Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
वजन कमी करायचं असेल तर आहारात किती असावं कार्बोहायड्रेट आणि फॅटचं प्रमाण?
#वजन कमी होणे#चरबी कमी करा

नव्या वर्षाला सुरूवात होऊन आता एक महिना झाला आहे. या नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच अनेकांनी वजन कमी करण्याचा संकल्प केला असेल. काहींचे प्रयत्न सुरू असतील, काहींनी काही दिवसातच सोडले असतील तर काही लोकांनी वजन कमी करण्यास सुरूवातच केली नसेल. ज्यांना डाएटींग सुरू केली असेल अशा लोकांमध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅटबाबत कन्फ्यूजन असतं. पण याबाबत गेल्या दोन वर्षात बराच अभ्यास करण्यात आला. आज आम्ही तुम्हाला डाएटींगमध्ये किती कार्बोहायड्रेट आणि फॅट घ्यावे याबाबत सांगणार आहोत.

लो-कार्ब गरजेचेयात अजिबातच दुमत नाहीये की, जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्यासाठी डाएटींग सुरू केली असेल. तर आहारात कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी असलं पाहिजे. जास्त प्रमाणात कार्बोहाड्रेट असलेले पदार्थ जसे की, व्हाइट ब्रेड हे लगेच शुगरमध्ये रूपांतरित होतात. याने होतं काय की, तुम्हाला लवकर लवकर भूक लागते आणि तुमची एनर्जी लेव्हल बदलत राहते. त्यामुळे आहारात कमी कार्बोहायड्रेट ठेवल्याने तुमच्या शरीरातील फॅट एनर्जीमध्ये रुपांतरित होतं. याने तुम्हाला भूकमी कमी लागेल आणि तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळेल.

फॅट फ्रि होणं किती योग्य?आधी किंवा आताही अनेकजण असा विचार करतात की, वजन कमी करण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे फॅट असलेले पदार्थ खाणं बंद करावे. त्यामुळेच बाजारात फॅट नसलेले केक, कुकिज यांसारखे पदार्थ आले आहेत. या पदार्थांमध्ये शुगर कमी असते. खरंतर वजन कमी करण्यासाठी हे पदार्थ अधिकच नुकसानकारक आहेत. आहारतज्ज्ञ सांगतात की, फॅट फ्रि आहारही नुकसानकारकच असतो. कारण शरीराला अनेकप्रकारचे प्रोटीन शोषूण घेण्यासाठी फॅटची गरज असते.

वजन का कमी होत नाही?काही दिवसांसाठी तुम्ही आहारात कमी कार्बोहायड्रेट्स आणि फॅट नसलेल्या पदार्थांचा आधार घेऊ शकता. पण जास्तीत जास्त भाज्या आणि सलाद खावा. पालेभाज्या अधिक खाव्यात. पण हा डाएट प्लॅन तुम्हाला फार जास्त काळ मदत करू शकत नाही. अनेकदा लोक डाएटींग करूनही वजन कमी करण्यात यशस्वी होत नाहीत. खरंतर तुमची डाएट तुमच्या दिनचर्येवर अवलंबून असते. तुम्ही किती कार्बोहायड्रेट्स किंवा किती फॅट घेतलं पाहिजे हे या गोष्टीवर अवलंबून असतं की, तुम्ही दिवसभर काय काम करता. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे डाएट प्लॅन योग्य ठरतात. म्हणजे एकच डाएट प्लॅन सर्वांना फायदेशीर ठरेल असं नाही.

तज्ज्ञांचा सल्लावेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे डाएट असल्या कारणाने डाएट संदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा. त्यांना तुम्ही काय काम करता, तुमची लाइफस्टाइल कशी आहे हे सांगा. त्यानुसारच तुमचा डाएट प्लॅन तयार करा. अशात तुम्हाला तुमच्या लाइफस्टाइलही व्यवस्थित ठेवावी लागेल. यात फिजिकल अॅक्टिव्हिटीही गरजेची आहे. जर ऑफिसमध्ये दिवसभर बसून काम करावं लागत असेल तर वर्कआउटसाठी तुम्हाला वेगळा वेळ काढवा लागेल. अशावेळी तुम्ही लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करू शकता. तसेच ऑफिसला पोहोचण्यासाठी तुम्ही चालत जाण्याचा पर्याय निवडू शकता.

Dr. Mahesh Yadav
Dr. Mahesh Yadav
BAMS, Ayurveda, 25 yrs, Pune
Dr. Pavan Prakash Pargaonkar
Dr. Pavan Prakash Pargaonkar
BHMS, Family Physician, 6 yrs, Pune
Dr. Hemant Damle
Dr. Hemant Damle
MD - Allopathy, Gynaecologist Obstetrics and Gynecologist, 25 yrs, Pune
Dr. Deepti Shukla
Dr. Deepti Shukla
MD - Allopathy, Dermatologist Trichologist, 12 yrs, Mumbai City
Open in App