Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
तुम्हालाही जिमला जायला कंटाळा येतो का? मग वर्चुअल जिमिंगचा विचार का करू नये?
#व्यायाम#निरोगी जिवन

फिटनेसचा विषय निघाला की, अनेकजण या विषयाची सुरूवात तर फार उत्साहाने करतात. जिम लावतात, धावायला जातात पण हे सगळं काही दिवसच टिकतं. काही दिवसांनी याबाबत जास्तीत जास्त लोकांमध्ये आळस बघायला मिळतो. खासकरून थंडीच्या दिवसात तर हा आळस अधिक जास्त बघायला मिळतो. काही लोकांना असं वाटतं की, फिटनेससाठी जिममध्ये इतके पैसे कशाला वाया घालवायचे.

तुम्हीही असंच काही करत असाल तर तुम्ही वर्चुअल जिमिंगचा विचार करायला हरकत नाही. जिमला जाता न येण्याच्या वेगवेगळ्या समस्या दूर करुन फिटनेसची काळजी घेता यावी म्हणून तज्ज्ञांनी वर्चुअल जिमिंगचा फंडा समोर आणला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना हा ट्रेंड पसंतही पडत आहे.

काय आहे वर्चुअल जिमिंग?

मोबाइल अ‍ॅप किंवा सॉफ्टवेअरच्या मदतीने जिमची ही नवीन कॉन्सेप्ट समोर आणली गेली आहे. याने लोकांना ही सुविधा मिळते की, ते घरीच जिमसारखं वर्कआऊट करु शकतात. यात ऑनलाइन शिक्षण तर असतंच सोबतच जिम ट्रेनर व्यक्तिगत रूपाने लोकांची शारीरिक माहिती घेऊन त्यांना गरजेनुसार वेगळे सेशन देतात. याला कस्टम होम जिमिंग म्हटलं जातं.

वर्चुअल जिमिंगमध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार घरातच मोबाइल किंवा मोठ्या स्क्रीनवर वर्कआऊट बघून त्यांचं अनुकरण करू शकता. यात नवीन वीआर टेक्नॉलॉजीही आली आहे. ज्यात तुम्हाला तुम्ही अनेक लोकांसोबत जिममध्ये वर्कआऊट करत असल्याला फिलही येतो.

वाढतीये याची क्रेझ

अनेकदा फिटनेससाठी फी भरली की, काही क्लासेसनंतर जिमला जाणं बंद होतं. असे लोक आता या वर्चुअल ट्रेनिंगला पसंती देत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, आजकालच्या धावपळीत, ट्रॅफिक आणि ड्रायविंगमध्ये वेळ घालवणाऱ्या पिढीसाठी हा एक चांगला पर्याय आहे. वेळेचं कोणतही बंधन नसल्याने ही कॉन्सेप्ट लोकांना पसंत पडत आहे. अनेक ऑनलाइन प्रोग्राम येत आहेत. हे किती वेळ, कसे करावे याचीही माहिती उपलब्ध आहे.

फिटनेस एक्सपर्ट्स काय सांगतात?

फिटनेस एक्सपर्ट सांगतात की, हिवाळ्यात लोक जिमिंगबाबत जरा आळशी होतात. त्यामुळे ही कॉन्सेप्ट लोकांना पसंत पडत आहे, कारण हे त्यांना घरीच करावं लागतं. पण यातही अनियमितता होण्याची शक्यता असतेच. तसेच कोणताही ट्रेनर सोबत नसल्याने काही लोक याची प्रक्रिया फार गंभीरतेने न घेण्याचीही शक्यता असते.

खरंतर फिट राहण्यासाठी सेल्फ मोटिवेशनची गरज असते. वर्चुअल फिटनेसमध्ये हे मोटिवेशन मिळत राहतं. यात घरीच छोटा सेटअप करून एका स्क्रीनच्या माध्यमातून तुम्ही वर्कआऊट करू शकता.

Dr. Rekha Pohani
Dr. Rekha Pohani
Specialist, Dietitian dietetics, 13 yrs, Pune
Dr. Vijay U. Jadhav
Dr. Vijay U. Jadhav
BAMS, Ayurveda Family Physician, 15 yrs, Pune
Dr. Pradnya  Gurav
Dr. Pradnya Gurav
MD - Homeopathy, Adolescent And Child Psychiatrist Homeopath, 8 yrs, Pune
Dr. Rohit Kamate
Dr. Rohit Kamate
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 4 yrs, Pune
Dr. Manish Rawool
Dr. Manish Rawool
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 4 yrs, Pune