Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
चष्माच्या अतिवापरामुळे नाकपुडीवर पडणारे डाग हटवतील 'हे' घरगुती उपाय
#घरगुती उपचार

मुंबई : काही जण स्टाईल म्हणून असेल तर काही जणांना डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी नियमित चष्मा वापरणं गरजेचे असते. परंतू नियमित चष्मा वापरणार्‍यांमध्ये एक समस्या हमखास आढळते. ही समस्या म्हणजे नाकाजवळ दिसणारे काळे डाग. सतत चष्मा वापरणार्‍यांमध्ये नाकाजवळ काळे डाग दिसण्याची समस्या हमखास आढळते. हा डाग तुमचं सौंदर्यांच्या आड येत असल्यास काही घरगुती उपायांनी हे डाग हटवले जाऊ शकतात हे तुम्हांला ठाऊक आहे का ?

1. संत्र्याची साल -
संत्र्याची साल उन्हामध्ये सुकवा. सुकवलेल्या सालीची पूड करा. यामध्ये दूध मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट नियमित नाकाजवळ लावा. संत्र आणि दूध दोन्ही त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी मदत करत असल्याने नाकपुडीजवळील काळे डाग दूर होण्यास मदत होईल.

2. लिंबू -
लिंबू नैसर्गिकरित्या क्लिंजर म्हणून काम करते. चमचाभर लिंबाच्या रसामध्ये थोडं पाणी मिसळा. या मिश्रणामुळे नाकपुडीवरील काळे डाग दूर होण्यास मदत होईल.

3. बदामाचं तेल -
बदामाचं तेल रात्री झोपण्यापूर्वी नाकपुडीजवळ लावा. सकाळी चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवावा. यामुळे काळे डाग दूर होण्यास मदत होते.

या घरगुती उपायांंसोबतच नाकपुडीवर चष्मांच्या नोझपॅडमुळे पडणारे डाग हटवण्यासाठी ते नियमित आणि काही ठराविक कालांंतराने बदलणं गरजेचे आहे.

Dr. Sagar Salunke
Dr. Sagar Salunke
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 2 yrs, Pune
Dr. Seema
Dr. Seema
BAMS, Pune
Dr. Jetin Anand
Dr. Jetin Anand
BAMS, Ayurveda Clinic, 12 yrs, Mumbai Suburban
Dr. Ganesh  Jangam
Dr. Ganesh Jangam
BHMS, Homeopath Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Kunal Janrao
Dr. Kunal Janrao
MDS, Dentist Periodontist, 6 yrs, Pune