Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
उन्हाळ्यात शिळे पदार्थ खाऊ नका, 'या' गंभीर समस्या ओढवून घेऊ नका!
#ग्रीष्मकालीन टिप्स#अस्वास्थ्यकर अन्न

आता उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे अर्थातच वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढतात. गरमीसोबतच वेगवेगळे आजारही होतात आणि त्वचेसंबंधी समस्याही होतात. पण जशी आपण त्वचेची काळजी घेतो तशी आरोग्याचीही घेतली तर तुमचाच फायदा होऊ शकतो. उन्हाळ्यात खाण्या-पिण्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. कारण जास्त तापमान असल्याने वेगवेगळे पदार्थ लवकर खराब होतात. अशात जर तुम्ही उन्हाळ्यात शिळं अन्न खात असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

फळं कापल्यावर लगेच खा

डॉक्टर सांगतात की, उकाड्याच्या दिवसांमध्ये ४ ते ५ तासांपेक्षा आधी तयार करण्यात आलेलं अन्न खाऊ नका. तसेच सलाड आणि फळं हे कापल्यानंतर लगेच खावीत. किंवा जेव्हा खायचं आहे तेव्हाच कापावे. जर तुम्ही शिळं अन्न किंवा फळं खाल्लीत तर वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.

फूड पॉयजनिंग

या वातावरणात फूड पॉयजनिंगची प्रकरणे अधिक बघायला मिळतात. याचं कारण तापमान अधिक असल्याकारणाने अन्नात बॅक्टेरिया अधिक होतात आणि वाढतात. हे बॅक्टेरिया ५ जिग्री सेल्सीअस ते ६० डिग्री सेल्सीअसच्या तापमानात वेगाने वाढतात. एक-दोन तासातच बॅक्टेरियाची संख्या २ ते ३ पटीने वाढू लागते. ज्यामुळे अन्न विषारी होऊ शकतं. असं अन्न खाल्ल्यावर पोटदुखी, उलटी, फूड पॉयजनिंगची लक्षणे दिसू शकतात.

डायरिया

या दिवसात लहान मुलं-मुली डायरियाचे अधिक शिकार होतात. लहान मुलांचं पचनतंत्र हे वयस्कांपेक्षा कमजोर असतं. त्यामुळे शिळे पदार्थ खाल्ल्याने मुलांवर लवकर वाईट परिणाम बघायला मिळतो. डायरिया झाल्यावर पुन्हा पुन्हा संडास लागणे, उलटी आणि ताप येणे या समस्या होतात. तसेच या समस्येमुळे शरीरातील पाणीही कमी होतं. याने समस्या अधिक वाढू शकतं.

दुधापासून तयार पदार्थ

काही लोक दूध फ्रिजमध्ये ठेवून २ ते ३ दिवसांपर्यंत वापरत राहतात. तुम्ही जर ताजं दूध घेतलं असेल ते उकडून त्याच दिवशी संपवा. जर तुम्ही पॅकेटमधील दुधाचा वापर करत असाल तर त्यावरील एक्सपायरी डेट चेक करुन वापर करा.

कापून ठेवलेली फळं

उन्हाळ्यात अनेकजण बाहेर फिरायला जातात आणि बाहेर आधीच कित्येक तासांपूर्वी कापून ठेवलेली फळं खातात. पण ही आधीच बऱ्याच वेळापासून कापून ठेवलेली फळं खाल्ल्याने तुम्हाला गंभीर समस्या होऊ शकते.

फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न नुकसानकारक

जर तुम्ही रात्रीचं किंवा दिवसा शिल्लक राहिलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवत असाल आणि विचार करत असाल की, दुसऱ्या दिवशी हे खाऊ. तर तुमची ही सवय चुकीची आहे. फ्रिजमध्ये ताजी फळं आणि भाज्या ठेवल्या जाऊ शकतात, ज्या तुम्ही कापलेल्या नसाव्यात. पण शिल्लक राहिलेलं ठेवलं आणि ते नंतर खाल्लं तर पोटाची समस्या होऊ शकते.

Dr. Rajesh Jagdale
Dr. Rajesh Jagdale
BAMS, Pune
Dr. Yogesh Gholap
Dr. Yogesh Gholap
BAMS, Ayurveda General Physician, 12 yrs, Pune
Dr. Shweta Muley
Dr. Shweta Muley
BHMS, Homeopath, 6 yrs, Pune
Dr. Neeti Gujar
Dr. Neeti Gujar
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dentist, 12 yrs, Pune
Dr. Vivek  Sahu
Dr. Vivek Sahu
MD - Homeopathy, 17 yrs, Pune