Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
महागडे उपाय विसरा, घरातील ही ६ कामे करुन तुम्ही राहाल स्लिम आणि फिट!
#निरोगी जिवन#वजन कमी होणे#आरोग्याचे फायदे

बदलत्या लाइफस्टाइलमुळे आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वाढलेलं वजन कमी करण्याचं आव्हान अनेकांसमोर उभं ठाकलं आहे. वाढलेल्या वजनामुळे अनेकजण तणावात येतात आणि वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय करतात. काही लोक तर वजन कमी करण्यासाठी आणि फिट दिसण्यासाठी वाट्टेल ते काम करतात. स्पेशल डाएटपासून ते जिममध्ये तासंतास घाम गाळण्यापासून वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, घरातील काही खास कामे करुन कॅलजीज बर्न केल्या जाऊ शकतात. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल. चला जाणून घेऊ घरातील काही कामे ज्याव्दारे तुम्ही जास्तीत जास्त कॅलरीही बर्न करु शकता आणि घरातील कामेही पूर्ण होतील.

लादी पुसणे

घरातील लादी पुसणे हे फार मेहनतीचं आणि शारीरिक हालचाल अधिक होणारं असतं. या दरम्यान व्यक्ती स्क्वाट आणि क्रॉल करतो, या दोन्ही गोष्टी पायांसाठी व्यायामाप्रमाणे आहेत. लादी पुसताना कंबरेची सतत हालचाल होत असल्याने फॅट कमी करण्यासही मदत मिळते. दररोज घरात २० मिनिटे लादी पुसल्यास तुम्ही १५० कॅलरीज बर्न करु शकता.

कपडे धुणे

बदलत्या लाइफस्टाइलमुळे आणि टेक्नॉलॉजीमुळे आजकाल जवळपास जास्तीत जास्ती घरांमध्ये कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. कुणी सेमी-ऑटोमॅटिक मशीनचा वापर करतात, तर काही लोक पूर्ण ऑटोमॅटिक मशीनचा वापर करतात. पण हातांनी कपडे धुण्याचे तुम्हाला फिटनेससाठी अनेक फायदे होतात. हाताने कपडे धुतल्याने तुम्ही १३० कॅलरी बर्न करु शकता.

भांडी घासणे

भारतात सध्यातरी डिश वॉशरची लोकप्रियता फार वाढली नाहीये. पण घराघरात धुणी-भांडी करण्यासाठी नोकर ठेवले जातात. पण याने नुकसान तुमचंच होतं. उभे राहून असो वा बसून भांडी घासल्याने तुम्हाला जवळपास १२५ कॅलजी बर्न करण्यास मदत मिळते. याचा दुसरा फायदा म्हणजे नोकर जशी भांडी घासतात त्यापेक्षा तुम्ही स्वत: चांगली आणि काळजीने भांडी स्वच्छ करु शकता.

स्वत: जेवण बनवणे

आजकाल जास्तीत जास्त घरांमध्ये पती-पत्नी दोघोही नोकरी करतात. अशात त्यांना स्वत:साठीही जेवण तयार करण्याचा वेळ नसतो. त्यामुळे त्यासाठीही नोकर ठेवले जातात. पण नोकर तुमच्या आरोग्याच्या डाएटची किंवा फिटनेसची काळजी घेऊन जेवण तयार करणं कठिण आहे. स्वत: जेवण तयार करण्याचे अनेक फायदे आहेत. एकतर तुम्ही तुम्हाला हवं तसं आणि हवं ते तयार करु शकता. तसेच जेवण तयार करतानाच्या पूर्ण प्रक्रिये दरम्यान उभं राहिल्याने तुम्ही साधारण १०० कॅलरीज बर्न करु शकता.

घराची साफसफाई

घरात धूळ-माती होणे ही सामान्य बाब आहे. ही धूळ-माती कुणालाही न आवडणारीच असते. पण ती स्वच्छ करण्यासाठी नोकराची वाट बघू नका. याने तुमच्या आरोग्यलाही नुकसान पोहोचतं. त्यामुळे स्वत: जर तुम्ही हे काम केलं तर ते चांगलंही होईल आणि याने तुम्ही १२५ कॅलरी बर्न करु शकाल.

पीठ मळणे

चपात्या करण्यासाठी पीठ मळणे हे काम तसं कुणासाठीही कंटाळवाणंच आहे. पण पीठ मळण्याचा फायदा म्हणजे तुम्ही याच्या मदतीने कॅलरी बर्न करु शकता. पीठ मळताना लागणारी ताकद आणि हातांची क्रिया यामुळे तुम्ही ५० कॅलरी बर्न करु शकता.

Dr. Shrikant Choudhari
Dr. Shrikant Choudhari
MS/MD - Ayurveda, General Surgeon, 6 yrs, Pune
Dr. Hitesh Karnavat
Dr. Hitesh Karnavat
BAMS, Ayurveda Infertility Specialist, 12 yrs, Pune
Dr. Manoj Rahane
Dr. Manoj Rahane
BHMS, Homeopath, 13 yrs, Pune
Dr. Sucheta  Mokashi
Dr. Sucheta Mokashi
BDS, Dentist, 3 yrs, Pune
Dr. Geeta Dharmatti
Dr. Geeta Dharmatti
Specialist, dietetics, 22 yrs, Pune