Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Home Remedies :
There is nothing supernatural with home remedies to treat many common illnesses and health problems. They have also been used as the earliest form of medicines. With side effects of chemical drugs on rise, homemade remedies are getting momentum. Read home remedies health tips on HelloDox.

होळीचा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तुम्हीही होळीसाठी खास तयारी करत असालचं... होळी म्हणजे रंगाची उधळण करणारा सण. मग तुम्ही या दिवसाला आणखी रंगीबेरंगी करण्यासाठी रंग खरेदी केले की नाही? काय सांगता अजून रंग खरेदी केले नाहीत. काही हरकत नाही. बाजारामध्ये मिळणाऱ्या केमिकलयुक्त रंगांपेक्षा तुम्ही काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुमच्या आवडीचे रंग घरीच तयार करू शकता.

होळीसाठी बाजारामध्ये जे रंग उपलब्ध असतात. त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल्स असतात. असे रंग त्वचेसोबतच आरोग्यासाठीही धोकादायक ठरतात. त्याऐवजी जर गरच्या घरीच रंग तयार करून त्याने होळी खेळलात तर आरोग्य जपण्यास मदत होईल. तुम्ही घरी रंग तयार करण्याचा विचार करत असाल तर घरात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंच्या मदतीने नैसर्गिक पद्धतीने रंग तयार करू शकता. हे रंग त्वचेला नुकसान पोहचवण्याऐवजी फायदाच पोहोचवतात.


घरीच तयार करा नैसर्गिक रंग :

1. पिवळा रंग

बेसन आणि हळद दोन्ही एकत्र करून घ्या. हे एकत्र केल्यानंतर तुम्हाला सुकलेला पिवळा रंग मिळण्यास मदत होईल. हे दोन्ही पदार्थ त्वचेसाठी फायदेशीर आहेत. हळदीमध्ये अन्टीसेफ्टिक गुणधर्म आढळून येतात. तर बेसन चेहरा स्वच्छ करण्यासाठी मदत करतं. तुम्हाला गरज असेल तर झेंडूची फुल पाण्यामध्ये उकळून पिवळा रंग तयार करू शकता.

2. गुलाबी रंग

गुलाबी रंग जास्तीत जास्त मुलींना जास्त आवडतो. गुलाबी रंग तयार करण्यासाठी तुम्ही बीटाचा वापर करू शकता. त्यासाठी बीटाची मुळं किंवा बीट पाण्यामध्ये उकळून घ्या, त्यानंतर ते गाळून त्यामध्ये दूध एकत्र करा.

3. नारंगी रंग

नारंगी रंग तयार करण्यासाठी तुम्ही केशर पाण्यामध्ये एकत्र करून रात्रभरासाठी तसचं ठेवा. लगेच नारंगी रंग तयार करायचा असेल तर केशर पाण्यामध्ये टाकून उकळून घ्या. जेव्हा पाणी थंड होइल त्याचा वापर रंग म्हणून करा.

4 ब्राउन कलर

कॉफी पावडरचा वापर करून ब्राउन रंग तयार करून शकता किंवा चहा पावडर पाण्यामध्ये उकळूनही तुम्ही ब्राउन रंग तयार करू शकता. पण लक्षात ठेवा हा रंग जात नाही. तुम्ही हा रंग तयार करण्यासाठी मुलतानी मातीचाही वापर करू शकता.

5. हिरवा रंग

हिरवा रंग तयार करण्यासाठी तुम्ही हलदीमध्ये नीळ एकत्र करू शकता. याव्यतिरिक्त पालक, धने, पुदिना, टॉमेटो किंवा कडुलिंबाची पानं वाटून पाण्यामध्ये एकत्र करा. तुम्ही हे कोरड्या रंगाच्या रूपामध्येही वापरू शकता.

6. निळा रंग

निळीचा वापर करून निळा रंग तयार करता येतो.

7. लाल रंग

कोरडा लाल रंग तयार करण्यासाठी लाल जास्वंदाच्या फूलाचा वापर करू शकता. त्यासाठी जास्वंदाच्य फूलाची पावडर पिठासोबत एकत्र करून तयार करा. त्याऐवजी गाजराला पाण्यामध्ये उकळून लाल रंग तयार करू शकता.

जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कान, डोळे, घशाच्या इन्फेक्शनने ग्रस्त असाल तर डॉक्टर अ‍ॅंटीबायोटिक औषधे घेण्याचा सल्ला देतात. अ‍ॅंटी-बायोटिक औषधांचा वापर बॅक्टेरिअल इंन्फेक्शनच्या उपचारासाठी केला जातो. याचं सेवन केल्याने बॅक्टेरिया नष्ट केले जातात आणि त्यांचा विकासही नष्ट केला जातो. पण याचं जास्त सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक प्रणाली कमजोर होते. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांच्या जाळ्यात तुम्ही ओढले जाता. पण अ‍ॅंटीबायोटिकचे साइड इफेक्ट काही घरगुती उपयांनी तुम्ही दूर केले जाऊ शकतात. चला जाणून घेऊ काय आहेत हे उपाय...

प्रोबायोटिक दह्याचं सेवन करा - जेव्हा तुम्ही अ‍ॅंटीबायोटिकचं सेवन करता तेव्हा तुम्हाला दही खाण्याचा सल्ला दिला जातो. या दह्यामुळे तुमचा डायरिया होण्यापासून बचाव होतो. डायरिया अ‍ॅंटीबायोटिकचा सर्वात सामान्य साइड इफेक्ट आहे. त्यामुळे दही खाल्ल्याने शरीरात लॅक्टिक अ‍ॅसिड तयार होतं आणि याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

आलं खा - आलं एक नैसर्गिक अ‍ॅंटीबायोटिक आहे. याने नुकसानकारक मायक्रोब्सला अ‍ॅंटीबायोटिकचे साइड इफेक्ट न होऊ देता नष्ट केलं जातं. आल्यामध्ये महत्वपूर्ण तत्त्व एलिसिन असतं, जे किडनी आणि लिव्हरची अ‍ॅंटीबायोटिकपासून रक्षा करतं. आहारातून आल्याचं सेवन केल्यास शरीरातील सर्व विषारी तत्त्व नैसर्गिक पद्धतीने बाहेर पडतात. तुम्ही आलं चहाच्या रूपातही सेवन करू शकता.

पाणी प्या - औषधांमुळे तोंड कोरडं पडतं. तसेच अ‍ॅंटीबायोटिकच्या साइड इफेक्टमुळे डायरिया, उलटी यांसारख्या समस्याही होतात. याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी प्यावे. तसेच हिरव्या भाज्या आणि फळांचंही सेवन करावं. याने शरीरातील पाणी नियंत्रित राहतं.

ब्रेड, डेअरी उत्पादनांचं सेवन करा - अ‍ॅंटी-बायोटिकच्या साइड इफेक्टपासून बचाव करण्यासाठी तुम्ही डेअरी उत्पादने, क्रेकर आणि ब्रेड यांचं सेवन करायला हवं. सोबतच जेव्हा तुम्ही अ‍ॅंटी-बायोटिकचं सेवन करत असाल तेव्हाही याचं सेवन करावं. हे सहजपणे पचतात आणि पचनक्रियेलाही आराम मिळतो. त्यामुळे तुम्ही लवकर बरे होऊ शकता.

पावसाळ्यामुळे वातावतरणात अल्हाददायक वातावरण निर्माण होते. मात्र ऊन-पावसाच्या खेळामुळे वातावरणात होणारा बदल आरोग्याला त्रासदायक ठरतो. वातावरणातील बदलामुळे अनेकांना घशात खवखव जाणवते. घशातील या खवखवीचा त्रास ओषधगोळ्यांपेक्षा काही नैसर्गिक उपायांनी आटोक्यात आणणं शक्य आहे. याकरिता ज्येष्ठमध फायदेशीर ठरते.

फायदेशीर ज्येष्ठमध
प्राचीन काळापासून भारतामध्ये ज्येष्ठमध आयुर्वेदीक उपचारांमध्ये वापरले जाते. आहारात स्वाद वाढवण्यासाठी वापरलं जाणारं ज्येष्ठमध घशातील खवखव कमी करण्यास फायदेशीर ठरते. ज्येष्ठमधामध्ये फायटोकेमिकल्स घटक आढळतात. फ्लैनोनोड्स, चाल्कोन्स, सैपोनिन आणि एक्सनोएस्ट्रोजेन्स या औषधी गुणधर्मामुळे घशातील खवखव कमी होण्यास, आवाज मोकळा होण्यास मदत होते.

कसा कराल ज्येष्ठमधाचा उपयोग?
घशातील खवखव कमी करण्यास, छातीमध्ये साठलेला कफ मोकळा करण्यास, हाडांना, मांसपेशींना मजबूत करण्यासाठी, तोंड आल्यानंतर होणारा त्रास कमी करण्यासाठी, केसगळती रोखण्यासाठी ज्येष्ठमध फायदेशीर आहे. याकरिता नियमित लहानसा ज्येष्ठमधाचा तुकडा चघळत रहा.


ज्येष्ठमधाचा फायदा ?
मेंदूला चालना - ज्येष्ठमधामुळे मेंदूच्या कार्याला चालना मिळते. यामधील अ‍ॅन्टिऑक्सिडंट गुणधर्म मेंदूंच्या पेशींना बळकटी देतात.

हृद्याचे आरोग्य - कोलेस्ट्रेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते.

रोगप्रतिकारशक्ती - शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आवश्यक घटक लिम्फोसाइट्स आणि मैक्रोफेज ज्येष्ठमधामध्ये असतात.

हार्मोनल संतुलन - ज्येष्ठमधातील फाइटोस्ट्रोजेनिक घटक महिलांमध्ये हार्मोन्सचे असंतुलन नियमित ठेवण्यासाठी मदत करते. मेनोपॉजचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते.

अ‍ॅन्टी बॅक्टेरियल - शरीरात घातक मायक्रोबायल्सची वाढ रोखण्याची क्षमता ज्येष्ठमधामध्ये आहे. यामुळे शरीरात व्हायरसचा धोका कमी होतो.

अ‍ॅन्टी अल्सर - ज्येष्ठमधामध्ये अ‍ॅन्टिऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म असल्याने पोटातील, आतड्यामधील, तोंडातील अल्सरचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत भयंकर आहे. हा त्रास वेदनादायी असला तरीही या आजाराबद्दल फारसे खुलेपणाने बोलले जात नाही. परिणामी अनेकांमध्ये या त्रासाची तीव्रता वाढल्यानंतर वैद्यकीय मदत घेतली जाते. फास्टफूट, अरबट चरबट पदार्थ, मसालेदार पदार्थांवर ताव मारण्याची सवय यामुळे केवळ जीभेचे चोचले पुरवले जातात. मात्र खाण्याच्या अशा सवयींमुळे पचनाचे आजर बळावतात. मूळव्याध जडण्यामागेदेखील अशीच कारणं असतात.

मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी घरगुती उपाय -
सुरूवातीच्या टप्प्यामध्ये मूळव्याधीच्या समस्येकडे लक्ष दिल्यास त्याचे स्वरूप गंभीर होण्याचा धोका कमी असतो. याकरिता काही घरगुती उपायांनी त्यावर मात करता येऊ शकते.

कडुलिंब -
कडुलिंबाच्या लिंबोळ्या आणा. त्यावरील साल काढून आतील बीज काढा. हे बीज कुटून चिचुक्याऐवढ्या 21 गोळ्या करा. या गोळ्या नियामित दूधासोबत घ्याव्यात.
या उपायादरम्यान आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. मांसाहार, पचायला जड असणारे पदार्थ आहारात टाळा. यामुळे मूळव्याधीचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते.

घरगुती मलम -
रूईच्या पानांमधील चीक काढा. यामध्ये हळद मिसळून पेस्ट बनवा. या पेस्टचा केवळ एक ठिपका त्रास होत असलेल्या जागी लावा. नियमित सात दिवस हा उपाय करावा. यामुळे मूळव्याधीचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होईल.

मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी आहे. सुरूवातीच्या टप्प्यावरच मूळव्याधीच्या आजाराकडे लक्ष न दिल्यास बघता बघता हा त्रास गंभीर होतो. समाजात या आजाराबद्दल खुलेपणाने बोलले जात नसल्याने हा त्रास भयंकर वेदनादायी झाल्यावर त्यावर उपचार शोधले जातात. म्हणूनच सुरूवातीलाच मूळव्याधीचा त्रास लक्षात आल्यास काही घरगुती उपायांनी यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

मेथी ठरते गुणकरी
स्वयंपाकघरामध्ये मेथीचे दाणे विविध स्वरूपात वापरले जातात. मधुमेहींप्रमाणेच मूळव्याधीच्या रूग्णांसाठीदेखील मेथी फायदेशीर आहे. मेथीच्या दाण्यांमध्ये फोलिक अ‍ॅसिड, मॅग्नीशियम, सोडियम, झिंक, कॉपर, नियासिन, थियामिन, कॅरोटीन हे घटक आढळतात.

कसे ठरतात मेथीचे दाणे फायदेशीर ?
भिजवलेले मेथीचे दाणे मूळव्याधीचा त्रास मूळासकट नष्ट करण्यास मदत करते. नियमित सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे चावून खाल्ल्यास फायदेशीर ठरतात.


5 ग्राम मेथी आणि 5 ग्राम सोयाबीन एकत्र दळून सकाळ संध्याकाळ पाण्यासोबत प्यायल्यास फायदा होतो. तुम्हांला हे मिश्रण कडवट वाटत असल्यास त्यामध्ये थोडी साखर मिसळू शकता.

मेथी दाण्याची पेस्ट त्रास होत असलेल्या, खाज येत असलेल्या, जळजळ होत असलेल्या जागी लावल्यास आराम मिळतो.

Dr. Sohan Narkhede
Dr. Sohan Narkhede
MBBS, Ophthalmologist, Pune
Dr. Surekha Borade
Dr. Surekha Borade
MS/MD - Ayurveda, Yoga and Ayurveda General Physician, 16 yrs, Raigad
Dr. Rahul Pherwani
Dr. Rahul Pherwani
BHMS, 22 yrs, Pune
Dr. Suhas Shingte
Dr. Suhas Shingte
BAMS, Family Physician General Physician, 18 yrs, Pune
Dr. Sagar Chavan
Dr. Sagar Chavan
MD - Allopathy, Abdominal Radiologist Pediatric Radiologist, 8 yrs, Pune
Hellodox
x