Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
मॉन्सून डलनेस
#आरोग्याचे फायदे#स्किनकेअर#निरोगी जिवन

ऋतू बदलतोय. जूनच्या पहिल्या आठवड्यात नेहमी असं भरून आल्यासारखं, रिझल्टची धाकधूक असल्यासारखं, टेन्शन आल्यासारखं वाटतं. उकाडाही असतो आणि मळभ दाटून येऊन पाऊस कधीही येईल याची एक आसवजा धास्तीही असते. म्हणून याकाळात मंद, उदास वातावरण असतं. मळभ येतं. एकदम उदास वाटतं. आळसही येतो. अनेकदा एकदम डिप्रेस वाटून रडू येऊ शकतं. ही सगळी वातावरणाची कृपा आहे असं मानलं तरी, अशी काही लक्षणं असतील तर किंवा दरवर्षी हवा बदलली की आपल्याला हमखास सर्दीखोकला होत असेल तर आपल्या आहाराविहारात काही बदल करायला हवेत. पूर्वीच्या काळी रीतिभातीतून ऋतूप्रमाणे आहारबदल होत असे. आता आपण त्या साऱ्याकडे जुनाट म्हणून लक्ष देत नाही आणि आहारात योग्य बदल न केल्यानं ऋतूबदल त्रास देऊ शकतो.
त्यावर उपाय काय?
उपाय म्हणून आपण काही गोष्टी करू शकतो.

१) व्हिटॅमिन डी
आपल्याकडे उदंड सूर्यप्रकाश असूनही अनेक स्त्री-पुरुषांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळते. स्त्रियांमध्ये तर जास्तच. त्यावर उपाय काय? खरं तर रोज सकाळी १० मिनिटं तरी किमान कोवळा सूर्यप्रकाश आपल्याला मिळायला हवा. उन्हात जायला हवं. त्यामुळे सूर्योदयानंतर लगेच काही काळ उन्हात फिरून या, खुर्ची टाकून बसा. त्यानं डी जीवनसत्त्व तर मिळेलच. फ्रेश वाटेल. हे जीवनसत्त्व फारच कमी असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध घ्या.

२) प्रो बायोटिक
फार मोठा वाटतो हा शब्द. त्या साठीची औषधंही बाजारात ढिगानं मिळतात. म्हणजे काय तर आपल्या पोटात पचनाला मदत करणाºया हेल्दी बॅक्टेरियांची आतड्यांना मदत होणं. ते आतड्यात असणं. त्यासाठीची औषधं घेण्यापेक्षा आहारात दह्या-ताकाचा वापर करावा. शक्यतो दही सकाळच्या जेवणात, नास्तयात घ्यावं. त्यानं पचनशक्ती चांगली राहते.

३) झिंक
झिंक सप्लिमेण्ट प्रतिकारशक्ती वाढवायला मदत करते. घरचा गुळाचा शिरा, साधा शिरा, पौष्टिक सुकामेवा, मनुका यातून हे मिळू शकतं. पण इन्फेक्शन सतत होत असतील तर डॉक्टरच्या सल्ल्यानं झिंक सप्लिमेण्टची औषधं घेऊ शकतात.

४) आयर्न
लोह. रक्तवाढीसाठी आवश्यक. नाचणीचं पीठ, गुळाचा शिरा, बीट, राजगीरा लाडू असं खरं तर या काळात खायला हवं. आणि शक्यतोवर लोखंडी कढईतच भाज्या करायला हव्या. त्यातून लोह पोटात जातं. आपलं हिमोग्लोबिन तपासून घ्यावं. ते फारच कमी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं उत्तम.

५) नास्ता
हा सगळ्यात सोपा उपाय. या काळात आणि पुढे पावसाळ्यातही भरपेट नास्ता चुकवायचा नाही. गरमागरम, घरचं, पोळीभाजी, पोहेसांजा, असं खाल्लेलं उत्तम. शक्यतो आंबवलेले पदार्थ टाळावेत. सकाळी पोटभर नास्ता केला तर त्यानं आपली एनर्जी लेव्हल चांगली राहते, मूडही चांगला राहतो दिवसभर. याकाळात अ‍ॅडमिशनची धावपळ असते तेव्हा घरातून निघतानाच भरपेट नास्ता आणि सोबत घरचा जेवणाचा डबा असणं उत्तम. एवढं केलं तरी आपण पावसाच्या स्वागताला सज्ज होतो.

Dr. Snehal Toke
Dr. Snehal Toke
BDS, 2 yrs, Pune
Dr. Sanjay  Salve
Dr. Sanjay Salve
MBBS, Orthopaedics, 16 yrs, Pune
Dr. Sadashiv K. Deshpande
Dr. Sadashiv K. Deshpande
BHMS, Homeopath, 40 yrs, Pune
Dr. Komal Khandelwal
Dr. Komal Khandelwal
BAMS, Ayurveda, 8 yrs, Pune
Dr. Jalpa Desai
Dr. Jalpa Desai
BHMS, Medical Cosmetologist Trichologist, 6 yrs, Pune