Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Diet and Nutrition :
Does the word Diet make you think of unpleasant weight-loss regimen? Forget it, Diet also refers to the food and drink a person consumes daily and the mental and physical circumstances connected to eating. Eating nutrition give you beautiful body not just outside but also inside.

'ईट लोकल, थिंक ग्लोबल'चा अर्थ आहे की, लोकल आणि स्थानिक पदार्थ खा आणि जागतिक पातळीवर विचार करा. बॉलिवूडमध्ये झइरो फिगरचा ट्रेन्ड आणणारी करिना कपूरही आपल्या डाएटमध्ये लोकल पदार्थांनाच प्राथमिकता देते. करिना कपूरच्या डाएटिशियन ऋजूता दिवेकर बेबोच्या हॉट आणि सेक्सी फिगरचं राज सांगत आहे. जाणून घेऊया उन्हाळ्यामधील करिना कपूरच्या कूल लोकल डाएटबाबत...

ईट लोकल फ्रूट आम

उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला लोकल फ्रूट खाण्याची इच्छा असेल तर आंब्यापेक्षा उत्तम दुसरं काय असू शकतं? फळांच्या राजाला कोणी कसं इग्नोर करू शकतं. करिनालाही आंबे खायला फार आवडतात. उन्हाळ्यामध्ये करिना सीझनल फ्रूट्स आंबा, जांभूळ आणि करवंद खाणं पसंत करते.

लोकल सरबत म्हणजे, कोकम सरबत

उन्हाळ्यामध्ये शरीर डिहायड्रेशनपासून दूर ठेवण्यासाठी एका लिक्विड डाएटचं सेवन करणं गरजेचं असतं. करिनाही उन्हाळ्यामध्ये कोकम सरबत, लिंबू सरबत आणि गवती चहा पिणं पसतं करते.

ईट लोकल इन लंच

लंचमध्येही करिना कर्ड राइस म्हणजेच, दही भात आणि पापड, ज्वारी किंवा नाचणीची भाकरी आणि पारंपारिक स्टाइलमध्ये तयार करण्यात आलेल्या सीझनल भाज्या खाणं पसंत करते.

लोकल फूड आहे बॅलेंस डाएट

लोकल फूडमुळेही बॅलेन्स्ड डाएट तयार होऊ शकते. याबाबत बोलताना करिना सांगते की, आपल्या डाएटसोबत जास्त स्ट्रिक्ट होण्याची गरज नाही. परंतु स्वतःला जास्त सूट देणंही चांगलं नाही. एक चांगलं डाएट तुम्हाला भूक लागल्यानंतर जे तुम्हाला खआवसं वाटतं ते खाण्याची परवानगी देतो. परंतु एक चांगलं आणि बॅलेन्स्ड डाएट तुम्हाला चावून पारंपारिक पदार्थ खाण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्यामुळे पोट भरण्याआधीच तुम्ही तृप्त झालेले असतात.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

चपात्या तयार करण्यासाठी दररोज पीठ मळण्यात येतं. अनेकदा उरलेलं पीठ आपण फ्रिजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी उरलेल्या पिठाच्या चपात्या तयार करतो. अनेकदा जॉब करणाऱ्या महिला वेळेचं मॅनेजमेंट करण्यासाठी पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवून देतात. जशी गरज असेल तसं फ्रिजमधील पिठाचा वापर करतात. यामुळे नक्कीच वेळ वाचतो. परंतु तुम्हाला कदाचित ही गोष्ट माहीत नसेल की, अनेक असे पदार्थ असतात. ज्यांचं फ्रिजमध्ये ठेवून सेवन केल्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. जर तुम्हीही दररोज पीठ फ्रिजमध्ये ठेवत असाल तर असं करणं तत्काळ थांबवा.

फ्रिजमध्ये पीठ मळून ठेवण्याची तुमची ही सवय तुम्हाला कदाचित महागात पडू शकते. हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. परंतु हेचं खरं आहे. फ्रिजमध्ये ठेवलेलं पीठ तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पिठ मळल्यानंतर लगेचच त्याचा वापर केला पहिजे. जेव्हा तुम्ही पीठ मळल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवता, त्यावेळ त्यामध्ये रासायनिक बदल होतात. हे बदल आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवल्याने फ्रिजमधील हानिकारक किरणं त्यावर परिणाम करतात. त्यामुळे पिठामध्ये काही रासायनिक क्रिया घडून येतात. जेव्हा तुम्ही अशा पिठापासून चपाती तयार करून खाता. त्यावेळी तुमचं आजारी पडणं स्वाभाविक आहे.

पीठ फ्रिजमध्ये ठेवावं की नाही?

आयुर्वेदामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं आहे की, फ्रिजमध्ये पीठ मळून ठेवू नये. शिळ्या पिठाच्या चपात्यांची चव ताज्या पिठापासून तयार करण्यात आलेल्या चपात्यांपेक्षा वेगळी असते.

फर्मेंटेशनची प्रक्रिया

ओल्या पिठामध्ये फर्मेंटेशनची क्रिया लवकर सुरू होते. त्यामुळे या पिठामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि हानिकारक केमिकल्स तयार होतात. हे सर्व बॅक्टेरिया आरोग्याला नुकसान पोहोचवण्यासाठी कारणीभूत ठरतात. यापासून तयार केलेल्या चपात्या खाल्यामुळे पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

पोटदुखी

शिळ्या पिठापासून तयार करण्यात आलेल्या चपात्या, पुऱ्या किंवा पराठे शिळे असतात. यामुळे त्या सर्व समस्यांना सामोरं जावं लागतं ज्या शिळ्या चपात्या खाल्याने होतात. खासकरून पोटदुखीचा त्रास होणं एक सामान्य समस्या आहे.

बद्धकोष्ट

गव्हाचं पीठ पचण्यासाठी जड असतं. ज्या व्यक्तींना बद्धकोष्टाचा सामना करावा लागतो त्यांना चपात्या न खाण्याचा सल्ला देण्यात येतो. शिळ्या चपात्या खाल्यानेसामान्य लोकांनाही बद्धकोष्टाची समस्या होऊ शकतात.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दाव करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

सध्या फक्त पॅकेज्ड फूड आणि जंक फूडमध्येच नाही तर घरी तयार करण्यात येणाऱ्या सॅन्डविच आणि बर्गरमध्येही लोक मायोनिज (mayonnaise) वापरतात. फक्त एवढचं नाही तर, मुलांना आवडतं म्हणून काही लोक पराठ्यासोबतही मायोनिज (mayonnaise) खाण्यासाठी देतात. पण तुम्हाला माहीत आहे का? मायोनिजचा पांढऱ्या रंग संरक्षित करण्यासाठी त्यामध्ये फूड एडिटिव वापरण्यात येतं. पण हेच फूड एडिटिव कोलोरेक्टल कँसर (Colorectal Cancer) म्हणजेच मोठया आतडयाचा कर्करोग होऊ शकतो. एका रिपोर्टमधून संशोधकांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे.

काय म्हणतो रिपोर्ट?

फ्रंटियर्स इन न्यूट्रिशन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून सांगण्यात आले आहे की, E171 फूड एडिटिवचा वापर करण्यात आलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आपल्याला पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच यामध्ये असलेल्या घातक तत्वांचा थेट आतड्यांवरही परिणाम होतो. परंतु याव्यतिरिक्त फूड एडिटिव्स आपल्या शरीरासाठी का घातक ठरतात? याबाबत अद्याप अधिक माहिती उपलब्ध नाही.

काय आहे फूड एडिटिव्स?

दरम्यान, खाद्य पदार्थांमध्ये रूप, रंग किंवा गंध यांसारखे कोणतेही गुणधर्म संरक्षित करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी याचा वापर करण्यात येणाऱ्या घटकाला फूड एडिटिव असं म्हटलं जातं. च्युइंग गम किंवा मायोनिज यांसारख्या पदार्थांमध्ये व्हाइटनिंग एजंटच्या स्वरूपात वापरण्यात येणारे फूड एडिटिव्समुळे पोटामध्ये जळजळ, पोटाच्या इतर समस्या आणि कोलोरेक्टल कँसरचा धोका असतो. काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या एका संशोधनातून या गोष्टीचा खुलासा करण्यात आलेला आहे.

व्हाइटनिंग एजंट म्हणून वापर

E171 ज्याला टाइटेनियम डाइऑक्साइड नॅनोपार्टिकल्स म्हणतात. हे एक फूड एडिटिव्स असून ज्याचा वापर व्हाइटनिंग एजंट म्हणून मोठ्या प्रमाणावर खाण्याच्या पदार्थामध्ये करण्यात येतो. फक्त पदार्थांमध्येच नाही तर औषधांमध्येही यांचा वापर करण्यात येतो. या फूड एडिटिव्सचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो. हे जाणून घेण्यासाठी उंदरांवर एक संशोधन करण्यात आले. E171 चा वापर 900 पेक्षा जास्त फूड प्रॉडक्ट्समध्ये होत होता आणि आपल्यापैकी प्रत्येकजण दररोज मोठ्या प्रमाणावर या फूड एडिटिव्सचं सेवन करतात.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

आता उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे अर्थातच वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढतात. गरमीसोबतच वेगवेगळे आजारही होतात आणि त्वचेसंबंधी समस्याही होतात. पण जशी आपण त्वचेची काळजी घेतो तशी आरोग्याचीही घेतली तर तुमचाच फायदा होऊ शकतो. उन्हाळ्यात खाण्या-पिण्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. कारण जास्त तापमान असल्याने वेगवेगळे पदार्थ लवकर खराब होतात. अशात जर तुम्ही उन्हाळ्यात शिळं अन्न खात असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

फळं कापल्यावर लगेच खा

डॉक्टर सांगतात की, उकाड्याच्या दिवसांमध्ये ४ ते ५ तासांपेक्षा आधी तयार करण्यात आलेलं अन्न खाऊ नका. तसेच सलाड आणि फळं हे कापल्यानंतर लगेच खावीत. किंवा जेव्हा खायचं आहे तेव्हाच कापावे. जर तुम्ही शिळं अन्न किंवा फळं खाल्लीत तर वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.

फूड पॉयजनिंग

या वातावरणात फूड पॉयजनिंगची प्रकरणे अधिक बघायला मिळतात. याचं कारण तापमान अधिक असल्याकारणाने अन्नात बॅक्टेरिया अधिक होतात आणि वाढतात. हे बॅक्टेरिया ५ जिग्री सेल्सीअस ते ६० डिग्री सेल्सीअसच्या तापमानात वेगाने वाढतात. एक-दोन तासातच बॅक्टेरियाची संख्या २ ते ३ पटीने वाढू लागते. ज्यामुळे अन्न विषारी होऊ शकतं. असं अन्न खाल्ल्यावर पोटदुखी, उलटी, फूड पॉयजनिंगची लक्षणे दिसू शकतात.

डायरिया

या दिवसात लहान मुलं-मुली डायरियाचे अधिक शिकार होतात. लहान मुलांचं पचनतंत्र हे वयस्कांपेक्षा कमजोर असतं. त्यामुळे शिळे पदार्थ खाल्ल्याने मुलांवर लवकर वाईट परिणाम बघायला मिळतो. डायरिया झाल्यावर पुन्हा पुन्हा संडास लागणे, उलटी आणि ताप येणे या समस्या होतात. तसेच या समस्येमुळे शरीरातील पाणीही कमी होतं. याने समस्या अधिक वाढू शकतं.

दुधापासून तयार पदार्थ

काही लोक दूध फ्रिजमध्ये ठेवून २ ते ३ दिवसांपर्यंत वापरत राहतात. तुम्ही जर ताजं दूध घेतलं असेल ते उकडून त्याच दिवशी संपवा. जर तुम्ही पॅकेटमधील दुधाचा वापर करत असाल तर त्यावरील एक्सपायरी डेट चेक करुन वापर करा.

कापून ठेवलेली फळं

उन्हाळ्यात अनेकजण बाहेर फिरायला जातात आणि बाहेर आधीच कित्येक तासांपूर्वी कापून ठेवलेली फळं खातात. पण ही आधीच बऱ्याच वेळापासून कापून ठेवलेली फळं खाल्ल्याने तुम्हाला गंभीर समस्या होऊ शकते.

फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न नुकसानकारक

जर तुम्ही रात्रीचं किंवा दिवसा शिल्लक राहिलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवत असाल आणि विचार करत असाल की, दुसऱ्या दिवशी हे खाऊ. तर तुमची ही सवय चुकीची आहे. फ्रिजमध्ये ताजी फळं आणि भाज्या ठेवल्या जाऊ शकतात, ज्या तुम्ही कापलेल्या नसाव्यात. पण शिल्लक राहिलेलं ठेवलं आणि ते नंतर खाल्लं तर पोटाची समस्या होऊ शकते.

उन्हाळ्यामध्ये त्वचेसोबतच आरोग्याचीही काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. उन्हाळ्यामध्ये बाहेरील पदार्थ खाल्याने पोट लवकर खराब होतं. अशातच काहीही खाल्याने उलट्या होणं, डोकेदुखी, पोटाच्या समस्या इत्यादी होऊ शकतात. याव्यतिरिक्त जर उन्हाळ्यामध्ये खाण्या-पिण्याकडे लक्षं दिलं नाही तर टायफॉइडही होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतो बाहेरी पदार्थांचं सेवन करणं टाळा. आहारामध्ये पौष्टिक आणि शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबाबत सांगणार आहोत, ज्यांचा उन्हाळ्यामध्ये आहारात समावेश करणं शक्यतो टाळावं. जाणून घेऊया अशा पदार्थांबाबत...

1. मसाले

अनेक लोकांना सर्वात जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाण्याची सवय असते. मसालेदार अन्नपदार्थ उन्हाळ्यामध्ये आरोग्यासाठी नुकसानदायी ठरतात. यामुळे पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. मिरची, आलं, काळी मिरी, जीरं आणि दालचिनी या पदार्थांचा मसाल्याच्या पदार्थांमध्ये समावेश होतो. हे पदार्थ उष्ण असतात. यांच्या सेवनाने शरीरातील उष्णता वाढते. तसेच मसालेदार पदार्थांच्या सेवनाने मेटाबॉलिज्मही वाढतं.

2. तेलकट पदार्थ आणि जंक फूड

जास्त तेलकट पदार्थ आणि जंक फूडपासून दूर रहा. ऑयली आणि जंक फूड कोलेस्ट्रॉल लेव्हल, फॅट इत्यादी वाढविण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे याच्या सेवनाने पौट खराब होतं आणि फूड पॉयझनिंग होण्याचीही शक्यता असते.

3. चहा किंवा कॉफी

अनेक लोक अशी असतात जी उन्हाळ्यामध्ये ऑफिसमध्ये सतत चहा किंवा कॉफीचं सेवन करत असातात. असं केल्याने शरीरातील उष्णता वाढते. यामध्ये अस्तित्वात असणारं कॅफेन आणि शुगर यांमुळे शरीरातील पाणी कमी होतं. त्यामुळे उन्हाळ्यातही हेल्दी राहण्याची इच्छा असेल तर यांपासून दूर रहा.

4. चिकन किंवा मासे

चिकनचं अधिक सेवन करणं टाळा. तसेच फिश ग्रेवी, तंदूरी चिकन किंवा सीफूड खात असाल तर उन्हाळ्यामध्ये यापासून थोडं लांब रहा. यामुळे पचनशक्ती कमजोर होते. तसेच डायरियाही होण्याची शक्यता असते. मांसाहारी पदार्थ शरीरामध्ये जास्त उष्णता निर्माण करण्याचं काम करतात. त्यामुळे या पदार्थांचा आहारात समावेश करणं टाळावं.

5. ड्राय फ्रूट्स

ड्राय फ्रूट्स आरोग्यासाठी हेल्दी आणि पौष्टिक असतात. परंतु उन्हाळ्यामध्ये यांचंही सेवन कमी करावं. या पदार्थांमध्ये निसर्गतः उष्ण गुणधर्म असतात. जे शरीराची उष्णता वढविण्याचंकाम करतात.

6. सॉस कमी प्रमाणात खा

उनहाळ्यामध्ये चीज सॉसचं सेवन करणं शक्यतो टाळा. काही सॉस तयार करताना त्यामध्ये मोनोसोडियम ग्लूटामेट असतं.जे आरोग्यासाठी हानिकारक असतं. त्याऐवजी तुम्ही घरीच तयार केलेल्या चटणीचं सेवन करा. पुदिना, कोथिंबीर, लसूण, आवळा, हिरवी मिरची यांपासून तयार करण्यात येणारी हिरवी चटणी खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.

7. आइसक्रीम आणि कोल्ड ड्रिंक

खरं तर हे पदार्थ थंड असतात पण बॉडी वॉर्मिंग फूड आहेत. हे पदार्थ खाल्याने तुम्हाला थोड्या वेळासाठी बरं वाटेल परंतु तुमच्या हृदयासाठी हे नुकसानदायी असतं.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

Dr. Harishchandra Chaudhari
Dr. Harishchandra Chaudhari
DNB, Physician, 10 yrs, Pune
Dr.  Kishor Selukar
Dr. Kishor Selukar
BDS, Dentist, 9 yrs, Pune
Dr. Pawan Sarda
Dr. Pawan Sarda
BAMS, Family Physician, 10 yrs, Pune
Dr. Pallavi Joshi
Dr. Pallavi Joshi
BHMS, Family Physician Homeopath, 1 yrs, Pune
Dr. Divya Prakash
Dr. Divya Prakash
MDS, Dentist Implantologist, 6 yrs, Pune
Hellodox
x