Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
कैरी खा आणि तंदुरुस्त राहा
#स्किनकेअर#पोटाचा फ्लू

कैरी असे नुसते ऐकले तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते. मग शाळेच्या बाहेर तिखट मीठ लावून ठेवलेले कैरीचे काप असोत कींवा शेजारच्या काकूंच्या झाडावरची दगड मारुन पाडलेली कैरी असो. आंबट गोड चवीची ही कैरी खायला तर चविष्ट असतेच पण तितकीच ती आरोग्यासाठीही उपयुक्त असते. कैरीचे लोणचे, मुरांबा, मेथांबा, गुळांबा, साखरांबा असे अनेक प्रकार या सिझनमध्ये जेवणाचा स्वाद वाढवतात. याबरोबरच वर्षभरासाठी करुन ठेवले जाणारे हे पदार्थ आपल्या कधी कामी येतील सांगता येत नाही. याबरोबरच पन्हे, कैरीचा भात, कैरीची डाळ हे पदार्थही तितकेच चविष्ट असतात. आता काही दिवसांतच आंब्याचा सिझन कमी होईल आणि घरोघरी हे साठवणीचे पदार्थ बनविण्याची लगबग सुरु होईल. पाहूयात आहारात कैरीचा नेमका काय आणि कसा उपयोग होतो.

पोटाच्या तक्रारींसाठी उपयुक्त

या दिवसांत पोटाशी निगडित समस्या उद्भवतात. गॅसेस, अपचन यांसारख्या तक्रारी वाढतात आणि पचनशक्ती क्षीण होते. मात्र कैरीमुळे या तक्रारी दूर होण्यास निश्चितच मदत होते. कैरीचे पदार्थ खाल्ल्याने ही बिघडलेली पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

हिरड्यांच्या मजबूतीसाठी फायदेशीर

कैरीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. काहींना विविध कारणांनी हिरड्यांमधून रक्त येते. ते रोखण्यासाठी कैरी अतिशय उत्तम काम करते. कैरीमुळे दात मजबूत राहतात. तसेच तोंडाचा वास येण्याची समस्याही कमी होते.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

आंबा खाल्ल्याने वजन वाढते असे आपण या काळात अनेकदा ऐकतो. पण आंब्यामुळे वजन वाढत नाही. तसेच कैरी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. शरीरावर वाढलेल्या अतिरिक्त चरबीला कमी करण्यासाठी कैरीचे सेवन फायदेशीर ठरते.

त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम पर्याय

उन्हामुळे त्वचेवर येणारे रॅशेस कमी करण्यासाठी कैरीचा उपयोग होतो. उन्हामुळे शरीरात वाढणारा थंडावा कमी करण्यासाठी कैरीचे सेवन हा उत्तम पर्याय आहे. उन्हाळ्यात घाम येणे हे अतिशय सामान्य आहे. मात्र कैरीचा रस प्यायल्यास घाम येणे कमी होते. घामाद्वारे शरीरातील आयर्न आणि सोडियम क्लोराईडची पातळी कमी होते. मात्र कैरीचा आहारातील समावेश ही पातळी भरुन काढण्यास उपयुक्त ठरतो.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत

सध्या मधुमेह ही अतिशय सामान्य समस्या झाली आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राहणे आवश्यक असते. कैरीच्या सेवनाने हे साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच शरीरातील लोहाचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठीही कैरीची मदत होते.

Dr. Dharmendra Singh
Dr. Dharmendra Singh
MS/MD - Ayurveda, Cardiologist Diabetologist, 1 yrs, Pune
Dr. Sujit Shinde
Dr. Sujit Shinde
BHMS, Family Physician Homeopath, 24 yrs, Pune
Dr. Kshitija Kulkarni
Dr. Kshitija Kulkarni
MS/MD - Ayurveda, Yoga and Ayurveda Panchakarma, 5 yrs, Pune
Dr. Anushree Bhonde
Dr. Anushree Bhonde
BPTh, Physiotherapist, 11 yrs, Pune
Dr. Virag  Kulkarni
Dr. Virag Kulkarni
BAMS, Ayurveda Panchakarma, 14 yrs, Pune