Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
वारंवार तोंड येण्याचा त्रास आटोक्यात ठेवतील 'हे' घरगुती उपाय
#तोंडाची काळजी

तोंड येण्याचा त्रास वेदनादायी असतो त्यासोबतच यामुळे खाण्या-पिण्यावर बंधनं येतात. शरीरात उष्णता वाढल्यास किंवा तोंडाचे आरोग्य पुरेसे न जपल्यास तोंड येण्याचा त्रास उद्भवतो. हा त्रास आटोक्यात ठेवायचा असेल तर घरगुती उपाय नक्कीच फायदेशीर ठरू शकतात.

तोंड येण्याचा त्रास आटोक्यात ठेवणारे घरगुती उपाय
1. हिरड्याचा लहानसा तुकडा बारीक करा. हिरड्याची पावडर दिवसातून 2-3 वेळेस त्रास होणार्‍या जागी लावा. यामुळे तोंड येण्याचा त्रास कमी होतो.

2. सकाळ - संध्याकाळ तुळशीची 4-5 पान चावून खावीत. यानंतर पाणी प्या. सलग आठवडाभर हा उपाय केल्यास तोंड येण्याचा त्रास आटोक्यात राहील. तुळस ही अ‍ॅन्टीबॅक्टेरियल असल्याने त्रास कमी होतो.

3. रात्री झोपण्यापूर्वी मध आणि हिरड्याचं चूर्ण एकत्र करून खाल्ल्यास तोंड येण्याचा त्रास कमी होतो.

4. चमेली पानं चघळा. यामध्ये तोंडात तयार होणारी लाळ थुंका. हा उपाय थोड्या वेळाचं अंतर ठेवून आणि हळूहळू केल्यास फायदा होतो.

हे घरगुती उपाय असल्याने त्याचा तात्काळ परिणाम दिसणार नाही. त्यामुळे आठवडाभरापेक्षा जास्त काळ त्रास जाणवत असल्यास, तोंड येण्याचा त्रास वाढत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Dr. Deepali Ladkat
Dr. Deepali Ladkat
BHMS, Homeopath, Pune
Dr. Dharmendra Singh
Dr. Dharmendra Singh
MS/MD - Ayurveda, Cardiologist Diabetologist, 1 yrs, Pune
Dr. Sayali Khare - Pendse
Dr. Sayali Khare - Pendse
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 3 yrs, Pune
Dr. Mangal Thube - Buchade
Dr. Mangal Thube - Buchade
BAMS, Ayurveda Yoga and Ayurveda, 9 yrs, Pune
Dr. Abhay Jamadagni
Dr. Abhay Jamadagni
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 8 yrs, Pune