणे

गर्भाशयात गर्भ वाढत असलेल्या गर्भाच्या योग्य पद्धतीने वाढ होण्यासाठी आईचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. जर आई आपल्या गर्भधारणेदरम्यान आजारी असेक असेल तर तिच्या आजारपणाचा बाळाच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो.

गर्भवती असताना अनेक स्त्रियांना एकदा तरी ताप येतो. अश्यावेळी येणारा हा ताप बाळासाठी सुद्धा धोकादायक असतो मानण्यात येत. जर य दरम्यान ताप आलाच तर ताप कमी करून तापमान खाली आणण्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेच असते.

अश्यावेळी पहिली गोष्ट जी आपण तपासली पाहिजे ती म्हणजे शरीराचे तापमान आहे. जर शरीराचे तापमान 100.4 डिग्री फारेनहाइट पेक्षा अधिक असेल तर असे समजले जाते कीताप आला आहे.

बाळावर होणारा परिणाम
आपल्या बाळाचा गर्भाशयामध्ये सतत विकास होत असतो. आणि हा विकास एका विशिष्ट क्रमाने होत असतो. गरोदर असताना आजारी पडल्यावर बाळाच्या सामान्य व आणि विकास प्रक्रियेत अडथळा आणत असतो.

अवयव, अंग, रक्तवाहिन्या आणि इतर शरीराचे भाग योग्य वेळी वाढण्यासाठी विशिष्ट क्रमा असत. आपण घरतल असलेल्या आहारावर त्यातील प्रथिने आणि इतर घटकांवर बाळाची वाढ अवलंबून असते.

गरोदर स्त्रीच्या तापमानात थोडीशी जरी वाढ झाल्यास, म्हणजे समजा 98.6 ते 100.4 अंशापर्यंत जरी गेले तरी, ते प्रथिनांचे कार्य थांबवू शकते. ज्यामुळे, गर्भपात किंवा बाळामध्ये जन्मजात काही विकृती निर्माण होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे गरोदर असताना जर जरी ताप आल्यासारखे जाणवले तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

काही अभ्यासातून असे दिसून आले आहे कि पहिल्या पहिल्या त्रैमासिकात ताप येणे आपल्या बाळाच्या जन्मातील दोष जसे तोंडातील वरच्या भागात टाळूला भेग किंवा काही समस्या, मज्जसंस्थेच्या नलिकेशी निगडित समस्या तसेच आणि हृदय संबधित समस्या, निर्माण होण्याची शक्यता असते. जास्त प्रमाणातील तापामुळे गर्भजल कमी होण्याची शक्यता असते.

आईला का आणि कश्यामुळे ताप येतो हे त्यावेळच्या तपासणी मधून कळते. पण आपण ताप येऊ नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे लक्षांत घेणे आवश्यक आहे. ताप येण्याच्या लक्षणांपैकीं एक लक्षण म्हणजे इन्फेक्शन ज्यामुळे ताप येण्याची शक्यता असते.

आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी आईने निरोगी असणे आवश्यक असते. नेहमीच आणि विशेषतः गरोदर असताना आसपासचा परिसर स्वच्छ असणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुम्हांला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही.तसेच आपल्या शाररिक स्वच्छता देखील आवश्यक असते. ज्यावेळी आपण धुळ असलेल्या ठिकाणी स्पर्श करता तेव्हा आपले हात धुवा. किंवा बाहेरून आल्यावर हात पाय स्वच्छ धुवा. आजारी व्यक्तींपासून दूर राहा. कारण त्यांच्या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असते.

Dr. Mayur Patil
Dr. Mayur Patil
BHMS, Family Physician General Physician, 5 yrs, Pune
Dr. Vijay  Badgujat
Dr. Vijay Badgujat
MD - Homeopathy, Homeopath Family Physician, 7 yrs, Pune
Dr. Manoj Rahane
Dr. Manoj Rahane
BHMS, Homeopath, 13 yrs, Pune
Dr. Vinay Shankar Gupta
Dr. Vinay Shankar Gupta
MS - Allopathy, Dermatologist Family Physician, 40 yrs, Shimla
Dr. Sandeep Darunde
Dr. Sandeep Darunde
BAMS, Optician Ophthalmologist, 3 yrs, Pune