Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
या उपायांनी नियंत्रित राहील रक्तदाब!
#उच्च रक्तदाब

मुंबई : ब्लड प्रेशरची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. जेव्हा रक्तवाहिन्यातील प्रेशर 140/90 तेव्हा हायपरटेंशन होते. यामुळे ब्रेन स्ट्रोक, हार्ट, किडनी आणि डोळ्यांच्या आजारांचा धोका दुप्पट-तिप्पट वाढतो. वजन, हाय बीपी झाल्याने रक्त वाहिन्यांवर दबाव पडतो आणि त्या आकुंचित पावतात. त्यामुळे हृदयाला ब्लड पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. ब्लड प्रेशर हा मोठा आजार नसला तरी अनेक गंभीर आजारांचे मुळ आहे.

ब्लड प्रेशर वाढण्याची कारणे
-वजन वाढणे
-व्यायाम न करणे
-अंनुवंशिक
-सातत्याने तणावात राहणे
-धुम्रपान
-थॉयराईड, ट्युमर सारखे आजार

किती असायला हवा बीपी?
नार्मल बीपी साधारण 120/80 पेक्षा कमी असायला हवे. यावरील स्टेजला प्री-हायपरटेंशन म्हणतात. बीपी 120 ते 139, 80 ते 89 च्या मधल्या स्थितीत असल्यास ब्रेन स्ट्रोक, हार्ट, किडनी आणि डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढतो. 140/90 या स्थितीला हायपरटेंशन म्हणतात. जे सर्वात गंभीर आहे.

कधी तपासावा बीपी?
४० शीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने ब्लड प्रेशर तपासणे गरजेचे आहे. नॉर्मल असले तरी दर ६ महिन्यांनी तपासणे गरजेचे आहे.

त्यावरील उपाय
-रोज ४५ मिनिटे व्यायाम करा.
-चाला, जॉगिंग करा.
-आहारातील मीठाचे प्रमाण कमी कराय
वजन नियंत्रित ठेवा.
-स्वतःच्या छंदासाठी वेळ काढा. तुमच्या आवडीचे काम करा.
-फळे आणि हाय फायबर असलेले पदार्थ अधिक खा.
-फास्ट फूड, तळलेले पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, गोड पदार्थ, पॅक्ड फूड खाणे टाळा.

Dr. Rahul Sudhakar
Dr. Rahul Sudhakar
BDS, Dentist, 5 yrs, Pune
Dr. Neha Sawant
Dr. Neha Sawant
BPTh, Orthopedic Physiotherapist Physiotherapist, 11 yrs, Pune
Dr. Dr.Sandip Narkhede
Dr. Dr.Sandip Narkhede
MS/MD - Ayurveda, Infertility Specialist Lactation Consultant, 10 yrs, Pune
Dr. Sapna Mahajan
Dr. Sapna Mahajan
BAMS, Ayurveda, 9 yrs, Pune
Dr. Manisha Dandekar
Dr. Manisha Dandekar
BAMS, Ayurveda, 25 yrs, Pune