Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
सुई न टोचता मलेरियाची चाचणी करणारे उपकरण
#वैद्यकीय संशोधन#मलेरिया

गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात ते खरेच, युगांडातील एका व्यक्तीला मलेरिया झाला असताना निदान होण्यास विलंब लागत होता त्यामुळे ब्रायन गिट्टा या रुग्णानेच कुठलीही सुई वगैरे न टोचता करता येईल, अशी मलेरियाची रोगनिदान चाचणी शोधली आहे. तो रुग्ण २५ वर्षीय संगणक अभियंता असून त्याला या शोधासाठी पुरस्कारही मिळाला आहे. मातीबाबू हे या चाचणी संचाचे नाव असून गिट्टा याला त्यासाठी ब्रिटनच्या रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीयरिंग संस्थेने २५ हजार युरोचा पुरस्कार जाहीर केला. आफ्रिकेत मलेरियाचे प्रमाण खूपच जास्त आहे. २०१६ मध्ये २१६ दशलक्ष रुग्ण होते. २०१५ मध्ये हे प्रमाण २११ दशलक्ष होते. मृतांची संख्याही २०१६ मध्ये एक हजाराने कमी होऊन ४४,५०० झाली आहे. स्वाहिली भाषेत उपचार या शब्दाला मातीबाबू हा प्रतिशब्द आहे. त्यावरून या निदान संचाचे नाव तसे ठेवले आहे.

पोर्तुगालमधील एक संस्था आता या संचाचे व्यावसायिक उत्पादन करणार असल्याचे परीक्षक रिबेका एनॉनचोंग यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सध्या मलेरियाची चाचणी करण्यासाठी २०० संच उपलब्ध असून त्यात आता हा नवीन संच जास्त सोपा ठरणार आहे. गिट्टा याने या चाचणी संचाची अचूकता ९० टक्क्य़ांपर्यंत नेण्याचे ठरवले आहे. या संचाची किंमत १०० डॉलर असेल.

हा संच वापरण्यासाठी तज्ज्ञाची गरज नाही, शिवाय ग्रामीण भागात तो फार उपयोगी पडणार आहे, कारण तेथे सुविधा नसतात. या पद्धतीत एक लाल रंगाचा किरण हाताच्या बोटावर टाकला जातो, त्यामुळे लाल रक्तपेशींचा आकार, संख्या व रंग यातील फरक कळतो. तो एका मिनिटात मोबाइल किंवा संगणकावर घेऊन मलेरियाचे निदान करता येते.

Dr. Sagar Achyut
Dr. Sagar Achyut
BDS, Oral And Maxillofacial Surgeon Dental Surgeon, 11 yrs, Pune
Dr. SS Bansal
Dr. SS Bansal
MBBS, Obstetrics and Gynecologist, 32 yrs, Pune
Dr. Aniket Joshi
Dr. Aniket Joshi
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 11 yrs, Pune
Dr. Jitendar Choudhary
Dr. Jitendar Choudhary
BHMS, Homeopath, 4 yrs, Pune
Dr. Amar S. Shete
Dr. Amar S. Shete
BAMS, Family Physician, Pune