Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
हिवाळ्यामध्‍ये हार्ट फेल्‍युरसंदर्भात योग्‍य काळजी घ्‍या!
#हृदय अपयश

वर्षातील सर्वात बहुप्रतिक्षित ऋतू म्‍हणजेच हिवाळा सुरू आहे. भारतासारख्‍या उष्‍णकटिबंधीय देशामध्‍ये वर्षातून अधिक काळ उष्‍णतेचा त्रास सहन करावा लागतो, ज्‍यामुळे हिवाळा ऋतूतील थंडावा या उष्‍णतेपासून मोठ्या प्रमाणात आराम देतो. पण हिवाळा देखील प्रत्‍येकाला सुखदायक अनुभव देईल असे नाही. या ऋतूमध्‍ये देखील विविध दाहक आजार पसरतात किंवा हार्ट फेल्‍युरसारखे आजार अधिक बिकट होतात.

कन्‍जेस्टिव्‍ह हार्ट फेल्‍युर म्‍हणजेच 'हार्ट फेल्‍युर' हा एक पुरोगामी आजार आहे. या आजारामध्‍ये हृदयातील स्‍नायू कमकुवत होण्‍यासोबतच काळासह कडक होत जातात. ज्‍यामुळे हृदयाच्या पंपिंगचे कार्य योग्‍यरित्‍या होण्‍याची क्षमता कमी होते. तसेच शरीराच्‍या महत्‍त्‍वाच्‍या अवयवांना पुरवठा होणाऱ्या ऑक्सिजन व पौष्टिक घटकांच्‍या प्रमाणामध्‍ये घट होते. अलिकडील काळात प्रगत उपचार पद्धतींमध्‍ये वाढ झाली आहे, ज्‍यामुळे काही सकारात्‍मक जीवनशैली बदलांसह हिवाळ्यादरम्‍यान हार्ट फेल्‍युरवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येऊ शकते.

हिवाळ्यामध्‍ये कमी होणाऱ्या तापमानामुळे हृदयावर अधिक ताण पडू शकतो, खासकरून हार्ट फेल्‍युरने पीडित लोकांना याचा अधिक धोका असतो. यामागील कारण म्‍हणजे हृदयाने शरीराला पुरेशा प्रमाणात रक्‍त व ऑक्सिजनचा पुरवठा करण्‍यासाठी अधिक काम करण्‍याची गरज असते. हिवाळ्यादरम्‍यान हार्ट फेल्‍युरने पीडित रूग्‍णांना हॉस्पिटलमध्‍ये भरती करण्‍याचे प्रमाण वाढत आहे. म्‍हणूनच हृदयाचे आरोग्‍य व योग्‍य ती काळजी घेण्‍यासाठी संभाव्‍य धोक्‍यांबाबत माहित असणे महत्‍त्‍वाचे आहे.

ब्रीच कँडी हॉस्पिटलचे इंटरवेन्‍शनल कार्डियोलॉजिस्‍ट डॉ. देवकिशन पहालाजानी म्‍हणाले, ''हार्ट फेल्‍युरने पीडित रुग्‍णांमध्ये उन्‍हाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्‍ये हॉस्पिटलमध्‍ये भरती होण्‍यासोबतच मृत्‍यूचा धोका अधिक आहे. तसेच आम्‍ही रात्रीच्‍या वेळी हार्ट फेल्‍युर केसेसच्‍या संख्‍येमध्‍ये वाढ होताना देखील पाहिले आहे.'

अनेकदा काही कालावधीसाठी उपचार मिळाल्‍यानंतर रुग्‍ण पुढील औषधोपचार सुरू ठेवत नाहीत. त्‍यांना वाटते की, आपण आजारामधून बरे झाले आहोत. पण यामुळे आजाराची स्थिती अधिक बिकट होऊ शकते. हार्ट फेल्‍युरसाठी दीर्घकालीन उपचार म्‍हणजे या तीव्र स्थितींवर नियंत्रण ठेवणे, कारण प्रत्‍येक स्थिती आयुष्यासाठी धोकादायक असू शकते.''

हृदयाची काळजी घेण्‍यासंदर्भात मार्गदर्शन :

आरोग्‍यदायी आहाराचे सेवन करा

आरोग्‍यदायी व संतुलित आहारामुळे रोगप्रतिकारशक्‍ती कायम राखण्‍यामध्‍ये मदत होते. आहारामध्‍ये ताजे गरमागरम पदार्थ आणि चहा, कॉफी यांसारख्‍या पेयांसोबतच उच्‍च-फायबरयुक्‍त पदार्थांचा समावेश करा. यामुळे तुम्‍हाला पौष्टिक मूल्‍य मिळेल आणि हृदयाला हिवाळ्यासाठी आवश्‍यक असलेली अतिरिक्‍त ऊर्जा मिळण्यास मदत होईल.

उबदार राहा

थंड किंवा उच्‍च-दाब असलेल्‍या वातावरणामध्‍ये गेल्‍याने हार्ट फेल्‍युरने पीडित रुग्‍णांना हॉस्पिटलमध्‍ये भरती करावे लागू शकते. थंड वातावरणामुळे रक्‍तामध्‍ये देखील बदल होऊ शकतात. ज्‍यामुळे रक्‍ताच्‍या गाठी होण्‍याचा धोका वाढू शकतो. ज्‍यामुळे हृदयाघात किंवा स्‍ट्रोकचा धोका वाढून हार्ट फेल्‍युर होऊ शकते. म्‍हणूनच हिवाळ्यादरम्‍यान उबदार राहणे अत्‍यंत महत्‍त्‍वाचे असते.


हिवाळ्यातील आजारांपासून संरक्षण

हिवाळ्यामध्‍ये धुके व प्रदूषके जमिनीच्‍या जवळ असतात, ज्‍यामुळे छातीचे आजार, श्‍वास घेण्‍यामध्‍ये त्रास होणे आणि ताप यांसारख्‍या आजारांचा धोका वाढतो. यापैकी एखादा आजार झाल्‍यास श्‍वास घेण्‍यामध्‍ये खूपच त्रास होऊ शकतो. हार्ट फेल्‍युरने पीडित रुग्‍णांना श्‍वास घेण्‍यामध्‍ये त्रास होतोच आणि कोणत्‍याही प्रकारचा व्‍हायरल फिव्‍हर किंवा तापामुळे श्‍वास घेण्‍यामध्‍ये त्रास होऊन रुग्‍णाची स्थिती अधिक खालावू शकते.

रक्‍तदाबावर लक्ष ठेवा

हिवाळ्यादरम्‍यान थंड वातावरणाचा सिम्‍पथॅटिक मज्‍जासंस्‍थेचे (जी शरीर तणावाला कशाप्रकारे प्रतिसाद देते यावर नियंत्रण ठेवण्‍यामध्‍ये मदत करते) कार्य आणि हार्मोन कॅटेक्लोमाइनचे उत्‍सर्जन अशा शरीराच्‍या कार्यांवर परिणाम होतो. यामुळे हृदयाचे ठोके वाढून रक्‍तदाब वाढू शकतो आणि रक्‍तवाहिन्‍यांचा प्रतिसाद कमी होऊ शकतो, ज्‍यामुळे हृदयाचे कार्य वाढू शकते. तसेच अशा स्थितीमुळे हार्ट फेल्‍युरने पीडित रुग्‍णांना हॉस्पिटलमध्‍ये भरती करावे लागू शकते. मीठाचे सेवन कमी करत योग्‍य रक्‍तदाब ठेवा आणि त्‍यावर बारकाईने लक्ष ठेवा.


सुर्यप्रकाशात उभे राहा

सुर्यप्रकाशातील जीवनसत्‍त्‍व म्‍हणजेच जीवनसत्‍त्‍व ड हृदयामधील ऊती कडक होण्‍यापासून प्रतिबंध करते. या ऊती हृदयाघातानंतर हार्ट फेल्‍युरपासून हृदयाचे संरक्षण करतात. हिवाळ्यामध्‍ये पुरेशा प्रमाणात सुर्यप्रकाश मिळत नसल्‍यामुळे जीवनसत्‍त्‍व ड कमी प्रमाणात मिळते, ज्‍यामुळे हार्ट फेल्‍युरचा धोका वाढतो. म्‍हणूनच हृदयाच्‍या संरक्षणासाठी पुरेशा प्रमाणात जीवनसत्‍त्‍व ड मिळणे अत्‍यंत महत्‍त्‍वाचे आहे. सुर्यप्रकाशात उभे राहण्‍याची योग्‍य वेळ म्‍हणजे सकाळी 11 ते दुपारी 1. या कालावधीदरम्‍यान युव्‍हीबी किरणांचे प्रमाण सर्वाधिक असते.

हार्ट फेल्‍युरवर करण्‍यात आलेली सर्वात मोठी क्लिनिकल चाचणी 'पॅराडिग्‍म-एचएफ' अभ्‍यासानुसार असे आढळून आले की, एआरएनआय थेरपी सारखी प्रगत उपचार पद्धती सोबतच जीवनशैली बदल मधुमेहाने पीडित रुग्‍णांचा जीवनाचा दर्जा सुधारू शकतात. अनेकदा काही कालावधीसाठी उपचार मिळाल्‍यानंतर रुग्‍ण पुढील औषधोपचार सुरू ठेवत नाहीत. त्‍यांना वाटते की, आपण आजारामधून बरे झाले आहोत. पण यामुळे आजाराची स्थिती अधिक बिकट होऊ शकते. म्‍हणून उपचार सुरूच ठेवले पाहिजेत.

Dr. Reshma P. Ransing
Dr. Reshma P. Ransing
BHMS, Family Physician, Pune
Dr. Sandip Nimbhorkar
Dr. Sandip Nimbhorkar
BAMS, Ayurveda Naturopathy Specialist, 21 yrs, Pune
Dr. Ashwini Hirekar
Dr. Ashwini Hirekar
BHMS, Homeopath Family Physician, 4 yrs, Mumbai Suburban
Dr. Aniket Amrutkar
Dr. Aniket Amrutkar
BAMS, Family Physician Physician, 8 yrs, Pune
Dr. Manish Jawale
Dr. Manish Jawale
MD - Homeopathy, Homeopath, 17 yrs, Pune