Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
गोमुखासन हे मूळव्याधीवरील उपचार
#योगा#योग आसन#निरोगी जिवन

गोमुखासन हे एक बैठक स्थितीतील आसन आहे. जमिनीवर सुखासनात प्रथम बसावे. नंतर डाव्या मांडीवर उजवी मांडी ठेवण्याचा प्रयत्न करावा. अशा पद्धतीने गायीच्या तोंडाच्या आकाराच्या दुमडलेल्या मांड्या एकावर एक ठेवण्याचा प्रयत्न करावा. नंतर डावा हात खालून वर व उजवा हात वरून खाली एकमेकांना गुंफून पकडण्याचा प्रयत्न करावा. श्‍वसन संथ ठेवावे. अशा स्थितीत स्थिर राण्याचा प्रयत्न करावा. गोमुखासन हे जसे डाव्या बाजूने करतात तसेच ते उजव्या बाजूनेही करता येते. त्यावेळी उजवा हात खालून वर व डावा हात वरून खाली पाठीवर दोन्ही हात पकडण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी केलेले गोमुखासन आपल्या हातापायांना चांगलाच व्यायाम देते. गुडघ्याचे सर्व आजार या आसनाने दूर होऊ शकतात. बगलेमध्ये जर गाठ आली असेल तर तीदेखील बरी होण्यास मदत होते. या आसनाने अतिरिक्‍त चरबी घटते. नाडी शुद्ध होते. गुडघे, पोटऱ्या, मांड्या, हातापायांचे स्नायू, दंड यामधील कार्य सुधारायला मदत होते. पहिल्यांदा दोन्ही हात पकडता येत नाही. या आसनामुळे स्त्री-पुरुषांचा लैंगिक सुखाचा आनंद द्विगुणित होतो. स्त्रियांचे गर्भाशयाचे विकार बरे होतात. पायांमध्ये ताकद येते. पोटऱ्यांचा मांसलपणा कमी होतो. आपल्या सीटवर चढलेली चरबी कमी व्हायला मदत होते. स्त्रियांना कमनीय बांधा टिकवायचा असेल तर त्यांनी रोज न चुकता गोमुखासन करावे.

स्थुलत्व प्राप्त झालेल्या लोकांना आपल्या जाडीमुळे हे आसन करायला त्रास होतो. पण तरीही त्यांनी जमेल तेवढे व जमेल तसे गोमुखासन नियमित करावे. पाय गुडघ्यात दुमडून नितंबाला असा काही लावावा की ज्याने नाभीचे कार्य कार्य योग्यप्रकारे चालू राहते व नाडी शुद्ध होते. आपल्या गुडघ्यांचा आकार पाय दुमडून गुडघे एकमेकांवर ठेवल्यामुळे अगदी गायीच्या तोंडासारखा होतो. हिंदूधर्मात गाईला पवित्र मानतात, योगामध्ये देखील हे आसन ध्यानासाठी पवित्र मानले आहे. फक्‍त ध्यान करताना मान सरळ ठेवावी. अनाहत चक्रावर या आसनात दाब पडतो.
पुरुषांनी हे आसन नियमित केल्यास अंडकोष आणि शुक्राणूंची वाढ होते. वीर्यविकारांना दूर करणारे गोमुखासन हातापायांच्या स्नायूंबरोबरच शरीराची स्नायूसंस्था मजबूत बनवते. मन एकाग्र करायचे असेल तर गोमुखासन रोज करावे. समागमाचा आनंद स्त्री आणि पुरुष दोघांनाही या आसनामुळे प्राप्त होतो म्हणून स्त्रियांबरोबर पुरुषांनीही हे आसन नियमित केले पाहिजे.

या आसनात जास्तीत जास्त मनामध्ये सावकाश वीस अंक मोजून स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा. “स्थिरम्‌ सुखम्‌ आसनम्‌’ या योगातील उक्तीचा प्रत्यय हे आसन नियमित करणाऱ्यांना येतो. कालावधी हळूहळू वाढवावा. मूळव्याध व मधुमेह असणाऱ्यांनी हे आसन रोज करावे. ज्यांचे पोटाचे ऑपरेशन झालेले आहे अथवा पाठीची शस्त्रक्रिया झाली आहे किंवा कृत्रिम हाड रोपण हातापायांमध्ये करण्यात आलेले आहे, अशांनी गोमुखासन करू नये. जेवढी स्थिरता वाढेल तेवढे या आसनाचे फायदे आपल्याला मिळतील. प्रवास करून करून शिणलेल्या हातापायांना शक्ती व स्फूर्ती प्रदान करण्यासाठी हे आसन करावे. मधुमेहाप्रमाणेच अंगावरील कोड जाण्यासही गोमुखासन मदत करते.

Dr. Nitin Shingare
Dr. Nitin Shingare
MS/MD - Ayurveda, Ayurveda Dermatologist, 9 yrs, Pune
Dr. Tushar Dorage
Dr. Tushar Dorage
MS/MD - Ayurveda, Gynaecologist Obstetrics and Gynecologist, 5 yrs, Pune
Dr. Vinay Sachdeva
Dr. Vinay Sachdeva
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 5 yrs, Pune
Dr. Mahesh Gupta
Dr. Mahesh Gupta
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 4 yrs, Pune
Dr. Manish Pathak
Dr. Manish Pathak
MDS, Dentist Periodontist, 10 yrs, Pune