Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
हे खा, बुद्धी वाढवा
#निरोगी जिवन

दिवसभरात आपल्याला अनेक संकटांना समोरे जावं लागतं. अशात डोक्याला खूप चालना द्यावी लागती. म्हणूनचं डोक्याला सुपीक बनविण्यासाठी या पोषक वस्तू खा आणि आपली बुद्धी वाढवा:

ब्रोकोली: हिरव्या कोबी सारखी दिसणारी ही भाजी मेंदूत नवीन पेशी वाढवण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने मेंदू जलद कार्य करतं आणि स्मृती सुधारते.

अक्रोड: अक्रोड एकमेव असा मेवा आहे ज्यात मेंदूची शक्ती वाढविण्यासाठी ओमेगा -3 फॅटी ऍसिड्स सर्वाधिक प्रमाणात आढळतात. ओमेगा-3 मुळे मेंदूत न्यूरोट्रांसमिशन सुरळीत होतं ज्याने मेंदू जलद कार्य करतं. मेंदूच्या स्वास्थ्याकरता अक्रोड हे अत्यंत उपयुक्त आहे.

सालमन मासोळी: मनुष्याच्या मेंदूचा जवळपास 60 टक्के भाग फॅट्सने निर्मित असतो. याचा अर्थ आहे की मेंदूला योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी सतत फॅटी ऍसिडची गरज असते. सालमन मासोळी ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि डोकोसाहेक्सिनॉइक ऍसिड (डीएचए) चा एक उत्तम स्रोत आहे, जो अल्झायमर रोगाला प्रतिबंधित करतो.

टोमॅटो: एंटीऑक्सीडेंट्स आणि लाइकोपीनचा उत्तम स्रोत असल्यामुळे टोमॅटोच्या सेवनाने मेंदू तल्लख होतो. फ्री रेडिकल मेंदूला नुकसानदायक असून याने डिमेंशिया होऊ शकतो. म्हणूनच रोज टोमॅटो खाल्ल्याने पर्याप्त एंटीऑक्सीडेंट्स मिळतात, जे फ्री रेडिकल्सला दूर ठेवतात.

ग्रीन टी: स्वित्झर्लंडच्या बाजेल विद्यापीठात झालेल्या एका संशोधनात मेंदूसाठी हिरवा चहा घेणे उत्तम असल्याचे आढळले आहेत. हिरव्या चहामुळे मेंदूतील रक्तकोशिका मजबूत होतात. ग्रीन टी सेवन केल्याने डिमेंशिया आणि पार्किन्सन रोग होत नाही. डार्क चॉकलेट:

यात शरीर आणि मेंदूसाठी आवश्यक असलेले एंटीऑक्सीडेंट्स आढळतात. डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे फ्लैविनॉयड्स मेंदूमधील रक्ताभिसरण सुधारतात.

ब्लूबेरी: या फळात फ्लैविनॉयड असतं. याचं सेवन करणार्‍याचे मेंदू जलद कार्य करतं. याने मेमरी शॉर्प होते आणि मेंदूला नुकसानदायक ठरणारे फ्री रेडिकल कमी होतात.

पालक: पालकात भरपूर पोटॅशिअम असतं. याने विचार करण्याची क्षमता वाढते. पालकात एंटीऑक्सीडेंट्सच्या व्यतिरिक्त मॅग्नेशियम, फोलेट, व्हिटॅमिन इ असल्याने डिमेंशिया होण्याची शक्यता नसते.

Dr. Avinash Deore
Dr. Avinash Deore
MS/MD - Ayurveda, Ayurveda Infertility Specialist, 15 yrs, Pune
Dr. Santoshkumar Gaikwad
Dr. Santoshkumar Gaikwad
BDS, Dentist Root canal Specialist, 24 yrs, Pune
Dr. Jitendar Choudhary
Dr. Jitendar Choudhary
BHMS, Homeopath, 4 yrs, Pune
Dr. Rekha Y Sanap
Dr. Rekha Y Sanap
MD - Homeopathy, 13 yrs, Pune
Dr. Sandeep Darunde
Dr. Sandeep Darunde
BAMS, Optician Ophthalmologist, 3 yrs, Pune