Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
घरच्या घरी प्रसुती करणं कितपत सुरक्षित ?
#सामान्य कामगार आणि वितरण#गर्भधारणा

'थ्री इडियट्स' सिनेमातील क्लायमॅक्सचा सीन त्यामध्ये शक्कल लढवून करण्यात आलेली प्रसुती हे चित्रपटापुरता ठीक आहे. मात्र वास्तवामध्ये अशा स्थिती हाताळणं अत्यंत अवघड आणि धोकादायक असतं. काही दिवसांपूर्वी दक्षिण भारतात एका महिलेची युट्युब व्हिडिओच्या मदतीने प्रसुती करण्याच्या प्रयत्नामध्ये तिचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

घरी प्रसुती करणं कितपत सुरक्षित ?
पूर्वीच्या काळी अत्याधुनिक डॉक्टर सेवा, हॉस्पिटल्स उपलब्ध नसल्याने अनेकजण घरच्या घरीच प्रसुती करत असतं. मात्र आता जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे स्त्रियांच्या आरोग्यामध्ये आणि प्रसुतीमध्येही अनेक गुंतागुंत वाढली आहे.

तज्ञाच्या सल्ल्यानुसार अगदीच अपवादात्मक स्थितीशिवाय तज्ञांच्या मदतीशिवाय प्रसुती करणं आरोग्याला धोकादायक आहे. काही कारणास्तव प्रवासादरम्यान प्रसुती करावी लागल्यास तात्काळ नजीकच्या हॉस्पिटल्सची मदत घ्यावी.


जीवावर कशी बेतू शकते घरगुती प्रसुती ?
प्रसुती कशी होईल? किंवा त्यादरम्यान रक्तस्त्राव किती प्रमाणात होईल? याचा आधीपासून कोणालाच अंदाज असू शकत नाही. त्यामुळे घरगुती प्रसुती धोकादायक ठरू शकते. अति रक्तस्त्राव झाल्यास किंवा मानसिक दबाव आणि ताणामुळेदेखील जीव गमावण्याची शक्यता असते.

कधी दिला जातो सिझेरियनचा सल्ला?
आजकाल प्रसुतीकळांचा त्रास आणि लांबणारी प्रसुती टाळण्यसाठी अनेकजणी सिझेरियन प्रसुतीची निवड करतात. मात्र यासोबतच बाळाचं डोकं मोठं असल्यास, आईला किंवा बाळाला काही धोका असल्यास, बाळ नैसर्गिकरित्या बाहेर येण्याची शक्यता कमी असल्यास सिझेरियन पद्धतीने बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

नैसर्गिक प्रसुती स्त्री आणि बाळाच्याही आरोग्याला फायदेशीर असल्याने त्यासाठी सुरूवातीपासूनच प्रयत्न करणं अधिक फायदेशीर आहे. त्यासाठी आहारात आणि व्यायामात सकारात्मक बदल करणं फायदेशीर ठरते.

Dr. Rohit Patil
Dr. Rohit Patil
MDS, Dentist Implantologist, 5 yrs, Pune
Dr. Shalthiel Sathe
Dr. Shalthiel Sathe
BHMS, Medical Cosmetologist Trichologist, 10 yrs, Pune
Dr. Sneha Jain
Dr. Sneha Jain
MD - Homeopathy, Homeopath, 4 yrs, Pune
Dr. Manoj Deshpande
Dr. Manoj Deshpande
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 3 yrs, Pune
Dr. Abhijeet  Shinde
Dr. Abhijeet Shinde
DNB, Cardiologist Diabetologist, 13 yrs, Pune