Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Healthy Living :
Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.

मधुमेह फार मोठय़ा प्रमाणात पसरलेला आजार आहे. हल्ली तर लहान वयातच मधुमेह होत असल्याची उदाहरणे आहेत. म्हणूनच ह्या

रुग्णांसाठी आहारविहारांचे नियोजन जाणून घेणे महत्त्वाचे आहे. काही टिप्स :-

लिंबाचा रस :
मधुमेही रुग्णांना तहान जास्त लागते. या अवस्थेत त्यांनी लिंबाचा रस प्यायला हवा. त्याने त्यांची तहान भागते.

काकडी :
मधुमेही रुग्णांनी थोडा कमी आणि हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे त्यांना सारखी भूक लागते. काकडी खाल्ल्याने भूकशांत होऊ शकते.

गाजर-पालकाचा रस :
या रुग्णांनी डोळ्यांसाठी गाजर आणि पालकाचा रस प्यायला हवा.

बीट : मधुमेही रुग्णांना बीट, दुधी भोपळा, गिलकी, पालक, पपई इत्यादी भाज्यांचा वापर जास्तीत जास्त करायला हवा. बीटाने रक्तात असलेल्या साखरेची मात्रा कमी होऊ लागते. म्हणून बीट भाजी, परोठे, सलाड आदी प्रकारे खावी.

जांभूळ :
मधुमेहावर जांभूळ एक पारंपरिक औषध आहे. या फळांना मधुमेहींचे फळही म्हणतात. या फळाची बी, साल, रस आणि गर सर्व मधुमेहींसाठी गुणकारी आहे. जांभळाच्या बिया एकत्र करून ठेवाव्यात. त्यात जांबोलीन नावाचा घटक असतो. स्टार्चचे साखरेत रूपांतर करण्यापासून तो रोखतो. या बियांची बारीक पूड करून ठेवावी आणि दिवसातून २-३ वेळा पाण्यासोबत घ्यावी. यामुळे साखरेचे प्रमाण कमीहोते.

कारले :
पूर्वीच्या काळापासून कारल्याचा प्रयोग मधुमेहींच्या औषधाच्या रूपात केला जात आहे. याचा कडू रस साखरेचे प्रमाण कमी करतो. मधुमेही रोग्यांना याचा रस रोज प्यायला द्यायला पाहिजे. उकळलेल्या कडुलिंबाचा रस प्यायल्यास चांगले.

मेथी :
मधुमेही रोग्यांनी मेथीदाणे पोटात जाऊ द्यावेत. मेथी दाण्याची पूड आता बाजारापर्यंत आली आहे. या पुडीमुळे मधुमेहावर नियंत्रण राहूशकते. हे चूर्ण सकाळी उपाशी पोटी २ चमचे घ्यायला हवे. काही दिवसांत याचे चांगले परिणाम दिसून येतात.

इतर उपचार :
रोज दोन चमचे कडू लिंबाचा रस, चार चमचे केळीच्या पानांचा रस सकाळ-संध्याकाळ घ्यायला हवा. आवळ्याचा रस ४ चमचे घेतल्यानेसुद्धा फायदा होतो.

अंड्या खाण्याची सर्वाची आपली वेगळी पद्धत आणि फ्लेवर असतो. कोणाला उकडलेला आवडतो तर कोणाला ऑम्लेटच्या स्वरूपात. कोणी ला करीच्या रूपात खाणे पसंत करत तर कोणी याचे पोच्ड बनवून.

अंड्यात विभिन्न प्रकारचे व्हिटॅमिन्स जसे व्हिटॅमिन A,B12,D आणि E असतात. अंड्यात फोलेट, सेलेनियम आणि दुसरे बरेच प्रकारचे लवणं देखील असतात.

हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या रिसर्च रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की अंडं फक्त सामान्य लोकांसाठी नव्हे तर प्रेग्नेंसीमध्ये अंडी खाणे फारच फायदेशीर ठरत. रिपोर्टनुसार अंड्यात आढळणारे तत्त्व प्रेग्नेंसीमध्ये महिलांना या प्रकारे प्रभावित करतात.
जाणून घ्या प्रेग्नेंसीमध्ये प्रत्येक दिवशी एक अंडं का खायला पाहिजे...

1. अंड्यात ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतो. यामुळे कंसीव करण्यात मदत मिळते.

2. प्रेग्नेंसीमध्ये फॉलिक अॅसिड खाण्याचा सल्ला देण्यात येत असतो आणि अंड्यात फॉलिक ऍसिड उपस्थित असतो.

3. अंड्यात अॅमिनो अॅसिड असतो, म्हणून प्रेग्नेंसी दरम्यान थकवा
कमी येतो.

4. यात कुठलेही दोन मत नाही की अंड्यात कॅल्शियम असत, जे न फक्त आईसाठी बलकी गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या विकासासाठी फारच महत्त्वपूर्ण असत.

5. यात कोलीन आणि बीटेन असत, जे आईचे दूध तयार करण्यात मदतगार ठरत. म्हणून ब्रेस्ट फीड करवणार्‍या महिलांसाठी अंडी फारच महत्त्वपूर्ण असतात असे सांगण्यात येते.

6. अंड्यात ओमेगा 6 फॅटी ऍसिडपण असतो. हे ब्रेस्ट कॅसरपासून बचाव करण्यात मदतगार ठरतो.

7. प्रेग्नेंसीत केस गळतीचा त्रास असतो आणि त्वचा देखील कोरडी पडते. अशात अंड्याचे सेवन करणे फायदेशीर ठरत. कारण यात अँटीऑक्सीडेंट आणि सल्फर असत जे आईची त्वचा आणि केसांचे रक्षण करतो.

भोपळा ही अनेकांची नावडती भाजी, भरीत, कोशिंबिर, सूप असे पदार्थ भोपळ्यपासून बनवले जातात. कितीही नावडता असला तरी गुणधर्मामुळे थोड्या प्रमाणात का होईना, परंतु प्रत्येकाने भोपळा खायलाच हवा. चेहर्‍यावर पडणार्‍या सुरकुत्यांपासून पोटाच्या गंभीर विकारांवर भोपळा गुणकारी ठरू शकतो. भोपळ्याच्या अशाच काही औषधी गुणधर्माबाबत जाणून घेऊ.


भोपळ्यात 'बिटा करोटिन' या घटकाचं प्रमाण बरंच जास्त असतं. यामुळे भोपळा हा अ जीवनसत्त्वाचा समृद्ध स्त्रोत मानला गेलाय. बीटा केरोटिनमधील आँटिऑक्सिडंट्‍समुळे शरीरातील फ्री रेडिकल्सचा सामना अगदी सहज करता येतो.

भोपळा हे तापावरचं औषध आहे.

भोपळ्यातील विशिष्य प्रकारच्या खनिजांमुळे मेंदूच्या नसांना आराम मिळतो.

हृदयरोग्यांसाठी भोपळा वरदान मानला जातो. भोपळ्यात कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता असते.

आतड्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनंही भोपळा गुणकरी मानला जातो. भोपळ्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

बहुसंख्य महिलांमध्ये लोहाची कमतरता आढळते. अशा महिलांनी भोपळ्याच्य बियांचं सेवन करावं. भोपळ्याच्या बियांमध्ये लोह, झिंक, पोटेशियम आणि मॅग्नेशियम यांचं प्रमाण भरपूर असल्यानं बरेच लाभ होतात.

पोटाच्या विविध विकारांवर भोपळा गुणकारी ठरू शकतो. यातील फायबरमुळे पचनक्रिया ‍सुधारते आणि पोट स्वच्छ झाल्याने अनेक रोगांना दूर ठेवता येतं.

या जगामध्ये पूर्णपणे सुखी असा मनुष्य मिळणे कठीणच आहे. काही लोकांजवळ भरपूर धन असते, परंतु शरीर रोगांचे आगार असते. आरोग्य चांगले आहे, शरीर धडधाकट आहे पण घरी आठराविश्व दारिद्य्र आहे, असेही अनेकजण आहेत.


काहीही असले तरी प्रतिकूल परिस्थितीपुढे हतबल न होणे, हेही माणसाचेच वैशिष्ट्य होय. शारीरिक दुर्बलता ही अनुवांशिक किंवा खानदानी असल्याचा अनेकांचा समज असतो. परंतु आशावादी आणि साहसी लोक असे मानत नाहीत. आयुर्वेद, निसर्गोपचार आणि योग यांच्या एकत्रित प्रयत्नातून दुबळ्या शरीराला शक्तीशाली, धडधाकट बनविण्याचे उपाय शोधले गेले आहेत. करून पाहा हे साधे सोपे उपाय...

- अश्वगंधा आणि शतावरी चूर्ण यांचे मिश्रण दरोरोज एक चमचा दुधासोबत झोपण्यापूर्वी घ्या.
- दुधात उकळून रोज 5 खारीक खा.

- एका पेल्यात दोन चमचा मध मिसळून दररोज सेवन करा.

- भोजनात सॅलड, मोड आलेले कडधान्य, फळे आदींचा समावेश करा.

- शक्य झाल्यास चहा, कॉफी, तंबाखू, गुटखा, सिगारेट आणि दारू यापासून दूर राहा.

दृढ संकल्प करून वरील नियम पाळत थंडीच्या दिवसात फक्त 90 दिवस व्यायाम करा आणि पाहा तुमच्या शरीरातील दुर्बलता जाऊन तुम्ही धट्टेकट्टे होता की नाही ते.

जेवण कसलेही असो, पंगतीला तूप वाढले की मगच जेवायला सुरुवात करायची आपली परंपरा आहे. एकंदरीत तूप हा स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक आहे.
जुन्या काळात युद्ध-लढाईत झालेल्या जखमा भरून येण्यासाठी तुपाचा वापर केला जात असे. तूप जेवढे जुने तेवढे गुणकारी.

घृत, अज्या, हवी, सर्पी, घी वगैरे विविध नावांनी ओळखले जाणारे तूप मधुर, अत्यंत बलवान, थंड, पित्तशामक, मेद, मज्जा आणि शुक्रधातूंचे पोषण करणारे आहे.

तुपामुळे स्मृती, बुद्धी इत्यादींची वाढ होते. मेंदूवर तुपाचे कार्य होते. तुपाचे वैशिष्ट्य म्हणजे तूप खाल्ल्यावर भूक वाढते. अग्निवर्धक हे तुपाचे श्रेष्ठ कार्य आहे. तूप डोळ्यांना हितकारक आहे.

तुपामुळे स्वरयंत्र सुधारते आणि आवाज उत्तम होतो. तूप योगवाही आणि रसायन गुणधर्माचे आहे.

तूप कोणत्याही रोगात विशेषत: वात-पित्तज विकारात वापरता येते. आयुर्वेदात अनेक औषधिद्रव्ये तुपात सिद्ध करून त्यांचे औषधी पाठ बनवले आहेत.

डोके दुखत असेल तर तूप कोमट करून नाकपुड्यांत थेंब टाकावेत किंवा दुखर्‍या कपाळावर हलकेच मालीश करावे.
शंभर वेळा धुतलेले तूप (शतधौत घृत) त्वचाविकार, जखमा, अंगाला खाज, पायांच्या टाचा फुटणे, अंग फुटणे इत्यादी विकारात उपयुक्त औषध आहे.

तूप किंचित कोमट करून खाल्ल्यास उचकी थांबते. तुपाचे थेंब नाकात टाकल्यास नाकातून रक्त पडणे थांबते.
रात्री झोपताना पेलाभर दुधात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास शौचाला सकाळी साफ होते. तुपामुळे मूळव्याध बरा होतो.

तूप खाल्ल्याबरोबर रूप लगेच येत नसले, तरी तूप खाल्ल्यावर लगेच चरबी (कोलेस्ट्रॉल) वाढते हे चूक आहे. जे नेहमी हिंडतात, फिरतात, व्यायाम करतात त्यांनी अवश्य रोज तूप खावे.

कॅन्सरच्या पेशंटला तूप म्हणजे अमृतासमान औषध. तुपात कॅन्सर पेशींची वाढ थांबवण्याची शक्ती आहे. रोज आहारात वापरले जाणारे तूप औषधी आहे.

Dr. Mahesh Zagade
Dr. Mahesh Zagade
BHMS, Homeopath General Physician, 3 yrs, Pune
Dr. Pradnya Bafna
Dr. Pradnya Bafna
BDS, Dentist Root canal Specialist, 20 yrs, Pune
Dr. Suhas Shingte
Dr. Suhas Shingte
BAMS, Family Physician General Physician, 18 yrs, Pune
Dr. Kunal Janrao
Dr. Kunal Janrao
MDS, Dentist Periodontist, 6 yrs, Pune
Dr. Vaidya Manish Joshi
Dr. Vaidya Manish Joshi
BAMS, Infertility Specialist Panchakarma, 21 yrs, Nashik
Hellodox
x