Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
‘टीएन’ : कारणे व उपाय
#आरोग्याचे फायदे

काही अपवादात्मक रुग्ण वगळता टी. एन. या आजाराचे कारण म्हणजे ट्रायजेमिनल नसेवर आलेला रक्तवाहिन्यांचा दाब. या रुग्णांमध्ये ही नस ज्या भागात स्थित असते, तो भाग जन्मतः चिंचोळा असतो. त्यातच रक्तवाहिन्यांची रचना व वेटोळे या भागात असे असतात, की नसेच्या मेंदूलगतच्या भागावर त्यांचा दाब पडतो.

वय वाढत जाईल, तशी या दाबामध्ये वाढ होत जाते. रक्तवाहिन्यांच्या स्पंदनांमुळे प्रत्येक मिनिटाला ६० ते ८० वेळा हा दाब घण मारल्याप्रमाणे नसेवर प्रहार करत असतो. त्यामुळे नसेच्या आतील चेतातंतूवर परिणाम होऊन त्यांच्या संदेशवहनात 'शॉर्ट सर्किट' व्हायला लागते आणि 'स्पार्क' उडाल्याप्रमाणे वेदना यायला लागतात. एखाद्या करंटप्रमाणे या वेदना येतात व काही सेकंद किंवा मिनिटे टिकतात. हनुवटी, हिरडी, जीभ, गाल, ओठ, नाकपुडी, पापणी, भुवई अशा भागाला हाताचा, टॉवेलचा, वाऱ्याचा, ब्रशचा, पाण्याचा स्पर्श झाल्यावर या वेदना चेहऱ्याच्या एका बाजूला येतात.

जसे दिवस, आठवडे व वर्षे जातील, तशा या वेदना अधिक तीव्र होतात. दिवसातून खूप वेळ टिकायला लागतात. शेवटी शेवटी तर जवळजवळ कायमच असह्य स्वरूपात त्या राहू लागतात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नसेच्या 'आरईझेड' या भागावर असलेला दाब जोपर्यंत टिकून आहे, तोपर्यंत या वेदना कायमच्या बऱ्या होण्याची शक्यता नसते. औषधे नसांना तात्पुरते बधीर करतात. त्याबरोबर ती मेंदू व इतर मज्जासंस्थेलाही बधीर करतात; त्यामुळे त्यांचे दुष्परिणाम सुरू होतात. औषधांचा परिणाम ओसरला की वेदना परत सुरू होतात. ही कळ परत कधी येईल, या भीतीच्या दडपणाखाली रुग्ण राहतो. त्याच्यावर मानसिक परिणाम व्हायला लागतो.

सुईने करण्याच्या छोट्या उपायांनी नसेचा काही भाग जाळला जातो किंवा अल्कोहोलसारख्या रसायनांनी भाजला जातो. हे उपाय बऱ्याचदा तात्पुरते असतात. या काळात 'आरईझेड'वरील दाब क्रमाक्रमाने वाढतच असतो. त्यामुळे दुखणे दामदुपटीने सुरू होते. औषधे किंवा इतर छोटे उपाय हे चुकीचे आहेत असे नाही; पण ते दुखण्याचे मूळ कारण दूर करत नाहीत. स्पंदनयुक्त दाब दूर करणारी शस्त्रक्रिया ही 'एमव्हीडी' या नावाने ओळखली जाते. या शस्त्रक्रियेने हा आजार कायमचा बरा होऊ शकतो. कोणत्या रुग्णांवर ही शस्त्रक्रिया उपयुक्त ठरेल व कुठल्याप्रकारे ती करावी, हे ठरविणे हा अनुभवाचा भाग आहे.

गेली बारा वर्षे पाचशेच्या वर शस्त्रक्रिया करून व रुग्णांचे अनुभव नोंदवून आम्ही जे संख्याशास्त्रीय विश्लेषण केले, त्याप्रमाणे योग्य निवड केली असता व योग्य वेळी शस्त्रक्रिया केली असता ९८ टक्के रुग्णांमध्ये ती यशस्वी ठरल्याचे लक्षात आले. शस्त्रक्रिया यशस्वी होणे म्हणजे वेदना व औषधे दोन्हीपासून मुक्ती मिळणे.

एमव्हीडी शस्त्रक्रिया म्हणजे काय?

'मायक्रो व्हॅस्क्युलर डिकॉम्प्रेशन' असे याचे पूर्ण नाव. यात ट्रायजेमिनल नसेवर आलेला दाब दूर करण्यात येतो. ही शस्त्रक्रिया 'न्यूरोसर्जरी मायक्रोस्कोप' व 'एन्डोस्कोप' या दुर्बिणी वापरून करण्यात येते. यात नसेच्या मेंदूलगतच्या भागातला रक्तवाहिनीचा दाब दूर करण्यात येतो.

Dr. Brinda Dave
Dr. Brinda Dave
MPTh, Neuro Physiotherapist Physiotherapist, 4 yrs, Pune
Dr. Gauri Karve
Dr. Gauri Karve
MBBS, 6 yrs, Pune
Dr. D. Malekar
Dr. D. Malekar
MBBS, Family Physician, 21 yrs, Pune
Dr. Sanjay  Salve
Dr. Sanjay Salve
MBBS, Orthopaedics, 16 yrs, Pune
Dr. Vijaykumar Raut
Dr. Vijaykumar Raut
BAMS, Family Physician Physician, 18 yrs, Pune