Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Blood Pressure :
Blood Pressure is a silent killer. High blood pressure can quietly damage your body before actual symptoms get visible. Left uncontrolled, you may end up with disability, poor quality of life or even fatal heart attack. Read the symptoms & signs for this silent killer.

मुंबई : ब्लड प्रेशरची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. जेव्हा रक्तवाहिन्यातील प्रेशर 140/90 तेव्हा हायपरटेंशन होते. यामुळे ब्रेन स्ट्रोक, हार्ट, किडनी आणि डोळ्यांच्या आजारांचा धोका दुप्पट-तिप्पट वाढतो. वजन, हाय बीपी झाल्याने रक्त वाहिन्यांवर दबाव पडतो आणि त्या आकुंचित पावतात. त्यामुळे हृदयाला ब्लड पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. ब्लड प्रेशर हा मोठा आजार नसला तरी अनेक गंभीर आजारांचे मुळ आहे.

ब्लड प्रेशर वाढण्याची कारणे
-वजन वाढणे
-व्यायाम न करणे
-अंनुवंशिक
-सातत्याने तणावात राहणे
-धुम्रपान
-थॉयराईड, ट्युमर सारखे आजार

किती असायला हवा बीपी?
नार्मल बीपी साधारण 120/80 पेक्षा कमी असायला हवे. यावरील स्टेजला प्री-हायपरटेंशन म्हणतात. बीपी 120 ते 139, 80 ते 89 च्या मधल्या स्थितीत असल्यास ब्रेन स्ट्रोक, हार्ट, किडनी आणि डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढतो. 140/90 या स्थितीला हायपरटेंशन म्हणतात. जे सर्वात गंभीर आहे.

कधी तपासावा बीपी?
४० शीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने ब्लड प्रेशर तपासणे गरजेचे आहे. नॉर्मल असले तरी दर ६ महिन्यांनी तपासणे गरजेचे आहे.

त्यावरील उपाय
-रोज ४५ मिनिटे व्यायाम करा.
-चाला, जॉगिंग करा.
-आहारातील मीठाचे प्रमाण कमी कराय
वजन नियंत्रित ठेवा.
-स्वतःच्या छंदासाठी वेळ काढा. तुमच्या आवडीचे काम करा.
-फळे आणि हाय फायबर असलेले पदार्थ अधिक खा.
-फास्ट फूड, तळलेले पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, गोड पदार्थ, पॅक्ड फूड खाणे टाळा.

हायपर टेंशनशी लढत असलेले लोक, आपल्या लाइफस्‍टाइलमध्ये जर थोडेही बदल केले तर त्यांना ह्या समस्येपासून लवकरच सुटकारा मिळू शकतो. तसेच औषधांचे देखील सेवन करावे लागणार नाही.

डॉक्‍टर्सचे मानने आहे की हायपर टेंशनने लढत असणारे लोक, नियमित रूपेण सक्रिय राहिल्या पाहिजे, फिरणे आणि आनंदी राहिल्याने त्यांना ह्या आजारापासून दूर करण्यास मदत मिळेल. उच्‍च रक्‍तदाबाला दूर करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला जंक फूडचे सेवनाला लगाम लावावी लागणार आहे आणि घरातील तयार केलेले अन्नाचे सेवन करणे गरजेचे आहे. प्रयत्न असा असायला पाहिजे की मीठाचा वापर कमीत कमी करावा. कमी मीठ, वाढललेल्या रक्तदाबाला कंट्रोलमध्ये करते आणि तुमच्या वजनाला नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.

मीठ कमी करण्याशिवाय, तुम्हाला काही प्राकृतिक उत्‍पादनांचे सेवन देखील करायला पाहिजे, यामुळे रक्‍तदाब नियंत्रणात रहील. यामध्ये
प्राकृतिक उपायम्हणजे वेलची आहे. हो खरच आहे, वेलची फक्त स्वादच नव्हे तर उत्तम आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. याची चव हलकी गोड असते तर तुम्ही याला भात शिवजताना देखील घालू शकता. वेलचीमध्ये एंटीऑक्‍सीडेंटपण असतात जे शरीराला फिट ठेवतात.

वेलचीचा प्रयोग कसा करावा ?
तुम्ही चहा तयार करताना देखील वेलचीची पूड करून घालू शकता. भात किंवा पुलावमध्ये देखील तुम्ही वेलचीचा वापर करू शकता. पाचन क्रियेल दुरुस्त ठेवते आणि माउथफ्रेशनरचे देखील काम करते.

ज्या लोकांचा रक्‍तदाब फार जास्त वाढतो त्यांनी रोज किमान चार वेलचीचे सेवन केले पाहिजे. जर तुम्हाला खाण्यात टाकायची नसेल तर तुम्ही चावून खाऊ शकता.

Dr. Manisha Dandekar
Dr. Manisha Dandekar
BAMS, Ayurveda, 25 yrs, Pune
Dr. Kshitija Kulkarni
Dr. Kshitija Kulkarni
MS/MD - Ayurveda, Yoga and Ayurveda Panchakarma, 5 yrs, Pune
Dr. Pratibha Labade
Dr. Pratibha Labade
BAMS, Ayurveda Immuno Dermatologist, 19 yrs, Pune
Dr. Bhagyashri Madake- Kuber
Dr. Bhagyashri Madake- Kuber
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 4 yrs, Pune
Dr. Anand Karale
Dr. Anand Karale
MS - Allopathy, Gynaecologist Obstetrician, 5 yrs, Pune
Hellodox
x