Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
जास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या
#व्यायाम#वजन वाढणे

दररोज व्यायाम केल्याने वजन कमी करण्यास मदत होते, असा आपल्या सर्वांचाच समज असतो. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? व्यायामही वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतो. होय... तुम्ही बरोबर ऐकलंत. तुम्ही करत असलेला व्यायामही वजन वाढण्याचं कारण ठरतो.

व्यायाम वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो, हे खरं आहे. पण गरजेपेक्षा जास्त व्यायाम फक्त वजनच वाढवत नाही तर अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उद्भवण्यासाठीही कारण ठरतं. जर तुम्ही दररोज अनेक तास जिममध्ये व्यायाम करत असाल तर याचे साइड इफेक्ट्सबाबत नक्की विचार करा. कारम जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त व्यायाम करत असाल तर शरीरावर त्याचा विपरित परिणाम होतो.

द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, व्यायामाबाबत अनेक संशोधनांमधून आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यांमधून हेच सिद्ध होतं की, एका व्यक्तीला एका आठवड्यामध्ये 2 ते 5 तासांचा सधा आणि सोपा व्यायाम आणि दीड ते अडिच तासांचा सामान्य व्यायाम करणं गरजेचं आहे.

जेव्हा तुम्ही आठवड्यामध्ये 2 ते 5 तास व्यायाम करता, त्यावेळी तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्म व्यवस्थित काम करतं. तसेच यामुळे तुम्ही वजन नियंत्रणात ठेवण्यासोबतच बॉडिदेखील व्यवस्थित तयार करू शकाल.

शरीरासाठी किती व्यायाम गरजेचा?

एका व्यक्तीला दररोज किती व्यायाम करणं आवश्यक असतं, हे तिच्या शरीरयष्टीसोबतच तिच्या उंचीवरही अवलंबून असतं. परंतु, यासाठी शरीराची स्थिती आणि वय या गोष्टीही लक्षात घेणं आवश्यक ठरतं.

एका व्यक्तीने एका दिवसामध्ये 3 तासांपेक्षा जास्त व्यायाम किंवा जिम करू नये. कारण एका संशोधनानुसार, जर व्यक्ती 5 तासांपेक्षा जास्त वर्कआउट दररोज करत असेल तर त्याला ब्लड प्रेशर आणि मसल्ससोबत हाडांच्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो.

जास्त व्यायाम केल्याने होणारे नुकसान

जास्त व्यायाम केल्याने वेगवेगळे साइड इफेक्ट्स लोकांमध्ये दिसून येतात. काही साइड इफेक्ट्स असे असतात. जे सर्वांमध्ये एकसमान असतात.

- हार्ट रेट वाढणं
- भूक फार कमी लागणं किंवा खूप लागणं
- पायांमध्ये वेदना होणं आणि शरीराला थकवा जाणवणं
- शरीरामध्ये पाण्याची कमतरता होणं
- शरीराच्या मेटाबॉलिज्म रेटवर परिणाम होणं
- आपण सर्वच जाणतो की, दररोज व्यायाम केल्याने मेटाबॉलिक रेटवर परिणाम होतो. परंतु जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त व्यायाम करता, त्यावेळी मेटाबॉलिज्मवर परिणाम होतो.

जेव्हा मेटाबॉलिक रेट जास्त वाढतो, त्यावेळी भूक फार वाढते. जास्त भूक लागल्यामुळे पाचनतंत्र फार वेगाने काम करतं. अशावेळी तुम्ही जेकाही खाल, त्याचं वेगाने पचन होतं.

जास्त एक्सरसाइज केल्याने का वाढतं वजन?

जास्त एक्सरसाइज केल्याने वाढणाऱ्या वजनाचं अगदी सोपं कारण म्हणजे, मेटाबॉलिक रेटवर होणारा परिणाम. यामुळे आपल्याला भूक जास्त लागते आणि वजनही वेगाने वाढतं. यावर व्यक्तीचा कंट्रोलही राहत नाही.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. कारण प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

Dr. Vishnu Gawande
Dr. Vishnu Gawande
BHMS, Family Physician, 9 yrs, Pune
Dr. Mangesh Khandave
Dr. Mangesh Khandave
DNB, Pediatrician, 17 yrs, Pune
Dr. Dr Anirudha Vaidya
Dr. Dr Anirudha Vaidya
MPTh, Neuro Physiotherapist Obesity Specialist, 7 yrs, Pune
Dr. Neha Dhakad
Dr. Neha Dhakad
BHMS, Homeopath Family Physician, 14 yrs, Bengaluru (Bangalore)
Dr. Sabir Patel
Dr. Sabir Patel
MBBS, General Medicine Physician General Physician, 2 yrs, Bharuch