Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
नियमित जॉगिंग करण्याचे 5 मोठे फायदे
#आरोग्याचे फायदे#धावणे#निरोगी जिवन

उत्तम आरोग्यासाठी आहाराप्रमाणे व्यायामही तितकाच महत्त्वाचा असतो. योगा, जिम या माध्यमातून अनेक जण स्वत:ला फीट ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. झुंबा डान्ससारखा पर्यायही काही जण स्विकारतात. पण काही जण जॉगिंग करुन स्वतःला फीट ठेवतात. जॉगिंग केल्याने आरोग्याला मोठा फायदा होतो.

1. वजन कमी होते -

जॉगिंग केल्यामुळे शरीरातील चरबी घटवण्यास मदत होते. चरबी घटण्याचा वेग जॉगिंगमुळे वाढतो. वजन कमी करण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय आहे.

2. मानसिकरित्या फिट

शरिरासह मानसिकरित्या फीट राहण्यासाठी जॉगिंग करणं तितकचं महत्त्वाचं ठरतं. जॉगिंगमुळे आपण फ्रेश राहतो आणि याचा परिणाम म्हणजे आपला आत्मविश्वास वाढतो. यामुळे मानसिकरित्या ही छान वाटतं.


3. डायबेटीसवर उपाय

एकीकडे डायबेटीसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असताना जॉगिंग केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो.

4. प्रतिकारशक्ती वाढते

व्यक्तीची प्रतिकारशक्ती जेवढी चांगली असेल तेवढा व्यक्ती फीट राहतो. जॉगिंग केल्यामुळेही प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

5. हृदयाचं आरोग्य

नियमित जॉगिंग केल्यास तुमचं हृदय हे आरोग्यदायी राहते. जॉगिंगमुळे हृदयाशी संबधित आजार दूर राहतात. यामुळे रक्तदाब सुरळीत राहतो.

Dr. Maya Golikere
Dr. Maya Golikere
BAMS, Panchakarma General Physician, 2 yrs, Pune
Dr. Sonal Shendkar
Dr. Sonal Shendkar
MBBS, Dermatologist Medical Cosmetologist, 7 yrs, Pune
Dr. Yogeshwar Sanap
Dr. Yogeshwar Sanap
MD - Homeopathy, Family Physician Homeopath, 12 yrs, Pune
Dr. Suhas Shingte
Dr. Suhas Shingte
BAMS, Family Physician General Physician, 18 yrs, Pune
Dr. Ajay Rokade
Dr. Ajay Rokade
MD - Homeopathy, Family Physician Homeopath, 15 yrs, Pune