Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
 पुरुषांतील वंध्यत्वाची कारणे
#वंध्यत्व

वंध्यत्व ही सध्या अनेक जोडप्यांमधील एक महत्त्वाची समस्या असते. जोडीदारापैकी नेमके कोणामध्ये ती समस्या आहे हे शोधणे महत्त्वाचे ठरते. महिलांबरोबरच पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या असणे हे आपल्या समाजात अजून म्हणावे तितके मान्य होणारे कारण नाही. मात्र जवळपास २० टक्के जोडप्यांमध्ये पुरुषामध्ये असणारे वंध्यत्व ही जोडप्याच्या लैंगिक संबंधातील मुख्य समस्या असते. याबाबत वेळीच योग्य ती माहिती घेतल्यास त्याचा जोडप्यांचे लैंगिक आणि कौटुंबिक आयुष्य सुखकर होण्यास मदत होते.
पुरुषांमधील वंध्यत्वाची काही प्रमुख कारणे म्हणजे शुक्राणूंची निर्मिती, त्यांची घनता आणि ते नेमक्या ठिकाणी पोहोचण्याची प्रक्रिया ही आहेत. यासाठी काही ठराविक घटक कारणीभूत असतात ते खालीलप्रमाणे…

१. धुम्रपान, दारु आणि मादक द्रव्यांचे सेवन

२. वय वाढणे

३. वेरीकोसेलची (वेरीकोस रक्तवाहीनीशी निगडीत समस्या) समस्या

४. विशिष्ट औषधांचे दिर्घकाल सेवन

५. कामाचा किंवा अन्य गोष्टींचा ताण

६. आनुवंशिक विकार

चिकित्सा

वंध्यत्वाचा कालावधी
लैंगिक इतिहास
बालपणातील मूत्रसंबंधी किंवा इतर विकार
श्वसन रोग
लैंगिक संबंधांबाबतचा इतिहास
कौटुंबिक पार्श्वभूमी
पाठिच्या कण्याची इजा
शारीरिक हालचाली
अंडकोष
लिंगाशी निगडित दोष


वरील चिकित्सा केल्यानंतर डॉक्टर काही विशेष तपासण्या करायला सांगतात. या तपासण्यांमधून वंध्यत्वाचे नेमके कारण लक्षात येते आणि डॉक्टरांना त्यादृष्टीने योग्य ते उपचार करणे सोयीचे होते. यामध्ये खालील तपासण्यांचा समावेश होतो. त्यावरुन मिळालेल्या निष्कर्षानुसार औषधोपचार, आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया तसेच इतर उपचारपद्धतींचा उपयोग केला जातो.

Dr. Sarita Bharambe
Dr. Sarita Bharambe
DHMS, Family Physician, 30 yrs, Pune
Dr. Rajendra kadam
Dr. Rajendra kadam
BAMS, Ayurveda, 10 yrs, Pune
Dr. Arati Bayas-Pawar
Dr. Arati Bayas-Pawar
BPTh, Physiotherapist Homecare Physiotherapist, 12 yrs, Pune
Dr. Praisy David
Dr. Praisy David
BAMS, Pune
Dr. Pratima Kokate-Ghode
Dr. Pratima Kokate-Ghode
MS/MD - Ayurveda, Ayurveda Diet Therapeutic Yoga, 9 yrs, Pune