Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
 शस्त्रक्रियेचा उपाय
#आरोग्याचे फायदे#निरोगी जिवन

वैद्यकीयदृष्ट्या आग्नमात्मक (रिफ्रॅक्टरी) एपिलेप्सीसाठी शस्त्रक्रियेचा विचार केला जाऊ शकतो. अशा प्रकारची स्थिती साधारण एपिलेप्सीच्या रुग्णांपैकी ३० ते ४० टक्के रुग्णांत आढळते. मेंदूमध्ये नक्की कुठल्या भागातून फिट्स येत आहेत हे शोधण्यासाठी अशा रुग्णांच्या विविध चाचण्या केल्या जातात. यामध्ये व्हिडिओ ईईजी, स्पेशल एपिलेप्सी प्रोटोकॉल, पेटस्कॅन, न्युरोसायकोलॉजी इत्यादींचा समावेश आहे. एखाद्या विशिष्ट भागात जास्त इलेक्ट्रिकल अ‍ॅक्टिव्हिटी सुरू असल्याचे चाचण्यांतून लक्षात आल्यास तो भाग शस्त्रक्रिया करून काढला जाऊ शकतो. त्यामुळे रुग्णाला फिट्सपासून मुक्ती मिळू शकतो.

ज्या रुग्णांसाठी औषधोपचार किंवा शस्त्रक्रिया उपयुक्त ठरत नाहीत त्यांसाठी 'वेगस नर्व्ह स्टिम्युलेशन' म्हणजेच 'व्हीएनएस थेरेपी' हाही एक पर्याय असू शकतो. स्ट्रक्चरल ब्रेनच्या समस्या असल्याने अपस्माराचा झटका येणाऱ्या रुग्णांना शस्त्रक्रिया हा योग्य पर्याय ठरू शकतो. न्यूरोपेस आरएनएस सिस्टीम-रिस्पॉन्सिव्ह न्यूरोस्टीम्युलेशन, किंवा थर्मल अब्लेशनसारख्या मेंदूच्या शस्त्रक्रिया यासाठी उपयुक्त ठरू शकतात. यातील काही शस्त्रक्रियांवर आजही संशोधन सुरू आहे. काही रुग्णांवर औषधे, शस्त्रक्रिया यापेक्षाही बिहेविअरल थेरेपीज प्रभावी ठरतात. तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचे आणि मित्रपरिवाराचे सहकार्य यामध्ये मोलाची कामगिरी बजावते. समाजाकडून मिळणारे सहकार्यही अत्यंत गरजेचे ठरते. हे सर्व करूनही फिट्स नियंत्रणात येत नसतील तर तुम्ही एपिलेप्सी सेंटर्सची देखील मदत घेऊ शकता.

डायटरी थेरेपीमुळेही अनेक प्रकरणांमध्ये रुग्णांच्या फिट्सवर नियंत्रण आणणे शक्य झाले आहे. ही डायटरी थेरेपी सामान्यतः फिट्सच्या औषधोपचारांबरोसोबत दिली जाते. 'क्लासिक केटोजेनीक डाएट' हे खास प्रकारचे हाय फॅट, कमी कर्बोदके असलेले डाएट असते जे फिजिशियन किंवा आहारतज्ज्ञ यांच्या सल्ल्यानुसार दिले जाते. यामुळे लहान मुले, तसेच प्रौढ व्यक्तींच्या फिट्सवर नियंत्रण मिळविण्यात मदत होते. तसेच 'मॉडिफाइड ऍटकिन्स डाएट' देखील प्रभावी ठरू शकते. कारण यामध्ये क्लासिक केटोजेनीक डाएटचे घटक समाविष्ट असतात.

गेल्या दहा वर्षांपासून फिट्सवर देखरेख ठेवण्यासाठी, नियंत्रित करण्यासाठी, इतकेच नव्हे तर फिट्सपासून मुक्त होण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे फिट्सचा माग ठेवणे सुलभ आणि परवडण्याजोगे झाले आहे. 'वेअरेबल सीझर डिटेक्टर्स'सारखे तंत्रज्ञान येत्या काही काळातच भारतातही उपलब्ध होऊ शकेल. ही उपकरणे औषधोपचारांची आठवण करून देतात, तसेच त्यांच्या डॉक्टरांना रुग्णाच्या आरोग्याची माहिती देखील देतात. अशा या उपकरणांच्या मदतीने अपस्मारामुळे अनपेक्षितपणे होणारे मृत्यू टाळण्यास मदत होऊ शकेल. वैद्यकीय क्षेत्रात होणारे हे परिवर्तन समाजासाठी हितावह असणार आहे.

Dr. Nitin Dongre
Dr. Nitin Dongre
MBBS, General Physician, 37 yrs, Pune
Dr. Tejaswini Bidve
Dr. Tejaswini Bidve
BAMS, Family Physician, 10 yrs, Pune
Dr. Amarsinha Nikam
Dr. Amarsinha Nikam
MD - Homeopathy, Homeopath, 33 yrs, Pune
Dr. Avinash Waghmare
Dr. Avinash Waghmare
BAMS, Family Physician Ayurveda, 4 yrs, Pune