Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
पिरियड्स येण्याआधी तुमच्या मुलीला या 5 गोष्टी नक्की सांगा
#मासिक पाळी#मासिक पाळीची स्वच्छता

मासिक पाळी विषयावर आपल्याकडे खुलेपणाने बोललं जात नाही. जो कोणी बोलायचा प्रयत्न करेल त्याच्याकडे साशंकतेने पाहिलं जातं. पण या वेळीच या विषयाची समज देणं गरजेचं आहे. शहरी भागात अकराव्या वर्षापासून मुलींना पिरियड्स येतात. अशावेळी दुसरीकडून चुकीची माहिती मिळण्यापेक्षा तिला योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. तुमची मुलगी वयात येत असेल तर तिच्यासोबत बोलणं गरजेचं आहे.

तिच्या प्रश्नाची उत्तर द्या

मुलगी वयात येतानाच तिच्याशी संवाद वाढवा. 'तुला मासिक पाळी येणार आहे', याची जाणीव करुन द्या. एकदा मासिक पाळी सुरू झाली की ती तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारेल. तिच्या सर्व प्रश्नांची उत्तर तिला समजेल अशा भाषेत द्या. ते शक्य नसल्यास डॉक्टरांची मदत घ्या.

सॅनेटरी नॅपकीनचा वापर

सॅनेटरी नॅपकीनचा वापर कसा करायचा याचं प्रात्यक्षिक तिला द्या. बऱ्याच लहान मुलींना पिरियड्स दरम्यान सॅनेटरी नॅपकीन योग्य पद्धतीनं लावता येतं नाही. तिला तिच्या पिरियड्सची तारीख लक्षात ठेवायला सांगा.


पिरियड्स बॅग

एका छोट्याशी बॅग किंवा पाऊचमध्ये एक सेनॅटरी नॅपकीन आणि एक्स्ट्रा अंडरवेयर ठेवून बॅग तयार करा. ही छोटी बॅग ती आपल्या शाळेच्या बागेत ठेवू शकेल. यामुळे शाळा सुरू असताना जर तिला पिरियड्स आले तरी तिला भिती वाटणार नाही किंवा चिडचिड होणार नाही. महिलांना दर महिन्याला पिरियड्स येणं साधारण बाब आहे हे तिच्या मनात ठसवणं गरजेच आहे.

माहितीचा अतिरेक नको

लहान वयात तिच्यावर खूप साऱ्या माहितीचा मारा करु नका. वयाप्रमाणे आपल्या शरीरात बदल होतात हे खरं आहे पण याची तिला भिती वाटणार नाही याचीही तेवढीच काळजी घ्यायला हवी. पोटात दुखणं, रक्तस्त्राव या गोष्टी मासिक पाळीशी जोडल्या गेल्या आहेत. पण पहिल्यांदाच सर्व एकत्र न सांगता आधी हलक्या पोटदुखी बद्दल सांगू शकता. स्वत: अनूभव घेतल्यानंतर तिला अनेक गोष्टी स्पष्ट होतील.

स्वच्छतेबद्दल माहिती

पिरियड्स दरम्यान सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट कशाप्रकारे लावली जाते?, स्वत:ची स्वच्छता कशाप्रकारे ठेवली जाते ? याची माहिती करुन द्या. स्किन रॅशेस आणि इन्फेक्शनपासून वाचण्याचे उपायही तिला सांगा.

Dr. Shilpa Jungare Tayade
Dr. Shilpa Jungare Tayade
MS/MD - Ayurveda, Ayurveda Dermatologist, 8 yrs, Pune
Dr. Richa
Dr. Richa
BAMS, Mumbai Suburban
Dr. Vishwajeet Desai
Dr. Vishwajeet Desai
BAMS, Ayurveda Infertility Specialist, 8 yrs, Pune
Dr. Vijay U. Jadhav
Dr. Vijay U. Jadhav
BAMS, Ayurveda Family Physician, 15 yrs, Pune
Dr. Rahul Devle
Dr. Rahul Devle
BHMS, Homeopath Family Physician, 10 yrs, Pune