Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
अवेळी होणार्‍या केस गळतीवर घरगुती उपाय
#केस गळणे#केसांची निगा

- झेंडूचे फुल बारीक करून त्‍याचा रस काढा. हा रस नारळाच्‍या तेलात टाकून उकळून घ्‍या. हे तेल थंड झाल्‍यानंतर बाटलीत भरून ठेवा. हे

तेल रोज केसाला लावल्‍यानंतर केस गळणार नाहीत.

- जटामांसी या वनस्पतीला नारळाच्‍या तेलामध्‍ये उकळून हे तेल थंड झाल्‍यानंतर बॉटलमध्‍ये भरावे. रोज रात्री हे तेल डोक्‍याला
लावल्‍यानंतर केस गळणार नाहीत.

- आहारात जास्‍त मीठाचा वापर केला तर टक्कल पडते. मीठ, काळी मिर्ची एक-एक चमचा घ्‍या. या मिश्रणात पाच चमचे नारळाचे तेलटाका. हे मिश्रण टक्कल पडलेल्‍या जागेवर लावल्‍यानंतर केस उगवायला सुरूवात होते.

- आवळ्याचे चुर्ण तयार करुन हे चुर्ण दह्यात मिसळून घ्‍यावे. यानंतर आवळा आणि दह्याची पेस्‍ट तयार करून केसाच्‍या मुळाला लावावी.
एका तासानंतर केस स्‍वच्‍छ धुवावेत. आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग केल्‍यानंतर डोक्‍यावर केस यायला लागतील.
- दोन लीटर पाण्‍यामध्‍ये आवळ्याचे चुर्ण, लिंबाची पाने टाका. दोन लीटर पाणी आर्धे होईपर्यंत उकळत ठेवा. या पाण्‍याने आढवड्यातून दोन
वेळा केस स्‍वच्‍छ करा. यामुळे केस गळती थांबते.

- जैतूनच्‍या(ऑलिव्ह ऑइल) तेलामध्‍ये एक चमचा मध आणि एक चमचा दालचीनी पावडर टाकून पेस्‍ट तयार करावी. स्‍नान
करण्‍याआगोदर ही पेस्‍ट डोक्‍याला लावावी. पंधरा मिनिटा नंतर केस कोमट पाण्‍याने स्‍वच्‍छ करावेत. काही दिवसात केस गळती बंद होईल.
- शिकाकाईच्‍या बीयामध्‍ये थोडे पाणी टाकून बारिक करून घ्‍यावे. रात्रभर पेस्‍ट थंड असेलल्‍या ठिकाणी ठेवावी. सकाळी हे पेस्‍ट केसाला
लावून अर्ध्‍या तासानंतर केस स्‍वच्‍छ करावे. हे पेस्‍ट केसासाठी नॅचरल शॅम्‍पूचे काम करते. याचा वापर वारंवार केल्‍यानंतर केस गळतीची
समस्‍या दूर होते.

- आहारात मेथीच्‍या भाजीचा वापर जास्‍तीत-जास्‍त केल्‍या नंतर आरोग्‍यासाठी लाभदायक ठरतो. मेथीच्‍या बीया रात्रभर पाण्‍यात भिजत ठेवा.सकाळी याचे पेस्‍ट तयार करा. हे पेस्‍ट केसाला लावल्‍यांनतर केस गळती थांबते.

- जास्‍वदांच्‍या फुलाचा रस काढून घ्‍या. या रसाने केसाची मसाज करा. एका तासानंतर केस स्‍वच्छ करावेत. केस दाट होण्‍याबरोबरच काळे
होतात.

Dr. Yogesh Gholap
Dr. Yogesh Gholap
BAMS, Ayurveda General Physician, 12 yrs, Pune
Dr. Tushar D Tarwate
Dr. Tushar D Tarwate
BDS, 11 yrs, Pune
Dr. Saurabh Jaiswal
Dr. Saurabh Jaiswal
MBBS, General Physician, 4 yrs, Varanasi
Dr. Vivek  Sahu
Dr. Vivek Sahu
MD - Homeopathy, 17 yrs, Pune
Dr. Sandeep Mengade
Dr. Sandeep Mengade
BAMS, Family Physician General Physician, 17 yrs, Pune