Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
योग्य आहारनं मायग्रेन टाळा
#मायग्रेन#डोकेदुखी

मायग्रेन म्हणजे अर्धशिशीचं प्रमुख लक्षण म्हणजे कपाळापासून सुरु होणारी तीव्र डोकेदुखी. मायग्रेनमध्ये कपाळ, डोक्याचा अर्धाभाग आणि डोळ्यांभोवती तीव्र वेदना होतात आणि या वेदना हळूहळू वाढत जातात. प्रखर प्रकाश आणि आवाजामुळे वेदना आणखी वाढू शकतात.

मायग्रेनची कारणं

चुकीचा आहार आणि जीवनशैली हे मायग्रेनचा त्रास होण्यामागील एक महत्त्वाचं कारण आहे.

आपल्या आहारामध्ये चुकीच्या पदार्थांचा समावेश केल्यामुळे या अन्नाचं पचन आतडे योग्यरितीने करु शकत नाहीत.

आपल्या आतड्यांच्या बाजूनं अन्न आंबवण्याची क्रिया होते आणि शरीरातही त्यामुळे हानिकारक घटकांची निर्मिती होते. अशा परिस्थितीमध्ये पचनसंस्था संवेदनशील असलेल्यांमध्ये मायग्रेनच्या वेदना सुरु होतात.

सेरोटोनिनची पातळी कमी होते तेव्हा मेंदूतील रक्तवाहिन्यांना सूज येते. ही सूज आल्यामुळेही डोकेदुखी तसंच मायग्रेनचा झटका आल्याचं म्हटलं जातं. सेरोटिन हा चेतना वाहक असल्यानं काही विशिष्ट प्रकारच्या ग्रंथी, पचनमार्ग, मध्यवर्ती मज्जा संस्था आणि रक्तातील प्लेटलेटमध्ये त्याचा समावेश असतो. ट्रायप्टोथानप्रथिनांमार्फत हा घटक शरीरात तयार केला जातो.

मायग्रेन आणि आहार यांचा परस्परांशी काय संबंध आहे?

आहारातील पथ्ये हा मायग्रेनवरील उपचार नसला, तरी मायग्रेनच्या लक्षणांना कारणीभूत ठरणारे अन्नपदार्थ ओळखणं आणि ते टाळणं मायग्रेनच्या झटक्यांना प्रतिबंध करण्यात उपयुक्त ठरु शकतात.

खालील अन्नपदार्थांमुळे साधारणपणे मायग्रेनची लक्षणं दिसून येतात

चीझ

चॉकलेट

केळी

लिंबूवर्गीयफळे

हॉटडॉग

मोनोसोडियमग्लुटामेट

अॅस्पार्टेम

चरबीयुक्तअन्न

आइस्क्रिम

कॅफीनचं सातत्यानं केलं जाणारं सेवन

मद्ययुक्तपेये, विशेषत: रेडवाइन आणि बीअर

चायनीज रेस्टोरंट्समध्ये तयार होणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये स्वाद वाढवण्यासाठी मोनोसोडियमग्लुटामेट अर्थात एमएसजी वापरलं जातं. सुप्स, सोयासॉस, सॅलडड्रेसिंग्ज, फ्रोझन अन्नपदार्थ, सुपमिक्स, क्रुटॉन्सस्टफिंगर तसंच काही प्रकारच्या चिप्समध्ये हे एमएसजी घातलेलं असतं. अन्नपदार्थांवरील लेबल्सवर सोडियम कॅसीनेट, हायड्रोलाइझ्डप्रोटीन्स किंवा ऑटोलाइझ्डयीस्ट ही नावं वापरून एमएसजी वापरलं जातं.

आहारासाठी मार्गदर्शक तत्त्वं

मायग्रेनचा त्रास होणाऱ्यांनी योग्य अन्नपदार्थांचे सेवन करुन सेरोटोनिन पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

सहज पचणारी प्रथिने योग्य प्रमाणातील कर्बोदकांसह घ्यावीत. ट्रायप्टोथान प्रकारची प्रथिनं कर्बोदकांसोबत घेतली तर ती उत्तम काम करतात. (उदाहरणार्थ, शेंगवर्गीय भाज्या, हातसडीचा भात किंवा फळं आणि टणक कवच असलेले पदार्थ).

हार्मोन्सचं कार्य सुरळीत सुरु राहावं, यासाठी प्रत्येकानं चांगल्या मेदाचं सेवन योग्य प्रमाणात केलं पाहिजे. (जवस, शेंगदाणे, ऑलिव्हऑइल किंवा फिशऑइल).

तंतूमय पदार्थ आणि दही यांचा आहारात समावेश असावा.

यामुळे आतड्यातील चांगल्या जीवाणूंची संख्या वाढते आणि विषारी द्रव्य शरीराबाहेर टाकली जातात.

प्रसन्न वाटायला लावणारे हार्मोन्स तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे व्यायाम. १५-२० मिनिटांचा व्यायामही सेरोटोनिन पातळी वाढवण्यास पुरेसा आहे.

जेवण टाळल्यामुळेही डोकेदुखीची समस्या वाढते.

चहा, कॉफी, साखरयुक्त पेये, चॉकलेटस यांसारखे उत्तेजक पदार्थ टाळा.

Dr. Zainab Shaikh
Dr. Zainab Shaikh
BAMS, Ayurveda, 2 yrs, Pune
Dr. Ashwinikumar Kale
Dr. Ashwinikumar Kale
MD - Homeopathy, Homeopath Gynaecologist, 10 yrs, Pune
Dr. Vidya Deore
Dr. Vidya Deore
MS/MD - Ayurveda, Gynaecologist, 14 yrs, Pune
Dr. Harshada Giri
Dr. Harshada Giri
BDS, Dental Surgeon, 13 yrs, Pune
Dr. Manoj Rahane
Dr. Manoj Rahane
BHMS, Homeopath, 13 yrs, Pune