Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Healthy Living :
Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.

वातावरणातील बदल किंवा वाढतं प्रदुषण यांमुळे अनेक लोकांना सायनसची समस्या उद्भवते. वातावरणातील बदलांमुळे सायनसची समस्या वाढण्याचा धोका आणखी वाढतो. सायनस म्हणजे शरीराला झालेलं एक प्रकारचं इन्फेक्शनच असतं. सायनसमुळे नाकाचं हाड, गाल आणि डोळेही दुखू लागतात. जाणून घेऊयात असे काही घरगुती उपाय ज्यांमुळे सायनसच्या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी तुम्हाला मदत होईल.

1. सायनसपासून सुटका करून घेण्यासाठी गरम पाण्याची वाफ घ्या. त्यामुळे नाकात आणि गळ्यामध्ये जमलेली धूळ आणि मातीचे कण साफ होऊन जातात. यामुळे सायनसच्या समस्येपासून सुटका होते. गरम पाण्याची वाफ घेताना त्यामध्ये निलगिरीच्या तेलाचे काही थेंब टाकणं फायदेशीर ठरतं.

2. सायनसचा त्रास होत असेल तर नेहमी थोड्याशा शिजवलेल्या भाज्यांचं सूप , सफरचंद, डाळी आणि भाज्यांचं सेवन करा. याव्यतिरिक्त कफ तयार होण्यास मदत करणारे पदार्थ म्हणजे, चॉकलेट, अंडं, साखर आणि मैदा यांसारख्या पदार्थांचं सेवन करणं टाळा. तसेच जास्त तेलकट पदार्थांचं सेवन केल्यामुळेही सायनसचा त्रास होऊ शकतो. यावर भरपूरप्रमाणात पाणी पिणं फायदेशीर ठरतं.

3. सायनसवर कांदा आणि लसणाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात सल्फर असतं. जे सर्दी , खोकला आणि सायनसच्या इन्फेक्शनवर गुणकारी ठरतं. तसेच कांद्याचा दर्प सायनसवर लाभदायक ठरतो. त्यासाठी कांदा आणि लसून पाण्यामध्ये उकळून त्या पाण्याची वाफ घ्या. असं केल्यामुळे तुम्हाला सायनसच्या त्रासापासून आराम मिळेल.

4. गरम पाण्यामध्ये पुदीन्याच्या पानांच्या रसाचे काही थेंब टाकून त्याची वाफ घ्या. आराम मिळेल.

5. मेथीचे काही दाणे गरम पाण्यामध्ये उकळून प्यायल्याने सायनसचे इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते.

6. जर सायनसचा जास्त त्रास होत असेल तर दररोज ऑलिव्ह ऑईलने नाकावर मसाज करा. सायनसमुळे होणारा त्रास दूर होईल.

अनेकदा गादीवर झोपून कंटाळा आल्यामुळे किंवा गरम होत असल्याने आपण गादीवर न झोपता जमिनीवर झोपतो. यावेळी आपल्याला अनेकदा जमिनीवर झोपू नये असा सल्लाही मिळतो. पण जमिनीवर झोपण्याचे आपल्या शरीराला आणि आरोग्याला अनेक फायदेही आहेत. पण त्यासाठी तुम्हाला दररोज काही वेळ जमिनीवर झोपण्याची गरज असते. सुरुवातीला थोडं अवघड जाईल पण, त्यानंतर तुम्हाला याची सवय होईल. जाणून घेऊयात जमिनीवर झोपण्याचे आरोग्यदायी फायदे...

जमिनीवर झोपणं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. हाडांसाठी फायदेशीर ठरण्यासोबतच ते आपल्या शरीराचा थकवा, ताण दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतं.

हाडांच्या संरचनेत सुधारणा

जर तुम्हाला हाडांसंबधी काही समस्या झाली असेल तर त्यासाठी जमिनीवर झोपणं हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी काहीवेळ का होईना तुम्हाला जमिनीवर झोपणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमची ही समस्या दूर होण्यास मदत होईल.

पाठीच्या दुखण्यापासून सुटका

जमिनीवर झोपल्यामुळे तुम्ही पाठीच्या दुखण्यापासून सुटका करून घेऊ शकता. त्यामुळे पाठीचं दुखणं नाहीसं करण्यासाठी जमिनीवर झोपणं सुरू करा.

खांद्यांसाठी फायदेशीर

जमिनीवर झोपणं तुमच्या खांद्यांसाठी फायदेशीर ठरेल. यामुळे तुमच्या खाद्यांच्या सर्व समस्या दूर होतील.

तणाव दूर करण्यासाठी

असं म्हटलं जातं की, जमिनीवर झोपल्यामुळे थकवा आणि तणावांसारख्या समस्या दूर होतात. तसेच जर काही मानसिक समस्या असतील तर त्यादेखील दूर होण्यास मदत होते.

नुकतीच श्रावणाला सुरुवात झाली. या दिवसात अनेकजण श्रावण सोमवार पाळतात आणि उपवास करतात. उपवास करण्याचे जसे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत तसे त्याचे काही नुकसानही आहेत. मात्र हे नुकसान काही लोकांनाच होऊ शकतात. काही आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना डॉक्टर उपवास करण्यास मनाई करतात. कारण असे केल्यास त्यांचं आरोग्य आणखी धोक्यात येऊ शकतं. अशाच काही लोकांबद्दल आपण माहिती घेऊया ज्यांनी उपवास अजिबात करू नये.

1) डायबिटीजच्या पेशन्ट्ससाठी वेळेवर जेवण करणे, औषध घेणे गरजेचं असतं. अशात त्यांनी जर उपवास करून शरीराची उपासमार केली तर त्यांना त्याचा मोठा फटका बसू शकतो.

2) हाय ब्लड प्रेशरच्या बिपीच्या पेशन्टनी जर उपवास केला तर त्यांचं बॉडी सिस्टम बिघडू शकतं. उपवास केल्याने त्यांना अधिक त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

3) नुकतीच ज्या पेशन्टची सर्जरी झाली आहे त्यांनीही उपवास करू नये. सर्जरी झाल्यानंतर जखम सुकण्यासाठी बॉडीला आवश्यक व्हिटॅमिन आणि मिनरल्सची गरज असते.

4) ज्या लोकांमध्ये रक्ताची कमतरता आहे त्यांनी उपवास करू नये. उपवास केल्यास अशांना शरीरात कमजोरी आणि थकवा अधिक जाणवू शकतो.

5) हार्टच्या पेशन्टना खाण्या-पिण्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं. जर ते जास्त वेळ उपाशी राहिले तर त्यांच्या शरीराचं सिस्टम बिघडू शकतं.

6) ज्या लोकांना फुफ्फुसामध्ये काही त्रास असेल तर त्यांनीही उपवास करू नये. याने त्रास अधिक वाढू शकतो.

7) प्रेग्नेंट महिलांना सतत व्हिटामिन्स आणि मिनरल्सची गरज असते. जर या दरम्यान त्यांनी उपवास केला तर अशाने महिला आणि तिच्या बाळावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

8) स्तनपान करणा-या महिलांनीही उपवास करू नये. यामुळे मुलांना आवश्यक ते व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळत नाहीत. याचा मुलांच्या वाढीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.

मीठ आणि मुत्रातील खनिज पदार्थ एकमेकांच्या संपर्कात आल्याने किडनीस्टोनचा धोका संभवतो. किडनीस्टोनचे प्रकारही वेगवेगळे आहेत.

यावर काही प्रमाणात का होईना पण, घरगुती उपायही करता येतात. त्यावरील हा आढावा..

* आहारात केळी असवीत
केळ्यात बी-६ नावाचे जीवनसत्वा असते.

या जीवनसत्वामुळे मुत्र खड्यांच्या निर्मितीला आळा बसतो. तसेच किडनीस्टोन झालेल्यांना केळ्याच्या सेवनाने आराम पडतो.

गोमुखासन हे एक बैठक स्थितीतील आसन आहे. जमिनीवर सुखासनात प्रथम बसावे. नंतर डाव्या मांडीवर उजवी मांडी ठेवण्याचा प्रयत्न करावा. अशा पद्धतीने गायीच्या तोंडाच्या आकाराच्या दुमडलेल्या मांड्या एकावर एक ठेवण्याचा प्रयत्न करावा. नंतर डावा हात खालून वर व उजवा हात वरून खाली एकमेकांना गुंफून पकडण्याचा प्रयत्न करावा. श्‍वसन संथ ठेवावे. अशा स्थितीत स्थिर राण्याचा प्रयत्न करावा. गोमुखासन हे जसे डाव्या बाजूने करतात तसेच ते उजव्या बाजूनेही करता येते. त्यावेळी उजवा हात खालून वर व डावा हात वरून खाली पाठीवर दोन्ही हात पकडण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी केलेले गोमुखासन आपल्या हातापायांना चांगलाच व्यायाम देते. गुडघ्याचे सर्व आजार या आसनाने दूर होऊ शकतात. बगलेमध्ये जर गाठ आली असेल तर तीदेखील बरी होण्यास मदत होते. या आसनाने अतिरिक्‍त चरबी घटते. नाडी शुद्ध होते. गुडघे, पोटऱ्या, मांड्या, हातापायांचे स्नायू, दंड यामधील कार्य सुधारायला मदत होते. पहिल्यांदा दोन्ही हात पकडता येत नाही. या आसनामुळे स्त्री-पुरुषांचा लैंगिक सुखाचा आनंद द्विगुणित होतो. स्त्रियांचे गर्भाशयाचे विकार बरे होतात. पायांमध्ये ताकद येते. पोटऱ्यांचा मांसलपणा कमी होतो. आपल्या सीटवर चढलेली चरबी कमी व्हायला मदत होते. स्त्रियांना कमनीय बांधा टिकवायचा असेल तर त्यांनी रोज न चुकता गोमुखासन करावे.

स्थुलत्व प्राप्त झालेल्या लोकांना आपल्या जाडीमुळे हे आसन करायला त्रास होतो. पण तरीही त्यांनी जमेल तेवढे व जमेल तसे गोमुखासन नियमित करावे. पाय गुडघ्यात दुमडून नितंबाला असा काही लावावा की ज्याने नाभीचे कार्य कार्य योग्यप्रकारे चालू राहते व नाडी शुद्ध होते. आपल्या गुडघ्यांचा आकार पाय दुमडून गुडघे एकमेकांवर ठेवल्यामुळे अगदी गायीच्या तोंडासारखा होतो. हिंदूधर्मात गाईला पवित्र मानतात, योगामध्ये देखील हे आसन ध्यानासाठी पवित्र मानले आहे. फक्‍त ध्यान करताना मान सरळ ठेवावी. अनाहत चक्रावर या आसनात दाब पडतो.
पुरुषांनी हे आसन नियमित केल्यास अंडकोष आणि शुक्राणूंची वाढ होते. वीर्यविकारांना दूर करणारे गोमुखासन हातापायांच्या स्नायूंबरोबरच शरीराची स्नायूसंस्था मजबूत बनवते. मन एकाग्र करायचे असेल तर गोमुखासन रोज करावे. समागमाचा आनंद स्त्री आणि पुरुष दोघांनाही या आसनामुळे प्राप्त होतो म्हणून स्त्रियांबरोबर पुरुषांनीही हे आसन नियमित केले पाहिजे.

या आसनात जास्तीत जास्त मनामध्ये सावकाश वीस अंक मोजून स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा. “स्थिरम्‌ सुखम्‌ आसनम्‌’ या योगातील उक्तीचा प्रत्यय हे आसन नियमित करणाऱ्यांना येतो. कालावधी हळूहळू वाढवावा. मूळव्याध व मधुमेह असणाऱ्यांनी हे आसन रोज करावे. ज्यांचे पोटाचे ऑपरेशन झालेले आहे अथवा पाठीची शस्त्रक्रिया झाली आहे किंवा कृत्रिम हाड रोपण हातापायांमध्ये करण्यात आलेले आहे, अशांनी गोमुखासन करू नये. जेवढी स्थिरता वाढेल तेवढे या आसनाचे फायदे आपल्याला मिळतील. प्रवास करून करून शिणलेल्या हातापायांना शक्ती व स्फूर्ती प्रदान करण्यासाठी हे आसन करावे. मधुमेहाप्रमाणेच अंगावरील कोड जाण्यासही गोमुखासन मदत करते.

Dr. Sumit Patil
Dr. Sumit Patil
BAMS, Family Physician General Physician, 15 yrs, Pune
Dr. Chandrakumar Deshmukh
Dr. Chandrakumar Deshmukh
BAMS, Ayurveda Panchakarma, Pune
Dr. Dinkar Padade
Dr. Dinkar Padade
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 30 yrs, Pune
Dr. Vishwas Takale
Dr. Vishwas Takale
BAMS, General Physician, 19 yrs, Pune
Dr. Divya Prakash
Dr. Divya Prakash
MDS, Dentist Implantologist, 6 yrs, Pune
Hellodox
x